Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जिल्हाधिकारी संतोष पाटील थेट दुर्गम गावात मुक्कामाला! वाईच्या उळुंब गावी भरला ‘लोकदरबार’; VIP संस्कृतीला फाटा देत पत्रावळीवर जेवण

सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी वाई तालुक्यातील अतिदुर्गम पुनर्वसित उळुंब गावाला भेट देऊन तिथे मुक्काम केला. व्हीआयपी संस्कृती बाजूला ठेवून त्यांनी गावकऱ्यांसोबत पत्रावळीवर जेवण केले आणि लोकदरबारातून समस्या सोडवल्या.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 03, 2026 | 04:46 PM
जिल्हाधिकारी संतोष पाटील थेट दुर्गम गावात मुक्कामाला!

जिल्हाधिकारी संतोष पाटील थेट दुर्गम गावात मुक्कामाला!

Follow Us
Follow Us:

 

  • जिल्हाधिकारी थेट दुर्गम गावात मुक्कामाला!
  • वाईच्या उळुंब गावी भरला ‘लोकदरबार
  • VIP संस्कृतीला फाटा देत पत्रावळीवर जेवण
सातारा दि.3 प्रतिनिधी: ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या स्थानिक पातळीवरच सोडवणे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी तपासणे आणि प्रशासन व सामान्य जनता यांच्यातील अंतर कमी करणे हे शासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. अनेकदा ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या छोट्या-मोठ्या समस्यांसाठी तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी चकरा माराव्या लागतात. यावर उपाय म्हणून, राज्याचे मुख्य सचिव यांच्या निर्देशानुसार “जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचा वाई तालुक्याच्या अंत्यंत दुर्गम व दऱ्याखोऱ्यात वसलेल्या बलकवडी धरणाच्या शेजारील पुनर्वसित उळुंब या गावी गावभेट दौरा आयोजित करण्यात आला.

या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी म्हणजेच जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी स्वतः उळुंब गावी जात, तिथे मुक्काम करून जनतेशी थेट संवाद साधून नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. ग्रामपंचायतीला आधीच या दौऱ्याबाबत सूचित करुन लोकांनी आपल्या समस्या मांडाव्यात यासाठी त्यांना अवगत करण्यात आले होते. जिल्हाधिकारी गावात पोहोचल्यानंतर सायंकाळच्या सत्रात ‘लोकदरबार’ भरवण्यात आला. यामध्ये महसूल, कृषी, आरोग्य, शिक्षण आणि पाणीपुरवठा यांसारख्या विविध विभागांच्या स्थानिक तक्रारींवर थेट चर्चा करून अनेक समस्यांचा जागेवरच निपटारा करण्यात आला.

अत्यंत दुर्गम असणाऱ्या या गावात जिल्हाधिकाऱ्यांच्या मुक्कामी येण्याने लोकांमध्ये कुतूहल, औत्सुक्य आणि आनंद या सर्वच भावनांचा संगम पहायला मिळाला. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे जिल्हाधिकारी म्हणून असणारा सर्व डामडौल बाजूला सारत गावकऱ्यांमध्ये सहज मिसळणे आणि अत्यंत साधेपणाने त्यांच्यासोबत वावरणे आणि त्यांच्याच भाषेत त्यांच्याशी आत्मीयतेने ससंवाद साधत त्यांच्या समस्या समजून घेणे यासर्वच गोष्टी गावकरी पहिल्यांदाच अनुभवत होते. या दौऱ्यात जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी व्हीआयपी संस्कृतीला फाटा देत जमीनीवर मांडी घालत बसून पत्रावळीवर रात्रीचे भोजन गावकऱ्यांसोबत केले. जिल्हाधिकारी यांच्या या साधेपणाच्या वर्तनाने सर्वच गावकऱ्यांचे मन जिंकले गेले.

‘युवकांच्या हाताला काम मिळणे हीच आजची सर्वात मोठी गरज’; देगाव येथील रोजगार मेळाव्यात खासदार उदयनराजे भोसले यांचे प्रतिपादन

या दौऱ्यात जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी गावात पॅडल बोट, जेट्टी तयार करावी. गावातील प्रत्येक कुटुंबाकडे रेशनिंग कार्ड असण्यासाठी कॅम्प घ्यावेत. याठिकाणी फळबाग लागवडीसाठी कृषि विभागाने शक्यतांची तपासणी करावी. ब्ल्यु बेरी, रास बेरी यासारखी पिकांची लागवड करावी त्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. बचत गटांची स्थापना करावी. सातबारा दुरुस्तीबाबत लोक अदालती घ्याव्यात, आवश्यक आहे त्यांना पूनर्वसितांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत त्यांना जमिनीचे वाटप करुन संबंधित दाखल्यांचे वाटप करावेत. यासाठी भूसंपादन अधिकाऱ्यांनी कॅम्प घ्यावेत. या गावात शेतकऱ्यांना श्वाश्वत उत्पन्नाचे साधन म्हणून बांबू लागवड योजना सुरु करावी. मालकपूर प्राथमिक आरोग्य केंद्राला ॲब्युलंस द्यावी. सामाजिक व आर्थिकदृष्टया मागास असणाऱ्या नागरिकांना दाखल्यांचे वितरण करावे. अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. ॲग्रीस्टॅक योजनेतील सहभागासाठी कॅम्प लावावेत.

