मुंबई : अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला ड्रग्ज प्रकरणी त्याला एनसीबीने अटक केली होती. त्यावेळी मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede ) यांनी शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान क्रूझ ड्रग्स प्रकरणी त्याला व त्याच्या मित्राला अटक केली होती. आता अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्याशीसंबंधी मोठी बातमी समोर येत आहे. आर्थिक अन्वेषण विभागाने (सीबीआय) समीर वानखेडे यांच्या मुंबईतील घरावर छापेमारी केली होती. तसेच, सीबीआयने भ्रष्टाचारप्रकरणी समीर वानखेडे यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल केला होता. आता एक धक्कादायक माहीती समोर येत आहे. त्यावेळी आर्यन खानला सोडण्यासाठी समीर वानखेडे यांनी शाहरुख खानकडे २५ कोटीची मागणी केली होती. तर फायनल डिल १८ कोटीवर करण्यात आले होते, अशी माहिती सीबीयने (CBI) तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
काय म्हटलंय सीबीआयनं?
दरम्यान, एएनआयने दिलेल्या माहितीनुसार बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान क्रूझ ड्रग्स प्रकरणी समीर वानखेडे आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. साक्षीदार के. पी. गोसावी याने आर्यन खानच्या कथित ड्रग्स प्रकरणात आर्यन खानच्या कुटुंबाकडून २५ कोटी उकळण्याची योजना आखली होती, असा खुलासा सीबीआयने एफआयआरमध्ये केला आहे. त्यामुळं समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
काय आहे प्रकरण?
दोन वर्षापूर्वी म्हणजे २ ऑक्टोबर २०२१ रोजी एनसीबीने एका क्रूझवर धाड टाकली होती. यावेळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा येथे होता. ड्रग्जप्रकरणात केलेल्या या कारवाईत आर्यन खानसह २० जणांना अटक करण्यात आली होती. तेव्हा एनसीबी मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे होते. एनसीबीने आर्यन खानला जवळपास एक महिना कोठडीत ठेवलं होतं. पण, पुराव्याअभावी आर्यन खानची निर्दोष मुक्तता झाली होती. यानंतर समीर वानखेडेची चौकशी करण्यात आली होती.