मुंबई : आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या (Elections) पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिंदे गटाच्या नियुक्त्या जाहीर (Appointment Announced) केल्या. यामध्ये नेतेपदी (Leader) शिवसेनेचे (Shivsena) पाच, तर २६ उपनेत्यांचा (Deputy Leader) समावेश आहे. मात्र, शिरसाट यांना स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात शिरसाटांच्या नाराजीची पुन्हा चर्चा आहे.
यशवंतराव चव्हाण केंद्राच्या जवळ असलेल्या महिला विकास मंडळाच्या हॉलमध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीत त्यांनी या नियुक्त्या जाहिर करण्यात आल्या आहेत. २९ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई आणि ठाण्यातील एकूण ९ विभागप्रमुखांच्या नियुक्त्या जाहिर केल्या होत्या. आता नेतेपदी आणि उपनेत्यांच्या नियुक्त्या जाहीर झाल्या आहेत.
शिवसेना नेतेपदी रामदास कदम, आनंदराव अडसूळ, भावना गवळी, प्रताप जाधव, गुलाबराव पाटील यांची निवड झाली आहे. तर, उपनेतेपदी २६ जणांची नेमणूक करण्यात आली. अनिल बाबर, दादाजी भुसे, गोपीकिसन बाजोरिया, श्रीरंग बारणे, ज्ञानराज चौगुले, शंभुराज देसाई, भरत गोगावले, यशवंत जाधव, अर्जुन खोतकर, दीपक केसरकर, शीतल म्हात्रे, विजय नाहाटा, चिमणराव पाटील, हेमंत पाटील, शहाजीबापू पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील, शरद पोंक्षे, रवींद्र फाटक, संजय राठोड, उदय सामंत, तानाजी सावंत, सदा सरवणकर, राहुल शेवाळे, विजय शिवतारे, कृपाल तुमाणे, संध्या वढावकर यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान मिळेल या आशेवर असणाऱ्या संजय शिरसाट यांना एकनाथ शिंदे यांनी पुन्हा डावलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मागील महिन्यामध्ये झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये स्थान न मिळाल्याने आपली नाराजी संजय शिरसाट यांनी बोलून दाखवली होती.