Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सांगली जिल्हा परिषदेत मुद्रणालय, सोलर आणि टेंडर घोटाळ्यांवर खळबळ; चौकशी समित्यांची घोषणा, अधिकाऱ्यांवर सदस्यांचा निशाणा

सांगली जिल्हा परिषदेच्या सभेत मुद्रणालय, सोलर प्रकल्प आणि टेंडर मॅनेजमेंटमधील कोट्यवधींच्या कथित घोटाळ्यावरून सत्ताधारी-विरोधक आक्रमक झाले. या प्रकरणांच्या चौकशीसाठी सीए आणि सदस्यांची विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 16, 2026 | 06:36 PM
सांगली जिल्हा परिषदेत मुद्रणालय, सोलर आणि टेंडर घोटाळ्यांवर खळबळ

सांगली जिल्हा परिषदेत मुद्रणालय, सोलर आणि टेंडर घोटाळ्यांवर खळबळ

Follow Us
Follow Us:
  • सांगली जिल्हा परिषदेत मुद्रणालय, सोलर आणि टेंडर घोटाळ्यांवर खळबळ
  • चौकशी समित्यांची घोषणा
  • अधिकाऱ्यांवर सदस्यांचा निशाणा
सांगली: सांगली जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी मुद्रणालयातील कथित गैरव्यवहार, सोलर प्रकल्पांतील अनियमितता, टेंडर प्रक्रियेतील कथित ‘मॅनेजमेंट’ आणि अर्थसंकल्पातील निधी वाटपावरून सत्ताधारी व विरोधी सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नोकरीत राहूनच स्वतंत्र यंत्रणा उभी करून टेंडर प्रक्रिया नियंत्रित केल्याचा गंभीर आरोप सदस्यांनी केला. सभागृहातील तीव्र चर्चेनंतर मुद्रणालय आणि सोलर प्रकरणांच्या चौकशीसाठी स्वतंत्र समित्या स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला उपाध्यक्ष ऋषिकेश लाड, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, सभापती दादासाहेब कोळेकर, स्नेहल मोरे, सावित्री रवी पाटील, पृथ्वीराज पाटील , प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांच्यासह सदस्य उपस्थित होते.

मुद्रणालयाच्या कारभारावर गंभीर आरोप

मुद्रणालयाचा विषय उपस्थित करताना सरदार पाटील यांनी कागद खरेदी बाजारभावापेक्षा जास्त दराने होत असल्याचा आरोप केला. बाहेर एक हजार ते पंधराशे रुपयांना मिळणारा कागद दोन हजार रुपयांपेक्षा अधिक दराने खरेदी केला जात असल्याचा दावा त्यांनी केला. मुद्रणालयातील कात्रण विक्रीतून ठेकेदाराला महिन्याला २५ ते ३० हजार रुपयांचे उत्पन्न मिळत असताना जिल्हा परिषदेच्या खात्यात वर्षभरात अवघे पाच हजार रुपये जमा होत असल्याचाही आरोप त्यांनी केला. यासंदर्भातील कथित ध्वनिचित्रफीतही त्यांनी सभागृहात ऐकवली. अभिजित पाटील यांनी मुद्रणालयातील साहित्य चोरीला गेल्याचा तसेच सदस्यांना गोपनीय तक्रारी येत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. गेली बारा वर्षे एकाच अधिकाऱ्याकडे या विभागाचा कार्यभार असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. अक्षय पाटील यांनी भरती प्रक्रियेत सात लाख रुपये घेतल्याचा गंभीर आरोप करत भरतीत एवढी घाई का करण्यात आली, असा सवाल उपस्थित केला.

‘टेंडर मॅनेज’ करणारी यंत्रणा कार्यरत असल्याचा आरोप

सुनील पवार यांनी डीआरडीएतील एका अधिकाऱ्याचे नाव घेत जिल्हा परिषदेतील टेंडर प्रक्रिया बोगस पद्धतीने ‘मॅनेज’ केली जात असल्याचा आरोप केला. काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताने निविदा प्रक्रिया राबवली जात असून “एकच व्यक्ती संपूर्ण जिल्हा परिषद चालवत आहे,” असा दावा करत सखोल चौकशीची मागणी केली. आशिष जाधव यांनी रंगीत मुद्रण, स्टेशनरी खरेदी आणि टेंडर प्रक्रियेत विशिष्ट कंपन्यांनाच संधी दिली जात असल्याचा आरोप केला. मोहन पाटील यांनीही संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली.

मुख्य वित्त व लेखाधिकारी अडचणीत

सदस्यांच्या आरोपांवर उत्तर देताना मुख्य वित्त व लेखाधिकारी सुनंदा ठवळे यांनी कागद खरेदीसाठी अडीच कोटी रुपयांची तरतूद असून सर्वात कमी दर देणाऱ्या निविदाधारकाला १०.८४ टक्के कमी दराने काम दिल्याचे सांगितले. कात्रण विक्री व अॅल्युमिनियम प्लेट विक्रीही नियमानुसार झाल्याचा दावा त्यांनी केला. मात्र सदस्यांच्या पूरक प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देता न आल्याने वित्त विभागावरही टीकेची झोड उठली.

