Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: निशांत पाटील हाजीर हो…… भाजपाचा पहिला नगरसेवक गळाला, अपात्रतेप्रकरणी २ जूनला सुनावणी

सातारा पालिकेचे माजी नगराध्यक्ष व भाजप नेते निशांत पाटील यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी २ जून रोजी प्रांताधिकाऱ्यांसमोर सुनावणी होणार आहे. आरटीआय कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केलेल्या तक्रारीमुळे खळबळ उडाली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 19, 2026 | 03:47 PM
निशांत पाटील हाजीर हो...... भाजपाचा पहिला नगरसेवक गळाला (Photo Credit- X)

निशांत पाटील हाजीर हो...... भाजपाचा पहिला नगरसेवक गळाला (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • निशांत पाटील हाजीर हो…
  • भाजपाचा पहिला नगरसेवक गळाला
  • अपात्रतेप्रकरणी २ जूनला सुनावणी
सातारा/प्रतिनिधी: सातारा पालिकेचे माजी नगराध्यक्ष, सातारा नगरपालिकेतील भाजपाचे पक्षप्रतोद निशांत पाटील यांनी २०२५ मध्ये झालेल्या सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीवेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात जाणूनबुजून खोटी माहिती सादर केली आहे. प्रतिज्ञापत्रामध्ये बऱ्याच मिळकती या घोषित न करता तसेच शासकीय, निमशासकीय थकबाकी असतानासुध्दा निरंक लिहून दिशाभूल केली होती. याबाबत सामाजिक, माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निशांत पाटील यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन त्यांना अपात्र करण्याबाबत दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी पुराव्यानिशी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन प्रांताधिकारी यांची नियुक्ती करुन चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याबाबत आता उपविभागीय अधिकारी आशिष बारकुल यांच्या दालनात २ जून रोजी सुनावणी होणार असून या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, माजी नगराध्यक्ष, नगरसेवक आणि आता भाजपाचे सातारा नगरपालिकेतील पक्षप्रतोद निशांत पाटील यांनी निवडणुकीच्यावेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीबाबत खोटी आणि दिशाभूल करणारी तसेच अपूर्ण माहिती देऊन फसवणूक केली असल्याचे माहिती अधिकारात मिळालेल्या कागदपत्रानुसार स्पष्ट झाले होते. याबाबत त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अपात्र करावे अशी मागणी सामाजिक, माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.

निशांत पाटील हे नगराध्यक्ष राहिले असून अनेक वर्षे नगरसेवक राहिले असल्याने त्यांना कायद्याचे संपूर्ण ज्ञान आहे. त्यामुळे काय दाखवावे, काय दाखवू नये याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. तसेच अपूर्ण माहिती दाखल केल्यास तो गुन्हा होऊ शकतो याचेही त्यांना ज्ञान आहे. प्रतिज्ञापत्रामध्ये अशी दडवादडवी करणे त्यांना शोभत नाही. सध्या ते भाजपाचे पक्षप्रतोद असूनही त्यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करताना हेतुपुरस्पर खोटी माहिती दाखल केली हे गंभीर असून त्यांच्यावर तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे, त्यासाठी तक्रार करण्यात आली आहे. त्यांनी चौकशीपूर्वीच नैतिकता दाखवून राजीनामा द्यावा. मी दिलेले पुरावे सही शिक्क्याचे असून प्रतिज्ञापत्र माहिती अधिकारात प्राप्त करुन घेतले असून नंतर तक्रार केली आहे. या तक्रारीबाबत २ जून रोजी प्रांताधिकाऱ्यांच्या दालनात सकाळी ११ वाजता सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अनेक इतर नगरसेवकांचे कागदपत्रे व प्रतिज्ञापत्रे माहिती अधिकारात प्राप्त करुन घेतली असून त्याची पडताळणी सुरु आहे. ज्यांनी ज्यांनी खोटी माहिती अथवा प्रतिज्ञापत्रात स्थावर, जंगम मालमत्ता, शासकीय, निमशासकीय थकबाकी भरली नाही त्यांच्या बाबतीतही लवकरच तक्रार अर्ज दाखल करणार असल्याचा इशाराही श्री. मोरे यांनी दिला आहे.

Satara Nagarpalika News: उदयनराजेंचा कडक इशारा: सातारा पालिकेतील राड्यावर उदयनराजे भोसले संतापले

…यावेळेस तोंडपाटीलकी महागात पडणार

निशांत पाटील हे तोंडपाटीलकी करण्यात प्रसिध्द आहेत. ते करताना त्यांनी अनेकाबद्दल तसेच नेत्यांविषयीही अपशब्द वापरले आहेत. परंतु माझे काय होत नाही ही त्यांची कायम भूमिका राहिली असल्याने आजही त्यांची तोंडपाटीलकी सुरुच आहे. पण यावेळेस ते पुराव्यानिशी कायद्याच्या कचाट्यात सापडले असून आता त्यांना हीच तोंडपाटीलकी महागात पडण्याची शक्यता आहे.

प्रॉपर्टीबाबत खुलासा करावा

पक्षप्रतोद निशांत पाटील त्यांचे उत्पन्नाचे साधन काय हे त्यांनी प्रतिज्ञापत्रात लिहिलेले नाही. इतर अनेक नगरसेवक विविध व्यवसाय, उद्योगधंदे करतात परंतु निशांत पाटील यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत काय याबाबत स्पष्टता होत नाही त्यामुळे त्यांची असणारी संपत्ती ही गैरमार्गाने मिळवली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे निशांत पाटील यांनी संपत्ती कशी आली याचा खुलासा करणे आवश्यक आहे आणि तो त्यांनी न केल्यास ही संपत्ती गैरमार्गाने आल्याची शक्यता धरुन त्या संपत्तीचीही चौकशी होण्याची गरज असल्याची मागणीही श्री. मोरे यांनी केली आहे.

Satara Crime: साताऱ्यात कौटुंबिक वाद रक्तरंजित! 19 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या

Web Title: Satara bjp leader nishant patil faces enquiry over false election affidavit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 03:47 PM

Topics:  

  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara Water Crisis: साताऱ्याच्या दुष्काळी भागात पाण्यासाठी वणवण!; माण, खटाव अन् फलटणमध्ये ३५ टँकर सुरू
1

Satara Water Crisis: साताऱ्याच्या दुष्काळी भागात पाण्यासाठी वणवण!; माण, खटाव अन् फलटणमध्ये ३५ टँकर सुरू

Satara Drought: पावसाअभावी उभी पिके करपली; वाई तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची काँग्रेसची मागणी
2

Satara Drought: पावसाअभावी उभी पिके करपली; वाई तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची काँग्रेसची मागणी

Satara News: विकासाच्या नावाखाली वाईच्या ऐतिहासिक घाटांची तोडफोड; कृष्णाकाठचा शेकडो वर्षांचा वारसा धोक्यात!
3

Satara News: विकासाच्या नावाखाली वाईच्या ऐतिहासिक घाटांची तोडफोड; कृष्णाकाठचा शेकडो वर्षांचा वारसा धोक्यात!

Pune News: भावासोबत आनंदाने पोहायला गेली; काही वेळातच अनर्थ, १० वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत
4

Pune News: भावासोबत आनंदाने पोहायला गेली; काही वेळातच अनर्थ, १० वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.