File Photo : Sassoon-hospital
Sassoon Hospital : पुण्याच्या सर्वात मोठे जिल्हा रुग्णालय असलेल्या ससून हाॅस्पिटलला आग लागल्याची माहिती मिळाली आहे. ससून हाॅस्पिटलच्या नवव्या मजल्यावर आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये नवव्या मजल्यावरील एक पेशंटच्या वार्डमधील डक्टमध्ये ठेवण्यात आलेल्या कपड्यांवर कोणीतरी जळीत सिगारेट टाकल्याने ही आग लागल्याचे प्राथमिक माहितीत कळून आले. परंतु, तत्काळ ही आग विझवण्या आल्याची माहिती आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच, कोणत्याही रुग्णाला त्रास झाला नसल्याची माहिती ससून हाॅस्पिटलचे अधीक्षक विनायक काळे यांनी दिली.
मागील काही दिवसांपासून ससून हाॅस्पिटल चांगलेच चर्चेत आहे. यामध्ये ड्रग्ज प्रकरण चांगलेच गाजले आहे. ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात येरवडा कारागृहाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना अटक केल्यानंतर आता पोलिसांनी ससून रुग्णालयातील निलंबित वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर देवकाते यांना अटक केली आहे. प्रमुख डॉक्टरांमधील दोघांना अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. देवकाते यांनी ससूनमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या ललितला मदत केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रासह पुण्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.
एक कर्मचारी आणि ससून रुग्णालयातील शिपायाला अटक
आजारी असल्याचा बहाणा करून ललित ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. त्याला कारागृहातून ससूनमध्ये पाठविण्यासाठी हेतूपरस्परमदत केल्याच्या संशयातून आणि आरोपींच्या संपर्कात असल्याने नुकतीच येरवडा कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय मरसाळे यांना अटक केली. त्यापूर्वी येरवडा कारागृहातील कौन्सिलर तसेच एक कर्मचारी आणि ससून रुग्णालयातील शिपायाला अटक केली होती.