Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Fire : विद्यार्थ्यांची वेळ टळली, अनर्थ टळला; सेंट पॉलच्या कॅन्टीनमध्ये आगीचा भडका

Satara Fire : सातारा येथील सेंट पॉलच्या कॅन्टीनमध्ये अचानक आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली. सुदैवाने विद्यार्थ्यांची वेळ टळल्याने मोठा अनर्थ टळला. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा तपशील समोर येणे बाकी आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 10, 2026 | 07:11 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

Satara News : पोवई नाका परिसरातील सेंट पॉल स्कूलच्या कॅन्टीनमध्ये सोमवारी दुपारी अचानक आग भडकली. कॅन्टीनमधून धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा दिसू लागल्याने शाळा परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, शाळा सुटल्यानंतर ही घटना घडल्याने विद्यार्थी आवारात नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास कॅन्टीनमध्ये आग लागल्याचे निदर्शनास आले. कॅन्टीनमधून धूर येत असल्याचे लक्षात येताच शाळेतील शिक्षकांनी तातडीने अग्निशमन दलाशी संपर्क साधला. काही वेळातच अग्निशमन दलाचे जवान बंबासह घटनास्थळी दाखल झाले.
कॅन्टीनमध्ये मोठ्या प्रमाणावर साहित्य असल्याने आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले.

जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आले. त्यामुळे आगीची झळ कॅन्टीनलगतच्या परिसरासह शाळेच्या मुख्य इमारतीपर्यंत पोहोचण्याचा धोका टळला.

Satara : वाईच्या आठवडी बाजारात अस्वच्छ पाण्यात भाजी धुण्याचा प्रकार; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

या दुर्घटनेत कॅन्टीनमधील विविध साहित्य जळून खाक झाले असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. नुकसानीची नेमकी रक्कम अद्याप स्पष्ट झालेली नाही. प्राथमिक माहितीनुसार विद्युत शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शाळा सुटली होती. त्यामुळे आग लागली त्यावेळी शाळेत विद्यार्थी नसल्याने संभाव्य जीवितहानी टळली.

मोती चौकातील दुभाजक वर्षभरापासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत; यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे अपघाताचा धोका वाढला

अन्यथा विद्यार्थ्यांच्या गर्दीच्या वेळी अशी घटना घडली असती तर परिस्थिती गंभीर बनण्याची शक्यता होती.
दरम्यान, शाळेच्या परिसरात आग लागल्याची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळेत केलेल्या कारवाईमुळे आग अधिक पसरण्यापूर्वीच नियंत्रणात आली. असे मिळालेल्या माहिती वरून समजते आहे .

Web Title: Satara fire disaster averted as students were away fire breaks out in st pauls canteen

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 07:09 PM

Topics:  

  • Fire Incident
  • Satara District
  • Satara News

संबंधित बातम्या

Mudhaidevi Navratri Ashtami: महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी देऊरची मुधाई देवी!; अष्टमीच्या मुख्य दिनी राज्यभरातून भाविकांची गर्दी
1

Mudhaidevi Navratri Ashtami: महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी देऊरची मुधाई देवी!; अष्टमीच्या मुख्य दिनी राज्यभरातून भाविकांची गर्दी

Satara Water Crisis News: १४ कोटींची योजना पूर्ण, तरीही पाण्यासाठी संघर्ष; प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टिमेटम
2

Satara Water Crisis News: १४ कोटींची योजना पूर्ण, तरीही पाण्यासाठी संघर्ष; प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टिमेटम

Sangli Bank Election : सातारा बँकेच्या निकालाने सांगलीत खळबळ; चार संचालकांच्या उमेदवारीवर टांगती तलवार?
3

Sangli Bank Election : सातारा बँकेच्या निकालाने सांगलीत खळबळ; चार संचालकांच्या उमेदवारीवर टांगती तलवार?

Satara News : सातारा जिल्हा बँक निवडणुकीत न्यायालयीन ट्विस्ट! १० उमेदवारांच्या पात्रतेची चर्चा; २१ ऑक्टोबरकडे लक्ष
4

Satara News : सातारा जिल्हा बँक निवडणुकीत न्यायालयीन ट्विस्ट! १० उमेदवारांच्या पात्रतेची चर्चा; २१ ऑक्टोबरकडे लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.