Sangli : मनपाच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल खाजगीकरणाला तीव्र विरोध, खाजगीकरणाचा विषय उधळून लावणार

सोलर प्रकल्पांवरही आरोपांची सरबत्ती

सभेत सोलर प्रकल्पांतील अनियमिततांचाही मुद्दा गाजला. सुनील पवार यांनी नेट मीटरिंगच्या कामात संशयास्पद कंपनीला काम दिल्याचा आरोप केला. जितेश कदम यांनी निकृष्ट दर्जाच्या कामांकडे लक्ष वेधले, तर अभिजित पाटील यांनी संबंधित कंपनी पुरवठ्यासाठी पात्र नसल्याचा दावा करत बिले रोखण्याची मागणी केली. अक्षय पाटील यांनी काम पूर्ण होण्यापूर्वीच ७० टक्के रक्कम अदा झाल्याचा आरोप करत मार्चमध्ये बिले देऊन मे महिन्यात काम झाल्याचे पुरावे सभागृहात सादर केले. पाणीपुरवठा विभागाच्या इमारतीवर परवानगीशिवाय सोलर बसविण्यात आल्याचा दावा करत पूर्णत्व प्रमाणपत्र नसतानाही बिलांची प्रक्रिया कशी झाली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मोहन पाटील यांनी पंचायत समित्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ग्रामपंचायतींमधील अनेक सोलर प्रकल्प बंद असल्याचे सांगत अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारामुळेच हे प्रकार घडल्याचा आरोप केला.

अर्थसंकल्पावरही सदस्य आक्रमक

अर्थसंकल्प तयार करताना सदस्यांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप सुनील पवार, सरदार पाटील आणि आशिष जाधव यांनी केला. सामूहिक विकास कार्यक्रमासाठी १० कोटी रुपयांची तरतूद असून प्रत्येक सदस्याला केवळ सुमारे १४ लाख रुपये मिळणार असल्याने विकासकामे कशी करायची, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. आशिष जाधव यांनी १ कोटी ५५ लाख रुपयांच्या निविदांना सभागृहाची मंजुरी न घेता प्रशासकीय मान्यता कशी देण्यात आली, असा सवाल उपस्थित करत हा निधी सामूहिक विकास निधीत वर्ग करण्याची मागणी केली.

चौकशी समित्यांची घोषणा

सभागृहातील तीव्र चर्चेनंतर उपाध्यक्ष ऋषिकेश लाड यांनी मुद्रणालयातील सर्व व्यवहारांची चौकशी करण्यासाठी सदस्य आणि खासगी सनदी लेखापाल (सीए) यांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्याची घोषणा केली. संबंधित कर्मचाऱ्यांकडील कार्यभार तातडीने काढून घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तर मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी सोलर प्रकरणाची स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करून संबंधित ठेकेदारांची बिले थांबविण्यात येतील, तसेच अधिकारी किंवा कर्मचारी ठेकेदारी अथवा व्यवसायात सहभागी असल्याचे आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, शिक्षण विभागाची देखील चौकशी करू असे स्पष्ट केले.

प्रेक्षक गॅलरी खुली

सभेच्या सुरुवातीलाच सरदार पाटील, सुनील पवार, अभिजित पाटील, अक्षय पाटील आणि आशिष जाधव यांनी जिल्हा परिषद सभागृहाची प्रेक्षक गॅलरी खुली करण्याची मागणी केली. “विधानसभा आणि विधान परिषदेत गॅलरी खुली असते, मग जिल्हा परिषदेत का नाही?” असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी लोकशाही प्रक्रियेचा मुद्दा मांडला. त्यानंतर गॅलरी खुली करण्यात आली.

‘कामे थोडी… रिल्स फार’

सभेदरम्यान अनेक सदस्यांसोबत रिल्स तयार करणारे सहकारी उपस्थित असल्याने सभागृहात मोठी गर्दी झाली होती. गेल्या चार महिन्यांत पदाधिकारी आणि सदस्यांना अद्याप कामकाजाचा अपेक्षित वेग मिळालेला नसल्याची चर्चा रंगली. अनेक सदस्यांनी सभागृहात रिल्स चित्रीकरणाला मज्जाव करण्याची मागणीही केली.

ईश्वरपूरच्या राजकारणात भूकंप..! नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे अपात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सत्ताधारी राष्ट्रवादीत खळबळ

Web Title: Sangli zp general body meeting orders probe into printing press and solar project scams marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 06:36 PM

Topics:  

  • Sangli
  • sangli news
  • sangli Zp
  • solar energy

संबंधित बातम्या

Sangli Politics: सांगली राजकीय वर्तुळात खळबळ! जतमध्ये दोन माजी आमदारांसह ४० जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल
1

Sangli Politics: सांगली राजकीय वर्तुळात खळबळ! जतमध्ये दोन माजी आमदारांसह ४० जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल

Sangli News: स्मार्ट मीटरच्या सक्तीला सांगलीत तीव्र विरोध; १ सप्टेंबरला निघणार विराट मोर्चा
2

Sangli News: स्मार्ट मीटरच्या सक्तीला सांगलीत तीव्र विरोध; १ सप्टेंबरला निघणार विराट मोर्चा

कृष्णा घाट खूनप्रकरणी ‘आर.के. गँग’वर मकोका; दहशत निर्माण करून गुन्हेगारी कारवाया, दोन अल्पवयीनांसह आठ जणांचा समावेश
3

कृष्णा घाट खूनप्रकरणी ‘आर.के. गँग’वर मकोका; दहशत निर्माण करून गुन्हेगारी कारवाया, दोन अल्पवयीनांसह आठ जणांचा समावेश

‘Maharashtra Energy Expo’ मध्ये पुणेकरांचे लक्ष! जेनस इनोव्हेशनकडून ‘हाय-फ्लो हायब्रिड सोलर इन्व्हर्टर’ सादर
4

‘Maharashtra Energy Expo’ मध्ये पुणेकरांचे लक्ष! जेनस इनोव्हेशनकडून ‘हाय-फ्लो हायब्रिड सोलर इन्व्हर्टर’ सादर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.