
Sanjay Raut PC Today, BMC Election 2026, Seat Sharing, BJP Politics,
Uddhav Thackeray Candidate List 2026: भाजपपाठोपाठ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या २८ उमेदवारांची
“काँग्रेस असो किंवा शिवसेना, अजित पवार स्वतंत्र लढत आहेत का?” असा सवाल करत त्यांनी स्पष्ट केले की, कार्यकर्त्यांना समजावून घेऊनच निवडणूक लढवावी लागते. मात्र सध्या शिंदे गटात तसे चित्र दिसत नसून, ठाण्यात राजीनामा सत्र सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. बंडखोरीच्या मुद्द्यावर बोलताना राऊत म्हणाले, “हे १८५७ चे बंड आहे का? नाही. पक्षाने कार्यकर्त्यांना खूप काही दिलेले असते, मात्र एखाद्या वेळी पक्ष देऊ शकत नाही, याला बंड म्हणता येत नाही.शिंदे गट म्हणतो आम्ही बंड केले, कसलं बंड? घंटा. त्यांना आज बूट चाटावे लागत आहेत,” अशी जहरी टीकाही राऊत यांनी केली.
पुण्यातील राजकीय परिस्थिती आणि जागावाटपाच्या मुद्द्यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिले. पुण्यातील राजकीय परिस्थितीवर बोलताना राऊत म्हणाले, “पुण्यात लवकरच चित्र स्पष्ट होईल. तीन ते चार पक्ष एकत्र असून, योग्य निर्णय घेतला जाईल. आम्ही राष्ट्रवादीसाठी जागा सोडल्या आहेत. आमच्याकडून ज्या जागा सोडायच्या होत्या त्या सोडल्या असून, आमच्याकडून विषय संपला आहे. त्यांना आणखी काही जागा हव्या असतील, तर त्या मनसेच्या कोट्यातील आहेत.” (BMC Election 2026)
BJP Candidate List 2026: भाजपकडून ६६ उमेदवारांची यादी जाहीर; वाचा, एका क्लिकवर
काँग्रेस–वंचित युतीवर भूमिका
काँग्रेस–वंचित बहुजन आघाडी युतीबाबत बोलताना ते म्हणाले, “आम्ही या युतीचे स्वागत केले आहे. ते आमच्यासोबत नसले तरी हरकत नाही. लोकसभा निवडणुकीत त्यांचा काँग्रेसशी वैचारिक वाद होता.”
पवार–अदानी प्रकरणावर वक्तव्य
शरद पवार आणि अदानी प्रकरणावर बोलताना संजय राऊत म्हणाले, “शरद पवारांचे पुस्तक लोकांनी वाचावे. त्यातून सर्व स्पष्ट होईल. अदानीसारख्या उद्योजकाला त्यांनी घडवले. एका मराठी माणसाला ते आपला मार्गदर्शक मानतात, याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. मोदी–शहा यांना ते मार्गदर्शक मानत नाहीत, पण शरद पवारांना मानतात.”