Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mudhaidevi Navratri Ashtami: महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी देऊरची मुधाई देवी!; अष्टमीच्या मुख्य दिनी राज्यभरातून भाविकांची गर्दी

Mudhaidevi Navratri Ashtami नवरात्र उत्सवात देवीची दररोज सकाळ आणि संध्याकाळ पालखी मिरवणूक गावातून काढण्यात येते यावेळी गावातील महिला भक्त देवीचे दर्शन घेतात तर अष्टमी दिवशी दुपारी बारा वाजता मंदिरातून पालखी मिरवणूक निघते.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 17, 2026 | 04:45 PM
Deur, Mudhaidevi, Satara News, Koregaon, Navratri Festival

Deur, Mudhaidevi, Satara News, Koregaon, Navratri Festival

Follow Us
Follow Us:
  • कोरेगाव तालुक्यातील देऊर येथे श्री मुधाईदेवीचा शारदीय नवरात्रोत्सव संपन्न
  • अष्टमीच्या मुख्य दिवशी कडकणी व धपाटे नैवेद्यासह भाविकांची प्रचंड गर्दी
  • कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीचे प्रतिरूप मानल्या जाणाऱ्या देवीवर भाविकांची अपार श्रद्धा
Mudhaidevi Navratri Ashtami: कोल्हापूर येथील महालक्ष्मीचे प्रतिरूप असलेल्या कोरेगाव तालुक्यातील मुधाई देवी चा शारदीय नवरात्र उस्तव मोठया उत्साहात सुरू असून आज रविवार अष्टमी हा या देवीच्या यात्रेचा मुख्यदिवस असल्याने या दिवशी पहाटेपासूनच राज्यभरातील भाविक कडकणी धपाटे नैवेद्यसह देवीच्या दर्शनासाठी उपस्थित राहतात.

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात वसना नदीच्या काठावर वसलेले देऊर गाव ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक वारशासाठी प्रसिद्ध आहे. या गावाचे ग्रामदैवत असलेल्या श्री मुधाईदेवीच्या प्राचीन परंपरेचा वारसा लाभला आहे. कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या मुधाईदेवीवर पंचक्रोशीतील हजारो भाविकांची अपार श्रद्धा आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून तिची ख्याती दूरवर पसरली आहे.

Cancer: कॅन्सरच्या महागड्या तपासणीचा खर्च वाचणार! महाराष्ट्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

देऊर गावाला ऐतिहासिक महत्त्वही लाभले आहे. नागपूरकर भोसले घराण्याचे संस्थापक रघुजी भोसले यांचे हे मूळ गाव मानले जाते. छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना देऊरचे वतन दिले होते. रघुजी भोसले यांनी पुढे नागपूर येथे आपली राजधानी स्थापन केली. त्यांच्या ऐतिहासिक वारशाची साक्ष देणारा राजवाडा आजही देऊरमध्ये पाहायला मिळतो.

मुधाईदेवीच्या आगमनाची आख्यायिका :-

देऊरपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या दहिव गाव येथील मुधोजीराव चव्हाण हे कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीची अनेक वर्षे सेवा करीत होते. वृद्धापकाळामुळे कोल्हापूरला जाणे शक्य नसल्याने त्यांनी देवीला आपल्या गावी येण्याची विनंती केली. त्यांच्या भक्तीने प्रसन्न झालेल्या देवीने त्यांच्या मागून येण्याचे मान्य केले; मात्र गावात पोहोचेपर्यंत मागे वळून पाहू नये, अशी अट घातली.

मुधोजीराव पुढे चालू लागले आणि देवी बालिकेच्या रूपात त्यांच्या मागून येऊ लागली. देऊरच्या टेकडीजवळ देवीच्या पायातील नुपूरांचा आवाज थांबल्याने मुधोजीरावांनी मागे वळून पाहिले. त्याच क्षणी वीज कडाडल्याचा आवाज झाला आणि देवी तेथेच अंतर्धान पावली. त्या ठिकाणी आपले वास्तव्य राहील, असे देवीने सांगितल्याची आख्यायिका आहे. मुधोजीरावांच्या स्मृतीप्रित्यर्थ देवीला मुधाईदेवी हे नाव प्राप्त झाले. आश्विन शुद्ध अष्टमीला देवीची पूजा आणि पालखीचा पहिला मान आजही चव्हाण घराण्याकडे आहे.

