Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut on Ajit Pawar: ‘दादांकडे भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती का….? संजय राऊतांचा गंभीर सवाल

अजित पवार स्वत:च्या पक्षाचे नेते होते. ते त्यांच्या मर्जीने भाजपसोबत गेले होते. पण भाजप महाराष्ट्राच्या विचारांचा पक्ष नाही. अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत खाजगीत बरचं काही बोलायचे

  • By anuradha sagar
Updated On: Feb 02, 2026 | 11:45 AM
Sanjay Raut, Maharashtra Politics,

Sanjay Raut, Maharashtra Politics,

Follow Us
Follow Us:
  • अमोल मिटकरी यांच्या शंका आणि प्रश्न पाहता हा खूप गंभीर विषय
  • अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांचा अपघात आणि मृत्यूबाबत शंका
  • इतर १०० लोक बोलतात ते खोटं आणि फडणवीस बोलतात ते खरं कसं?
Sanjay Raut on Ajit Pawar:  ‘अमोल मिटकरी यांच्या शंका आणि प्रश्न पाहता हा खूप गंभीर विषय आहे. जर ६ प्रवासी होते आणि ५ च मृतदेह मिळत आहेत. तर ती ६वी व्यक्ती कोण आणि तिची डेडबॉडी का मिळाली नाही. विमानातले देह पूर्णपणे जळून खाक झाले. त्यांची ओळखही पटवता आली नाही. त्यावेळी दादांच्या जवळच्या सगळ्या फाईलचे सगळे कागद मात्र जळालेले नाहीत. ते तिथेच तसेच पडले आहेत. दादांकडे भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती का, ती भ्रष्टाचाराची फाईल घेऊनच दादा बारामतीला येत होते का,’ असा गंभीर सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. हा प्रश्न मी राज्यसभेतही मांडणार आहे. ” असेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

Sunetra Pawar Satara Visit : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पहिला शासकीय दौरा; साताऱ्यामध्ये घेणार जाधव कुटुंबाची भेट

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांचा अपघात आणि मृत्यूबाबत शंका उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे त्याच्याच पक्षाचे नेते अमोल मिटकरी यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. या सगळ्या घटनांबाबत संजय राऊत यांनी टिका केली आहे. संजय राऊत म्हणाले, “अजित पवार यांचे हा भाजपचा पराभव होता. देशाच्या राजकारणला कलाटणी देणारा पक्ष ठरला असता. त्यामुळे भाजपची दहशत मोडली गेली असती. अजित पवार वारंवार, त्यांच्याकडे भाजपच्या घोटाळ्यांची फाईल असल्याचे सांगत होते. ते आपण उघड करणार असल्याचे त्यंनी १५ जानेवारीला सांगितले होते. पण पुढच्या १० दिवसांत त्यांचा रहस्यमय पद्धतीने मृत्यू झाला.
संजय राऊत म्हणाले,” मी कोणावरही आरोप करत नाही. अमोल मिटकरी यांनी काही प्रश्न उपस्थित केलेत. ते खूप गंभीर प्रश्न आहेत, अजित पवार यांच्यासारखा नेता विमानात बसतो, त्यांच्यासोबत इतर कोणताही प्रमुख नेता नाही, विमानाच्या मनेटेनन्सचा रिपोर्ट नाही. मग लोकांच्या मनात शंका येणारच. याची शंका मला पहिल्या दिवशीच आली.

‘ज्यावेळी अजित पवार यांनी त्यांच्याकडे भाजपच्या घोटाळ्याची फाईल असल्याचे सांगितले आणि आपण योग्य वेळी ती उघडकीस आणू, त्याचवेळी माझ्या मनात शंका आली होती. अजित पवारांनी त्यावेळी १९९५ च्या काळात काही कोटी रुपये, सिंचन प्रकल्पाचे बजेट वाढवून त्यांनी पक्षनिधीमध्ये कसे वळवले, हे जेव्हा अजित दादा सांगत होते. तेव्हा मी त्यांच्यी बॉडी लँग्वेज पाहत होते. त्यातून अजितदादांना शरद पवारांकडे परत जायचं असल्याचे स्पष्टपणे दिसत होते.” असेही संजय राऊतांनी म्हटलं आहे.

शरद पवार यांना कोणत्या वेळेला काय बोलावं आणि काय निर्णय घ्यावा, हे चांगलंच कळतं. मुंबई बॉम्बस्फोटावेळी १३ बॉम्बस्फोट झाले असताना १४ बॉम्बस्फोट झाल्याचे सांगितले. त्यांनी त्यावेळी त्यांनी जे वक्तव्य केलं. ती त्यावेळची गरज होती. पण आता अजित पवारांच्या पक्षातील लोकच शंका घ्यायला लागले आहेत, ‘ या कडेही संजय राऊत यांनी लक्ष वेधलं.

Maharashtra Politics: ‘राजकारण लई वंगाळ!’ विलीनीकरणाच्या दाव्यावरून शिवसेनेच्या वृत्तपत्रातून भाजप

तसेच, “अजित पवार स्वत:च्या पक्षाचे नेते होते. ते त्यांच्या मर्जीने भाजपसोबत गेले होते. पण भाजप महाराष्ट्राच्या विचारांचा पक्ष नाही. अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत खाजगीत बरचं काही बोलायचे, असं म्हटलं तर. त्यांनी फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली नसेल तर त्यांचा फडणवीस यांच्यावर विश्वास नसेल. असंही म्हणता येईल. जर त्यांना स्वगृही जायचं असेल तर त्यांना फडणवीसांशी बोलण्याची गरजच काय, फडणवीसांचा अखंड महाराष्ट्राच्या विरोधात आहे, ते मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याच्या बाजूने आहे. अशा वेळी अजित पवार यांच्या सारखा नेता या भूमिकांवर काम करू शकणार नाही. अजित पवार यांच्यासोबत आमच्याही चर्चा होत होत्या. फडणवीसांनी आत्मचिंतन करावं, की अजित पवारांनी त्यांच्याशी चर्चा का केली नाही. इतर १०० लोक बोलतात ते खोटं आणि फडणवीस बोलतात ते खरं कसं? हे चूक आहे.

“अजित पवार मूळ प्रवाहात येण्याच्या विचाराशी ठाम होते. दोन्ही पक्षांत यासंदर्भातील हालचाली सुरू होत्या हे सगळ्यांना माहिती आहे. हे फडणवीस यांनाही माहिती आहे. पण आज दादा नाहीत म्हणून त्यांच्या नावावर कोणतीही बीले फाडू नयेत. अजित पवार यांचा पक्ष आता गृहमंत्री अमित शाहांचा गुलाम झालेला पक्ष झाला आहे. लोक सैरभैर अजूनही आहेत. दुर्दैवाने भारताची न्याय यंत्रणा आणि निवडणूक आयोग मोदी शाहांचा मांडलिक झाल्यामुळे कायदेशीर प्रक्रियेत विलंब होत आहे. ” असंही संजय राऊतांनी सांगितलं.

Web Title: Sanjay raut on ajit pawar did dada have a file on bjps corruption sanjay rauts serious question 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • ajit pawar plane crash
  • Maharashtra Politics
  • MP Sanjay Raut

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा
1

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
2

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता
3

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी
4

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.