मुंबई : सध्या राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) जवळपास 44 आमदारांना (MLA) घेऊन गुहावटीत (Guhavati) येथे थांबले आहेत. आज एकनाथ शिंदे बंडाळी गटाचा पाचवा दिवस आहे. त्यामुळं राज्यातील राजकीय हालचालीना वेग आला असून, मविआमध्ये बैठकाचं (MVA meeting) सत्र सुरु आहे. तर तिकडे शिंदे गटानी आपल्या गटाचे ‘शिवसेना बाळासाहेब गट’ (Shivsena balasaheb Group) असे नाव ठेवले आहे. तसेच त्यांचे नेतेपद व काही आमदारांचे सदस्यत्व रद्द केल्यानंतर आता शिंदे गटाने सर्वोच्य न्यायालयात (Court) धाव घेतली आहे. याचा परिणाम राज्यातील राजकीय व सामाजिक घडामोडींवर होत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्यात बैठकीचं (Shivsena, congress, and NCP Meeting) जोरदार सत्रं सुरु आहे. आज शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक सुद्धा संपन्न झाली. तर आता आदित्य ठाकरे हे शिवसेनेचा मेळावा घेणार आहेत.
[read_also content=”पण सध्या सुरक्षेच्या दृष्टीनं महाराष्ट्रात जाणं योग्य नाही – केसरकर https://www.navarashtra.com/maharashtra/we-have-not-left-shiv-sena-we-are-shiv-sainiks-but-it-is-not-appropriate-to-go-to-maharashtra-for-security-reasons-kesarkar-296945.html”]
दरम्यान, राज्यातील वातावरण तापले असून, शिंदे गटाकडून तसेच शिवसेनेकडून आता बॅनरबाजी करण्यात येत आहे. (shivsena and shinde group bannerbaji) काही ठिकाणी बंडखोर आमदारांची कार्यालयं तसेच बॅनर फोडल्यानंतर (MLA Office and Banner) आता शिवसैनिक आक्रमक झाले असून, धुळ्यात लक्षवेधी बॅनर शिवसैनिकांनी लावले आहेत. (Dhule banner) ‘साहेब’, यंदा पण पांडुरंगांची आरती तुमच्याच हातून होणार’, अशा प्रकारचे बॅनर धुळ्यात शिवसैनिकांकडून (Dhule Shivsainik Banner) लावण्यात आले आहेत.
शिवसेनेचे धुळ्यातील उपमहानगरप्रमुख निष्ठावान शिवसैनिकाने शहरातील झाशी राणी चौकात मोठे बॅनर लावून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘साहेब’, यंदा पण पांडुरंगांची आरती तुमच्याच हातून होणार’. असे जाहीरपणे म्हणत मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हेच भविष्यातही कायम राहतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. सध्या धुळेकरांना हे बॅनर आकर्षित करत असून, शिवसैनिक उद्धव साहेब तुमच्या पाठीशी आहेत, अशी घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली.