Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara: सातारच्या अकरा वर्षाच्या लेकराची कमाल; दोन दिवसात कलावंतीण, प्रबळगड केले सर

Raghav Kiran More 11-Year-Old Mountaineer: अवघ्या ११ वर्षांच्या राघव किरण मोरे याने सह्याद्रीतील आव्हानात्मक कलावंतीण दुर्ग आणि ऐतिहासिक प्रबळगड अशी दोन दुर्गशिखरे दोन दिवसांच्या धाडसी मोहिमेत यशस्वीपणे सर केली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 05, 2026 | 08:37 PM
Raghav Kiran More

Raghav Kiran More

Follow Us
Follow Us:
  • सातारच्या लेकराची कमाल
  • अवघ्या ११व्या वर्षी धाडसी पराक्रम
  • राघवने सर केले कलावंतीण-प्रबळगड
सातारा : जिद्द, चिकाटी आणि गिर्यारोहणाची आवड असेल तर वयाचे बंधन आड येत नाही, हे अवघ्या ११ वर्षांच्या राघव किरण मोरे याने धाडसी कामगिरीतून सिद्ध केले. सह्याद्रीतील आव्हानात्मक मानला जाणारा कलावंतीण दुर्ग आणि ऐतिहासिक प्रबळगड अशी दोन दुर्गशिखरे राघवने दोन दिवसांच्या धाडसी मोहिमेत यशस्वीपणे सर केली. सातारच्या छोट्या लेकाच्या मोहिमेचे कौतुक होत आहे.

Devendra Fadnavis : २०२७ हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे वक्तव्य

या मोहिमेला शुक्रवारी पहिल्या दिवशी दुपारी १२ वाजता पायथ्यापासून सुरुवात झाली. दुपारी २.३० वाजता राघव व त्याचे सहकारी प्रबळमाचीवर पोहोचले. भोजनानंतर पुढील चढाई सुरू करण्यात आली. सुमारे अर्ध्या तासाच्या चढाईनंतर कलावंतीण दुर्गाच्या खड्या आणि आव्हानात्मक पायऱ्यांना सुरुवात झाली. अवघ्या २० मिनिटांत राघवने या कठीण पायऱ्या पार करत कलावंतीण दुर्गाचे शिखर गाठले. त्यानंतर रात्री साडेसातच्या सुमारास सुरक्षितपणे दुर्गाची उतराई करण्यात आली.

शनिवारी दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता प्रबळगडाच्या चढाईला सुरुवात झाली. अवघ्या दोन तासांत, सकाळी ८.३० वाजता राघवने प्रबळगड सर केला. दोन दिवसांच्या या मोहिमेत खड्या चढणी, अवघड पायऱ्या आणि रात्रीची उतराई अशा विविध आव्हानांना सामोरे जाताना राघवने आत्मविश्वास आणि धैर्य कायम ठेवले. या मोहिमेसाठी दुर्गनाद ट्रेकर्सचे संस्थापक गणेश शिंदे तसेच दुर्गनाद ट्रेकर्सच्या कोल्हापूर व सातारा टीमचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. राघवच्या पालकांनीही त्याच्या शारीरिक तयारीसह मोहिमेच्या सुरक्षिततेची योग्य काळजी घेतली.कलावंतीण दुर्ग हा प्रबळमाची आणि कलावंतीणीचा सुळका अशा दोन भागात विभागलेला आहे.

प्रबळ माचीवर आदिवासी बांधवांची वस्ती आहे. वाट रुंद आणि घसरणीची असून पुढे दगडात तासलेल्या ८० अंशाच्या कोनात माथ्याला भिडलेल्या एक-दिड फूट उंच पायऱ्या आहेत. कलावंतीणीच्या सुकळ्याच्या पायथ्याशी एक गुहा असून, तिचे प्रवेशद्वार लहान आहे. पायऱ्यांचा अखेरचा टप्पा पार केल्यावर कलावंतीणीचा अखेरचा २५ फुटांचा रॉकपॅच, पिनॅकलचा भाग आहे. हा काळ्या कातळांचा रॉकपॅच म्हणजे सभोवतालच्या कित्येक दुर्गांवर अन् त्याखालील प्रदेशांवर नजर ठेवण्यासाठी असलेला नैसर्गिक बुरुज म्हणता येईल. या रॉकपॅच वर दोराच्या मदतीने चढून कलावंतीण सर करता येतो.राघव हा आण्णासाहेब कल्याणी शाळेचा विद्यार्थी असून तो सध्या सहावीमध्ये शिकत आहे. त्याच्या धाडसी मोहिमेचे सर्व स्तरातून कौतुक होत असून मुलांमध्ये गड, किल्ल्याबद्दल प्रेरणादायी ठरत आहे.

राघव पहिला..

लहान वयातच गड-किल्ले आणि निसर्गाची आवड जोपासणाऱ्या राघवने या मोहिमेत दाखवलेले धाडस विशेष कौतुकास्पद ठरले आहे. अवघ्या ११ व्या वर्षी कलावंतीण दुर्ग आणि प्रबळगड सर करून त्याने बाल गिर्यारोहकांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. प्राथमिक माहितीनुसार सह्याद्रीमधील हा अवघड गड चढणारा तो पहिला लहान मुलगा आहे.

MPSC Student Protest : मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली आंदोलनाची दखल; आयोगाच्या अध्यक्ष-सदस्यांवर कारवाईसाठी मोठी शिफारस

Web Title: Satara 11 year old raghav kiran more kalavantin durg prabalgad trek

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 08:37 PM

Topics:  

  • Satara News
  • Trekking

संबंधित बातम्या

भैरवनाथाच्या देवस्थानात ‘विकासा’च्या नावाखाली सिमेंटचा मारा? काँक्रीटीकरणावर ठाकरे गटाचा सवाल; ठेकेदारावर कारवाईची मागणी
1

भैरवनाथाच्या देवस्थानात ‘विकासा’च्या नावाखाली सिमेंटचा मारा? काँक्रीटीकरणावर ठाकरे गटाचा सवाल; ठेकेदारावर कारवाईची मागणी

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी
2

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी

तिरंगा उंचावला, साताऱ्याचा डंका वाजवला! Asian Games 2026 मधल्या ‘सुवर्ण’वीरांचे भव्य स्वागत
3

तिरंगा उंचावला, साताऱ्याचा डंका वाजवला! Asian Games 2026 मधल्या ‘सुवर्ण’वीरांचे भव्य स्वागत

Satara News :गोडोली हादरले! कौटुंबिक वादातून वडिलांचा मुलीवर बॅटने हल्ला; उपचाराआधीच मृत्यू
4

Satara News :गोडोली हादरले! कौटुंबिक वादातून वडिलांचा मुलीवर बॅटने हल्ला; उपचाराआधीच मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.