यामध्ये गावकऱ्यांनी गावात कृषि विभागाचे कार्यालय असावे, गाव दुर्गम असल्याने गावात अॅब्युलंससाठी डिझेलची मागणी केली, कृषि पर्यटनाला चालना मिळावी व मासेमारीला परवानगी मिळावी. विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून जंगली वृक्षांची लागवड करण्यात यावी, दुर्गम भाग असल्याने वन्य प्राण्यांचा अनेकदा उपद्रव होतो त्यापासून संरक्षणाच्या उपाययोजना करण्यात याव्यात. रस्त्यांची कामे पूर्ण व्हावीत, रस्त्यांच्या दूतर्फा वृक्ष लागवड व्हावी. उळुंब गावच्या शेजारी असणाऱ्या बोरगाव येथील न्यु इंग्लीश स्कूल या शाळेत जवळपास आजूबाजूच्या अनेक गावांमधील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात, या विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या वाढवाव्यात. तसेच या शाळेच्या वसतिगृहाला शासकीय स्तरावरुन मदत मिळावी, पर्यटनाला चालना देत असताना बोटींगसाठी परवानगी मिळावी. गोळेगाव, जोर, उळुंब, गोळेवाडी या चार गावांमधील पुनर्वसनांची कामे पूर्ण होण्यासाठी शिबीर घ्यावे, उळुंबसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत सुरु करण्यात यावी. येथील तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या योजना मोठ्या प्रमाणात राबवाव्यात. पर्यटनाला चालना देण्यासाठी उळुंबचे स्वतंत्र ब्रँडींग व्हावे, होम स्टे व ॲग्रो टुरीझमसाठी मदत व्हावी. गावात झालेले अतिक्रमण नियमानुकूल करुन मिळावे, धरणग्रस्तांना बोट क्लबची परवानगी मिळावी अशा विविध मागण्या गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्याकडे केल्या.

या दौऱ्यात जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी अनेक शासकीय योजनांची पाहणी केली. गावातील जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि रास्त धान्य दुकान यांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या या ग्राम दौऱ्यात मुक्कामाच्या वेळी संबंधित प्रातांधिकारी डॉ. योगेश खरमाटे, तहसीलदार सोनाली मेटकरी, जलसंपदा विभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री बोडके, पोलीस पाटील आदी सर्व उपस्थित होते.

सातारकरांनो, लक्ष द्या! जिल्ह्यात चित्रपटसृष्टी उभारण्याचे स्वप्न होणार पूर्ण! मेघराज राजे भोसले यांचे प्रयत्न

Web Title: Satara collector santosh patil village visit ulumb wai public darbar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 04:45 PM

Topics:  

  • Satara News
  • Wai

संबंधित बातम्या

Gharkul Yojana benefits: ‘आर्थिकदृष्ट्या दुर्बल असूनही लाभ मिळेना’; घरकुलाच्या मागणीसाठी अरविंद हजारे ॲक्शन मोडमध्ये!
1

Gharkul Yojana benefits: ‘आर्थिकदृष्ट्या दुर्बल असूनही लाभ मिळेना’; घरकुलाच्या मागणीसाठी अरविंद हजारे ॲक्शन मोडमध्ये!

शेंद्रेतील कथित अतिक्रमणाविरोधात बहुजन युथ पॅंथर आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे; कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
2

शेंद्रेतील कथित अतिक्रमणाविरोधात बहुजन युथ पॅंथर आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे; कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

Women Education: जिद्द जिंकली! सातारा जिल्हा परिषदेच्या ‘सेकंड चान्स’ उपक्रमामुळे ६९७ महिलांनी पार केली दहावीची पायरी
3

Women Education: जिद्द जिंकली! सातारा जिल्हा परिषदेच्या ‘सेकंड चान्स’ उपक्रमामुळे ६९७ महिलांनी पार केली दहावीची पायरी

Satara: तारळी धरणग्रस्तांचा सातार्‍यात एल्गार! प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनिश्चितकालीन ठिय्या आंदोलन सुरू
4

Satara: तारळी धरणग्रस्तांचा सातार्‍यात एल्गार! प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनिश्चितकालीन ठिय्या आंदोलन सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.