Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashadhi Ekadashi 2026: रुक्मिणीमाता पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान! टाळ-मृदंगाच्या गजरात कौंडण्यपूरनगरीत पालखीला निरोप

पालखी मंदिरातून मार्गस्थ झाल्यानंतर गावातील विविध भागांत ग्रामस्थांनी तिचे उत्स्फूर्त स्वागत केले. ठिकठिकाणी रांगोळ्या, फुलांची उधळण, आरती आणि पूजन करून मातेप्रती आपली श्रद्धा व्यक्त करण्यात आली. गावकऱ्यांच्या वतीने सरबत वाटपही करण्यात आले.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 22, 2026 | 03:35 PM
रुक्मिणीमाता पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान! टाळ-मृदंगाच्या गजरात कौंडण्यपूरनगरीत पालखीला निरोप

रुक्मिणीमाता पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान! टाळ-मृदंगाच्या गजरात कौंडण्यपूरनगरीत पालखीला निरोप

Follow Us
Follow Us:

टाळ, मृदंग, वीणेचा नाद आणि रुक्मिणीमातेचा जयघोष यामुळे शुक्रवारी कौंडण्यपूरनगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली. विदर्भाची पुरातन राजधानी आणि श्री रुक्मिणीमातेचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथून ४३२ वर्षांची अखंड परंपरा लाभलेली मातारुख्मिणीची पालखी हजारो वारकरी, भाविक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली.(फोटो सौजन्य – AI)

Ashadhi Ekadashi 2026: विठ्ठल भक्तांसाठी मोठी आनंदवार्ता! १६ …

पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मातेची विधिवत पूजा-अर्चा करून साडी-चोळी अर्पण करण्यात आली. तसेच ओटी भरून माहेरातून लेकीला सासरी पाठविण्याच्या परंपरेनुसार भावपूर्ण वातावरणात पालखीला निरोप देण्यात आला. पालखी मंदिरातून मार्गस्थ झाल्यानंतर गावातील विविध भागांत ग्रामस्थांनी तिचे उत्स्फूर्त स्वागत केले. ठिकठिकाणी रांगोळ्या, फुलांची उधळण, आरती आणि पूजन करून मातेप्रती आपली श्रद्धा व्यक्त करण्यात आली. गावकऱ्यांच्या वतीने सरबत वाटपही करण्यात आले. महिला भजन मंडळांनी फुगडी व भक्तिगीतांच्या माध्यमातून वातावरण भक्तिरसाने भारून टाकले. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि ‘विठ्ठल विठ्ठल’ नामस्मरणात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

यानंतर पालखी पाचपावली स्थळी पोहोचताच अंबा रुख्मिणी महोत्सव समिती व रविराज देशमुख मित्रपरिवार तसेच पंचक्रोशीतील भाविकांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. फटाक्यांच्या आतषबाजीने परिसर उजळून निघाला. यावेळी रविराज देशमुख व गायत्री देशमुख यांनी सपत्नीक पालखीचे पूजन केले. त्यानंतर महाआरती करून उपस्थित वारकरी व भाविकांनी अत्यंत भावुक वातावरणात मातेच्या पालखीला निरोप दिला. माहेरातून लेक सासरी जात असल्याचा भावस्पर्शी प्रसंग अनेकांच्या मनाला चटका लावून गेला. कौंडण्यपूर येथून पालखीच्या प्रस्थानावेळी अंबा रुक्मिणी महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा भाजपा जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख, संजय महाराज ठाकरे, पंकज महाराज महल्ले, श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष नामदेवराव अंबाळकर, सरपंच प्रेमदास राठोड, अक्षय पुंडेकर तसेच अंबा रुक्मिणी महोत्सव समितीचे पदाधिकारी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, वारकरी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

Ashadhi Wari 2026 : ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात विठुरायाच्या भेटीसाठी निघा; आषाढी यात्रेसाठी एसटीची विशेष बससेवा सज्ज

४३२ वर्षांची अखंड परंपरा कायम

कौंडण्यपूर ते पंढरपूर हा पालखी सोहळा केवळ धार्मिक परंपरा नसून विदर्भाच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचे प्रतीक मानला जातो. गेल्या ४३२ वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेली ही परंपरा आजही हजारो वारकऱ्यांना भक्ती, श्रद्धा आणि संस्कारांची प्रेरणा देते. हा पालखी सोहळा महाराष्ट्रातील मानाचा सोहळा असून माता रुख्मिणीच्या पालखीला पंढरपूर येथे विशेष महत्त्व आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी ही पालखी विठुरायाच्या गाभाऱ्यात असते आणि त्या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने तिचे पूजन केले जाते.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Rukmini mata palkhi begins journey to pandharpur amid devotional chants in kaundanyapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • aashadhi ekadashi
  • maharashtra

संबंधित बातम्या

ST Workers Protest : एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा; वेतनवाढ, महागाई भत्तासंदर्भात प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा
1

ST Workers Protest : एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा; वेतनवाढ, महागाई भत्तासंदर्भात प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा निविदा वादाच्या भोवऱ्यात; संदीप वाघेरेंकडून प्रक्रिया रद्द करण्याची मागणी
2

पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा निविदा वादाच्या भोवऱ्यात; संदीप वाघेरेंकडून प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

Karjat News : साई डोंगरावरील 150 एकर वनजमिनीवर आदिवासींचा दावा; हक्कासाठी लढ्याची घोषणा
3

Karjat News : साई डोंगरावरील 150 एकर वनजमिनीवर आदिवासींचा दावा; हक्कासाठी लढ्याची घोषणा

पाणाडी जमिनीच्या खाली पाणी कसे शोधतात? भोंदूपणा, परंपरा की विज्ञान? जाणून घ्या सत्य
4

पाणाडी जमिनीच्या खाली पाणी कसे शोधतात? भोंदूपणा, परंपरा की विज्ञान? जाणून घ्या सत्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.