Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahadev Jankar: लोकसभेला प्रचार करणाऱ्या भाजपवरच महादेव जानकरांची टीका; म्हणाले, “छोट्या राजकीय पक्षांना…”

राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महायुती कमकुवत होण्याची शक्यता आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 22, 2024 | 09:48 PM
Mahadev Jankar: लोकसभेला प्रचार करणाऱ्या भाजपवरच महादेव जानकरांची टीका; म्हणाले, "छोट्या राजकीय पक्षांना..."

Mahadev Jankar: लोकसभेला प्रचार करणाऱ्या भाजपवरच महादेव जानकरांची टीका; म्हणाले, "छोट्या राजकीय पक्षांना..."

Follow Us
Close
Follow Us:

पाटस : भाजपने मला मंत्रिपद  दिले नाही. म्हणून मी महायुतीतून बाहेर पडलो नाही, तर भाजपने मला धोका दिला. माझा पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला. भाजप हा महागद्दार आहे. माझा पक्ष मला वाढवयचा आहे. त्यामुळेच विधानसभेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असून  महायुती आणि महाविकास आघाडीला आव्हान देणार आहे,असा निर्धार राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी पाटस येथे पार पडलेल्या कार्यकर्ते मेळाव्यात केला. दौंड तालुका राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने पाटस येथे सोमवारी (दि २१) कार्यकर्ता निर्धार मेळावा आयोजित केला होता. उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना महादेव जानकर यांनी भाजप व दौंड भाजपचे आमदार राहुल कुल यांच्यावर वर सडकून टीका केली .

जानकर म्हणाले , “भाजपने छोट्या राजकीय पक्षांना संपवण्याचे काम केले आहे.  त्यामुळे यापुढे भाजपसोबत युती नाही. सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत रासप हा भाजपसोबत महायुतीत घटक पक्ष होता. मी राहुल कुल यांना रासपाची उमेदवारी दिली होती. मात्र कुल यांनी ऐनवेळी माझ्या पक्षाचा बी फार्म बाजूला ठेवून भाजपचा फॉर्म भरला, त्यावेळी माझ्या डोळ्यात पाणी आले. कुल यानी मला धोका दिला, हे आजही विसरलो नाही. माझ्या काही कार्यकर्त्यांनीही गद्दारी केली. पैशासाठी त्यांनी कुल यांचे काम केले. पण दौंडच्या जनतेने माझ्यावर खूप प्रेम केले आहे. मला लोकसभा निवडणुकीत २५ हजारांचे मताधिक्य दिले होते.‌पण माझी चूक झाली ,मला माफ करा. पण मी खचणार नाही आणि घाबरणारही नाही. दौंड साठी सक्षम असा माळी किंवा मराठा समाजाचा तरुण उमेदवार  दिला जाईल.

दौंडकरांनो गद्दार विद्यमान आमदारांना कोणत्याही परिस्थितीत पाडायचे आहे. मी मंत्री असताना दौंड साठी जास्त निधी दिला आहे. मी मंत्रीपद मागणार नाही तर मंत्रिपद देणारा आहे. मला आमदार व्ह्यायचे नाही पण आमदार करणार आहे. राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे १५ आमदार निवडून येतील. रासप शिवाय महायुती आणि महाविकास आघाडी राज्यात सत्ता स्थापन करू शकणार नाही,असा विश्वास जानकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. मी कोणताही भ्रष्टाचार केला नाही . माझ्या कार्यकर्त्यांवर दबाव आणण्याचा किंवा धमकी देण्याचा प्रयत्न  केला, माझ्या कार्यकर्त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर मग मात्र जशास तसे उत्तर दिले जाईल. मी हिंद केसरी आहे हे लक्षात ठेवा, असा इशाराही जानकर यांनी यावेळी दिला. राष्ट्रीय समाज पक्ष, दौंड जन क्रांती आणि रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.‌

हेही वाचा: निवडणुकीपूर्वीच बलाढ्य महायुतीला तडा; महादेव जानकरांनी केला रामराम; ‘या’ कारणामुळे होते नाराज

महादेव जानकर महायुतीतून बाहेर

राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महायुती कमकुवत होण्याची शक्यता आहे. महादेव जानकर ही राज्यातील सर्वच २८८ जागा लढवण्यावर ठाम आहेत. २८८ उमेदवार उभे करण्यावर महादेव जानकर  ठाम आहेत. महादेव जानकर महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा होती. जागावाटपाच्या चर्चेत आपल्याला विचारात घेतले जात नसल्याच्या कारणांमुळे जानकर यांनी महायुतीला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Rsp chief mahadev jankar criticizes on mahayuti and bjp patas event

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2024 | 09:48 PM

Topics:  

  • BJP
  • Daund
  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

Satara Politics: “शिवसेना आणि राष्ट्रवादीला आम्हाला सत्तेपासून रोखायचे होते…”, शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची स्पष्टोक्ती
1

Satara Politics: “शिवसेना आणि राष्ट्रवादीला आम्हाला सत्तेपासून रोखायचे होते…”, शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची स्पष्टोक्ती

पाटस ग्रामपंचायतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बंदच; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त
2

पाटस ग्रामपंचायतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बंदच; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

भामा- आसखेड पाणी योजनेला जानेवारीचा ‘अल्टिमेटम’; भाजपा आमदार महेश लांडगे यांची महत्त्वपूर्ण बैठक
3

भामा- आसखेड पाणी योजनेला जानेवारीचा ‘अल्टिमेटम’; भाजपा आमदार महेश लांडगे यांची महत्त्वपूर्ण बैठक

Kerala Election: मोफत गॅस सिलेंडर, महिलांसाठी बेस कार्ड अन् ३,००० रुपयांची पेन्शन…! केरळ निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध
4

Kerala Election: मोफत गॅस सिलेंडर, महिलांसाठी बेस कार्ड अन् ३,००० रुपयांची पेन्शन…! केरळ निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.