Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खेड ग्रामपंचायतीत धडक कारवाई; आर्थिक अनियमिततेप्रकरणी सरपंच लता फरांदे यांची हकालपट्टी

खेड ग्रामपंचायतीतील विविध विकासकामांच्या खर्चाबाबत मागील काही महिन्यांपासून तक्रारी होत होत्या. स्थानिक नागरिक आणि काही तक्रारदारांनी निधीच्या गैरवापराबाबत प्रशासनाकडे लेखी निवेदने दिल्यानंतर पंचायत समिती स्तरावर प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 26, 2026 | 09:15 AM
खेड ग्रामपंचायतीत धडक कारवाई; आर्थिक अनियमिततेप्रकरणी सरपंच लता फरांदे यांची हकालपट्टी

खेड ग्रामपंचायतीत धडक कारवाई; आर्थिक अनियमिततेप्रकरणी सरपंच लता फरांदे यांची हकालपट्टी

Follow Us
Follow Us:

सातारा : सातारा शहरालगतच्या खेड ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. सरपंच लता फरांदे यांना पदावरून हटवण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहेत. ग्रामनिधीच्या वापरात गंभीर अनियमितता आणि लाखो रुपयांच्या अपहाराच्या आरोपांनंतर हा निर्णय घेण्यात आला असून, जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

खेड ग्रामपंचायतीतील विविध विकासकामांच्या खर्चाबाबत मागील काही महिन्यांपासून तक्रारी होत होत्या. स्थानिक नागरिक आणि काही तक्रारदारांनी निधीच्या गैरवापराबाबत प्रशासनाकडे लेखी निवेदने दिल्यानंतर पंचायत समिती स्तरावर प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली. त्यानंतर स्वतंत्र चौकशी समिती नेमून आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत ग्रामपंचायतीच्या निधीच्या खर्चात गंभीर त्रुटी आढळल्याचे समोर आले.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार सुमारे १६ लाख २७ हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचा अपहार आणि अतिरिक्त आर्थिक अनियमितता झाल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी सरपंच लता फरांदे, तत्कालीन ग्रामविकास अधिकारी अतुल जाधव आणि शाखा अभियंता एच. बी. चव्हाण यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

यापूर्वी ग्रामविकास अधिकारी अतुल जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या सुनावणीनंतर विभागीय आयुक्तांनी सरपंचांविरुद्धही कठोर निर्णय घेत पदच्युतीचे आदेश जारी केले.

प्रशासनाच्या आदेशात ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये आवश्यक नियमांचे पालन न झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच कारभारावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्याचे निरीक्षणही नोंदविण्यात आले आहे.

Ambenali Ghat Accident : आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ ८०० फूट खोल दरीत कोसळली; 8 मित्रांची अकाली एक्झिट

खेड ग्रामपंचायतीवर आमदार महेश शिंदे गटाचे वर्चस्व असून, लता फरांदे या थेट जनतेतून निवडून आलेल्या पहिल्या सरपंच होत्या. मात्र, त्यांच्या कार्यकाळात सातत्याने वाद आणि आरोपांची मालिका सुरू होती. ग्रामपंचायतीच्या कामकाजात कुटुंबीयांचा हस्तक्षेप असल्याच्या चर्चाही वारंवार रंगल्या होत्या.

दरम्यान, ग्रामपंचायतीतील सदस्य निखील यादव यांनीही निधीच्या गैरवापराबाबत गंभीर आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. या कारवाईमुळे खेडच्या स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Sarpanch lata farande dismissed over financial irregularities

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 09:15 AM

Topics:  

  • Satara News

संबंधित बातम्या

काँग्रेसने गुंडाळलेल्या योजनांना मुख्यमंत्र्यांची गती, ‘७५ वर्षे शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवले’; रवींद्र चव्हाणांचा घणाघात
1

काँग्रेसने गुंडाळलेल्या योजनांना मुख्यमंत्र्यांची गती, ‘७५ वर्षे शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवले’; रवींद्र चव्हाणांचा घणाघात

रस्त्यांवर रम्बलर बसवण्याची घोषणा हवेतच विरली; म्हसवडकरांची प्रतिक्षा कायम राहिली
2

रस्त्यांवर रम्बलर बसवण्याची घोषणा हवेतच विरली; म्हसवडकरांची प्रतिक्षा कायम राहिली

Satara News: सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, कर्जमाफीसह वीज थकबाकी माफीचा लाभ
3

Satara News: सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, कर्जमाफीसह वीज थकबाकी माफीचा लाभ

Satara News : ‘हरित साताऱ्यासाठी बिल्डर्स असोसिएशनने बळ द्यावे’; आमदार शिवेंद्रसिंहराजेंचे आवाहन, चारभिंतींलगत वृक्षारोपण अभियान
4

Satara News : ‘हरित साताऱ्यासाठी बिल्डर्स असोसिएशनने बळ द्यावे’; आमदार शिवेंद्रसिंहराजेंचे आवाहन, चारभिंतींलगत वृक्षारोपण अभियान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.