Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सातारा एमआयडीसीच्या विकासाला वेग; उद्योगमंत्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली उच्चस्तरीय बैठक

बैठकीत सातारा एमआयडीसीच्या जुन्या व नव्या औद्योगिक क्षेत्रासाठी सुमारे १३.६९ कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली. या योजनेमुळे औद्योगिक क्षेत्राला नियमित व पुरेशा दाबाने पाणी उपलब्ध होणार असून, भविष्यातील औद्योगिक विस्तारालाही आवश्यक आधार मिळणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 22, 2026 | 08:33 AM
सातारा एमआयडीसीच्या विकासाला वेग; उद्योगमंत्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली उच्चस्तरीय बैठक

सातारा एमआयडीसीच्या विकासाला वेग; उद्योगमंत्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली उच्चस्तरीय बैठक

Follow Us
Follow Us:

सातारा : सातारा औद्योगिक वसाहतीच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्रालयात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत विविध विकासकामांना गती देणारे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत पाणीपुरवठा, एमआयडीसी विस्तार, आयटी पार्क, ट्रक टर्मिनल, कन्व्हेन्शन सेंटर, पर्यावरण संवर्धन आणि उद्योगांसमोरील प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेण्यात आली.

बैठकीत सातारा एमआयडीसीच्या जुन्या व नव्या औद्योगिक क्षेत्रासाठी सुमारे १३.६९ कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली. या योजनेमुळे औद्योगिक क्षेत्राला नियमित व पुरेशा दाबाने पाणी उपलब्ध होणार असून, भविष्यातील औद्योगिक विस्तारालाही आवश्यक आधार मिळणार आहे.

‘विश्वगुरू झुरळांना घाबरतात’; दिल्लीतील आंदोलनावरून सुषमा अंधारेंचा मोदी सरकारवर घणाघात, ‘लोकशाही शेवटचा घटका मोजत आहे’

एमआयडीसीच्या विस्तारासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश देण्यात आले. महसूल व उद्योग विभागाने संयुक्त पाहणी करून प्रकरणांचा लवकर निपटारा करावा, अशा सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या.

औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांवर होत असलेल्या दुहेरी ग्रामपंचायत कर आकारणीचा मुद्दाही बैठकीत चर्चिला गेला. मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (MAS) यांनी मांडलेल्या मागणीची दखल घेत संबंधित विभागांशी समन्वय साधून आवश्यक निर्णय घेण्याचे निश्चित करण्यात आले.

सातारा आयटी पार्क प्रकल्पालाही बैठकीत गती मिळाली. प्रकल्पासाठी आवश्यक निधी महसूल विभागाकडे जमा करण्यात आला असून, जागेचा ताबा मिळताच विकासकामांना प्रारंभ करण्यात येणार आहे. साताऱ्यात माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक वाढविण्यासाठी पुढील महिन्यात पुण्यात आयटी कंपन्यांची विशेष परिषद आयोजित करून साताऱ्यातील गुंतवणुकीच्या संधी सादर केल्या जाणार आहेत.

याशिवाय, साताऱ्यात आधुनिक सुविधांनी सुसज्ज कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यास तत्त्वतः मंजुरी देण्यात आली असून, त्यासाठी सविस्तर प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. एमआयडीसी परिसरातील मोकळ्या जागांमध्ये ‘देवराई’ संकल्पनेवर आधारित व्यापक वृक्षारोपण करण्याचाही निर्णय घेण्यात आला.

जुन्या एमआयडीसीतील ट्रक टर्मिनलचे काम लवकर पूर्ण करण्याबरोबरच औद्योगिक क्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी स्वतंत्र पोलिस ठाणे उभारण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडण्यात येणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत व मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.

या बैठकीस उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अन्बलगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्रसिंह कुशवाह, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, सातारा जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तसेच उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.

Web Title: A high level meeting was held at the mantralaya under the chairmanship of industries minister samant

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 08:33 AM

Topics:  

  • Satara News
  • Uday Samant

संबंधित बातम्या

Satara DCC Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणूक अंतिम टप्प्यात; ११ सप्टेंबरला मतदार यादी होणार प्रसिद्ध!
1

Satara DCC Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणूक अंतिम टप्प्यात; ११ सप्टेंबरला मतदार यादी होणार प्रसिद्ध!

ड्रॅगन पेटला अन् राजवाड्यात उडाली पळापळ; दोन अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात
2

ड्रॅगन पेटला अन् राजवाड्यात उडाली पळापळ; दोन अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात

Maratha Reservation : ‘गणेशोत्सवात मुंबईत येऊन अडचणी निर्माण करू नका,’ उदय सामंत यांचे मनोज जरांगेंना आवाहन
3

Maratha Reservation : ‘गणेशोत्सवात मुंबईत येऊन अडचणी निर्माण करू नका,’ उदय सामंत यांचे मनोज जरांगेंना आवाहन

Satara Ganesh Visarjan: सातारा पालिकेची यंत्रणा अलर्ट! बुधवार नाक्यावरील कृत्रिम तळ्याची नगराध्यक्षांकडून पाहणी
4

Satara Ganesh Visarjan: सातारा पालिकेची यंत्रणा अलर्ट! बुधवार नाक्यावरील कृत्रिम तळ्याची नगराध्यक्षांकडून पाहणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.