Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati News: तीन दूध डेअरींमधील नमुने प्रयोगशाळेत! एनालॉग पनीरविरोधात एफडीएची मोहीम; पुरवठादारही रडारवर

अमरावती जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने विशेष तपास मोहिमा सुरु केल्या आहेत. भेसळयुक्त किंवा प्रतिबंधित एनालॉग पनीरची विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जात आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 08, 2026 | 02:45 PM
तीन दूध डेअरींमधील नमुने प्रयोगशाळेत! एनालॉग पनीरविरोधात एफडीएची मोहीम; पुरवठादारही रडारवर

तीन दूध डेअरींमधील नमुने प्रयोगशाळेत! एनालॉग पनीरविरोधात एफडीएची मोहीम; पुरवठादारही रडारवर

Follow Us
Follow Us:

महाराष्ट्रात एनालॉग पनीरच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली. यानंतर अमरावती जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गुरुवारपासून विशेष तपासणी मोहीम सुरू केली. या मोहिमेंतर्गत शहरासह ग्रामीण भागातील तीन प्रमुख दूध डेअरींमधून पनीरचे नमुने (सॅम्पल) संकलित करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच शहरातील लहान-मोठी हॉटेल्स, ढाबे आणि रेस्टॉरंटमध्ये पनीरचा पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्यांची यादीही तयार करण्यात येत असून, भेसळयुक्त किंवा प्रतिबंधित एनालॉग पनीरची विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे.(फोटो सौजन्य – Istock)

Amravati New: आदिवासी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न ऐरणीवर! वसतिगृहांची अवस्था बिकट; विविध मुलभूत सुविधांपासून वंचित

एफडीएच्या पथकाने गुरुवारी शहरातील एका संकुल परिसरातील एका दूध डेअरीतून, शोभानगर येथील एका दूध डेअरीतून तसेच माहुली परिसरातील एका दूध डेअरीतून पनीरचे नमुने घेतले. हे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, त्यामध्ये भेसळ किंवा प्रतिबंधित एनालॉग पनीरचा वापर झाला आहे का, याची पडताळणी केली जाणार आहे. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शहरातील लहान-मोठ्या हॉटेल्स, ढाबे आणि रेस्टॉरंटमध्ये पनीरचा पुरवठा करणारे व्यापारी आणि डेअऱ्यांची माहिती संकलित केली जात आहे.

तपासणीदरम्यान कोणत्याही हॉटेल, डेअरी किंवा पुरवठादाराकडे एनालॉग अथवा भेसळयुक्त पनीर आढळल्यास संबंधितांविरुद्ध अन्न सुरक्षा कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. यापूर्वीही अमरावतीत एफडीएच्या कारवाईदरम्यान निकृष्ट दर्जाचे व संशयास्पद पनीर जप्त करण्यात आले होते. तपासात काही हॉटेल चालक ग्राहकांना विविध पनीरच्या पदार्थांच्या नावाखाली अस्सल पनीरऐवजी कमी किमतीचे एनालॉग पनीर वापरत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याची बाब उघड झाली होती.

एफडीएने घेतलेल्या नमुन्यांचा प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर बाजारात विक्री होणारे पनीर अन्न सुरक्षा निकषांनुसार आहे की नाही, हे स्पष्ट होणार आहे. भेसळ करणारे आणि प्रतिबंधित उत्पादने विकणाऱ्यांविरुद्ध पुढेही सातत्याने विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून, नागरिकांना सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी विभाग कटिबद्ध असल्याचे एफडीएने स्पष्ट केले आहे.

Amravati New: सर्वेक्षणाच्या नादात शिक्षकच झाले शाळाबाह्य! शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षणही करावे लागणार; मनस्ताप कायम

एनालॉग पनीर हे अस्सल दुधापासून तयार केलेले नसते. ते तयार करण्यासाठी दूधातील फॅटऐवजी वनस्पती तेल, स्टार्च, प्रोटीन पावडर आणि इतर कृत्रिम घटकांचा वापर केला जातो. त्याची चव आणि पोत अस्सल पनीरसारखी बनविली जाते. त्यामुळे सामान्य ग्राहकांना दोन्हीतील फरक सहज लक्षात येत नाही. कमी खर्चात अधिक नफा मिळविण्यासाठी पिझ्झा, बर्गर, फास्ट फूड, पॅकेज्ड फूड तसेच काही हॉटेल्समध्ये त्याचा वापर केला जातो. तज्ज्ञांच्या मते, अशा उत्पादनांचे दीर्घकाळ सेवन आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

 

Web Title: Samples from three milk dairies sent to the laboratory fda campaign against analog paneer suppliers also under scrutiny

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • Amaravati
  • FDA
  • paneer

संबंधित बातम्या

Amravati News: मेळघाटात विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी! एमईसीएलच्या सीएसआर निधीतून आरोग्य, पोषण अभियान
1

Amravati News: मेळघाटात विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी! एमईसीएलच्या सीएसआर निधीतून आरोग्य, पोषण अभियान

बस नाम ही काफी है! Tukaram Mundhe यांची धडक कारवाई; दुधात डिटर्जंटचा घातक खेळ, सोनाई डेअरीपर्यंत धागे?
2

बस नाम ही काफी है! Tukaram Mundhe यांची धडक कारवाई; दुधात डिटर्जंटचा घातक खेळ, सोनाई डेअरीपर्यंत धागे?

Pune University Canteen Raid: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात FDAची धडक कारवाई! निकृष्ट अन्नावरून कॅन्टीन चालकाला नोटीस
3

Pune University Canteen Raid: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात FDAची धडक कारवाई! निकृष्ट अन्नावरून कॅन्टीन चालकाला नोटीस

Amravati News: पांढऱ्या सोन्याला संकटाची काळी छाया! गतवर्षी भावाने दिला दिलासा; यंदा विक्रमी पेरणी करूनही चिंता
4

Amravati News: पांढऱ्या सोन्याला संकटाची काळी छाया! गतवर्षी भावाने दिला दिलासा; यंदा विक्रमी पेरणी करूनही चिंता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.