Maharashtra Drought 2026: दुष्काळाचा हाहाकार! पाच दुष्काळ पाहिलेल्या ९५ वर्षीय वृद्धाची हृदयद्रावक हाक

हेमाडपंथी स्थापत्यशैलीतील मंदिर :-

अठराव्या शतकात रघुजीराजे भोसले यांनी देऊरमध्ये मुधाईदेवीचे भव्य मंदिर बांधल्याचे सांगितले जाते. वसना नदीच्या पूर्व किनाऱ्यावर असलेल्या या मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी शैलीशी साधर्म्य दर्शविते. जमिनीखालील गुहेसारख्या गर्भगृहात देवीची स्वयंभू मूर्ती विराजमान आहे. मंदिराभोवती भक्कम दगडी तटबंदी, प्रवेशद्वारावरील नगरखाना, दीपमाळा आणि यात्रेकरूंसाठी दगडी ओवऱ्या आहेत. मंदिर परिसरातील गणपती, महादेवाची पिंड आणि मुधोजीराव चव्हाण यांची शिळा या स्थानाचे धार्मिक महत्त्व अधोरेखित करतात.

नवरात्रोत्सवातील भक्तीचा जागर :-

मुधाईदेवी मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत विविध धार्मिक विधी, महापूजा आणि पालखी सोहळे पार पडतात. दुर्गाष्टमीला देवीची पालखी स्नानासाठी निघते. रात्री छबिना मिरवणुकीत गावातील मंदिरांना आणि मानकर्यांच्या घरांना भेट दिली जाते. दसऱ्याच्या दिवशी भगवी पताका फडकवत देवीच्या विजयाची मिरवणूक काढली जाते. या उत्सवात गावकरी, मानकरी आणि सेवेकरी मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात.

मंगळवार, शुक्रवार, अमावस्या आणि पौर्णिमेला मंदिरात भाविकांची गर्दी असते. देवीची नित्यपूजा, नैवेद्य, गोंधळ आणि कौल घेण्याची परंपरा आजही जपली जाते. नागपंचमीला मुधाईदेवी आपल्‍या बंधू मानल्या जाणाऱ्या काळभैरवनाथाच्या मंदिरात जाते, अशी श्रद्धा आहे.

Car Fire Accident: काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! तारळी नदी पुलाजवळ कारचा आगीचा भडका

अष्टमीपालखी सोहळ्याचा मान दहिगाव कर ग्रामस्थांचा

नवरात्र उत्सवात देवीची दररोज सकाळ आणि संध्याकाळ पालखी मिरवणूक गावातून काढण्यात येते यावेळी गावातील महिला भक्त देवीचे दर्शन घेतात तर अष्टमी दिवशी दुपारी बारा वाजता मंदिरातून पालखी मिरवणूक निघते.  यावेळी दहिगावं मधील चव्हाण बंधूना पालखी चा मान दिला जातो.  आजही दहिगाव मधील ग्रामस्थ या सोहळ्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहतात. श्री मुधाईदेवी हे केवळ देऊर गावाचे ग्रामदैवत नसून येथील लोकांच्या श्रद्धेचे, संस्कृतीचे आणि ऐतिहासिक परंपरेचे प्रतीक आहे. पिढ्यानपिढ्या जपल्या गेलेल्या धार्मिक विधी आणि उत्सवामुळे या देवस्थानाचे महत्त्व आजही कायम आहे. भक्तांच्या मनात वसलेली मुधाईमातेची श्रद्धा देऊरच्या सांस्कृतिक वैभवाला अधिक उजाळा देते.

श्री गुलाबसिंग कदम
कुलमुखत्यार श्री मुधाई देवी देवस्थान

 

Web Title: Sataradeur mudhaidevi navratri ashtami festival koregaon history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 04:45 PM

Topics:  

  • Koregaon
  • Navratri festival
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara Water Crisis News: १४ कोटींची योजना पूर्ण, तरीही पाण्यासाठी संघर्ष; प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टिमेटम
1

Satara Water Crisis News: १४ कोटींची योजना पूर्ण, तरीही पाण्यासाठी संघर्ष; प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टिमेटम

Navratri 2026: नवरात्रीचा सातवा दिवस कालरात्री देवीला समर्पित, कशी करावी पूजा आणि महत्त्व
2

Navratri 2026: नवरात्रीचा सातवा दिवस कालरात्री देवीला समर्पित, कशी करावी पूजा आणि महत्त्व

Navchandi Puja: शारदीय नवरात्रीत नवचंडी पूजा का केली जाते? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
3

Navchandi Puja: शारदीय नवरात्रीत नवचंडी पूजा का केली जाते? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Navratri 2026: नवरात्रीचा सहावा दिवस कात्यायनी देवीला समर्पित, कशी करावी देवीची पूजा
4

Navratri 2026: नवरात्रीचा सहावा दिवस कात्यायनी देवीला समर्पित, कशी करावी देवीची पूजा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.