मुंबई – रविवारी (२ जुलै) राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादीतून (NCP) काही आमदारांना घेऊन अजित पवार शिंदे-फडणवीस (Shinde fadnavis) सरकारमध्ये सामील झाले आहेत. राज्यातल्या सत्तानाट्याच्या या सगळ्या घडामोडीनंतर सगळी राजकीय समीकरणं बदलणार आहेत. सध्या देशभरात महाराष्ट्रातील राजकारण (Maharashtra Politics) चांगलच चर्चेत आहे. राज्यात अतिशय वेगानं राजकीय घडामोडी घडताहेत. राज्याच्या राजकारणात अतिशय वेगाने घडामोडी घडताहेत. एकिकडे अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या सरकारमधील समावेशामुळं शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. तर दुसरीकडे आमदार मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता विधान परिषदेच्या उपसभापती असलेल्या डॉ. नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यादेखील मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळं ठाकरे गटाला आणखी एक धक्का मिळाला आहे.
राऊत शिंदेंशी संपर्क करण्याचा प्रयत्न करताहेत
दरम्यान, आज शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी मोठा खळबळजनक मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादाच्या विचारावर सुरु झाली होती. पण संजय राऊत यांच्यामुळे उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेशी आणि बाळासाहेबांच्या विचारांशी केवळ सत्तेसाठी यांनी तडजोड केली आहे, असं म्हस्के म्हणाले. संजय राऊत सत्तेवर येण्याचा प्रयत्न करत होते. संजय राऊत सत्तेचे सुत्रधार बनण्यासाठी प्रयत्न करत होते. वेगवेगळ्या सोर्सेस मार्फत प्रयत्न होते. संजय राऊत हताश होवून वैफल्यग्रस्त झालेले आहेत. सत्तेत येण्याकरिता संजय राऊत प्रयत्न करत होते. आता ते होवू न शकल्याने ते हताश झाले आहेत त्यांना नैराश्य आले आहेत. यामुळेच संजय राऊत आता मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत, असा धक्कादायक गौप्यस्फोट नरेश म्हस्के यांनी केला आहे.
ठाकरे गटाला आणखी एक धक्का…
आज पुन्हा एक ठाकरे गटाला धक्का बसला आहे. आमदार मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती असलेल्या डॉ. नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यादेखील मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळं ठाकरे गटाला आणखी एक धक्का मिळाला आहे. प्रवेशानंतर आपण बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहोत, असं निलम गोर्हे यांनी म्हटलं आहे. यावेळी निलम गोर्हे यांच्यासह पुण्यातील काही पदाधिकारी यांनी देखील शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.