Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: पर्यटनस्थळ की मौजमजेचा अड्डा? मंडपघळ परिसरातील अस्वच्छतेवर नागरिक संतप्त

सातारा जिल्ह्यातील परमाळे परिसरातील ऐतिहासिक आणि निसर्गरम्य मंडपघळ पर्यटनस्थळाची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी केला आहे. परिसरात वाढलेला कचरा, मद्याच्या बाटल्या आणि अस्वच्छतेमुळे या प्राचीन वारसा स्थळाचे पावित्र्य धोक्यात आल्याची भावना व्यक्त होत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 16, 2026 | 05:12 PM
पर्यटनस्थळ की मौजमजेचा अड्डा? मंडपघळ परिसरातील अस्वच्छतेवर नागरिक संतप्त

पर्यटनस्थळ की मौजमजेचा अड्डा? मंडपघळ परिसरातील अस्वच्छतेवर नागरिक संतप्त

Follow Us
Follow Us:
  • मंडपघळ पर्यटनस्थळाचा विद्रूप चेहरा
  • दारू पार्ट्या, कचऱ्याचा विळखा आणि प्रशासनाची उदासीनता
  • मंडपघळ परिसरातील अस्वच्छतेवर नागरिक संतप्त
सातारा : सातारा जिल्ह्यातील परमाळे परिसरातील ऐतिहासिक आणि निसर्गरम्य मंडपघळ या प्रसिद्ध पर्यटनस्थळाची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, या प्राचीन वारसा स्थळाचे पावित्र्य धोक्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी केला आहे. पर्यटनस्थळाच्या परिसरात कथितपणे सुरू असलेल्या व्यावसायिक उपक्रमांमुळे येथे मोठ्या प्रमाणात कचरा, मद्याच्या बाटल्या आणि अस्वच्छता पसरल्याचे चित्र समोर आले आहे.

मंडपघळ ही केवळ एक नैसर्गिक गुहा नसून स्थानिक इतिहास आणि लोकपरंपरेशी जोडलेले महत्त्वाचे स्थळ मानले जाते. सज्जनगडाशी पाण्यामार्गे जोडलेली असल्याची लोकश्रद्धा असल्याने तसेच येथील शांत, थंड आणि निसर्गसंपन्न वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून पर्यटक येथे भेट देतात. मात्र, अलीकडच्या काळात या ठिकाणाचा वापर मौजमजा आणि मद्यपानासाठी होत असल्याने पर्यटकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

Satara Crime: दहिवडी पोलिसांची मोठी कारवाई; कंपनीचे अॅल्युमिनियम तारा चोरणारे चार आरोपी गोंदियातून जेरबंद

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही महिन्यांपासून परिसरात व्यावसायिक स्वरूपाचे उपक्रम सुरू झाले आहेत. मात्र, संबंधितांकडून स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाची कोणतीही जबाबदारी घेतली जात नसल्याचा आरोप आहे. परिणामी गुहेच्या परिसरात प्लास्टिक कचरा, पाण्याच्या बाटल्या, मद्याच्या रिकाम्या बाटल्या आणि इतर टाकाऊ साहित्याचा ढीग साचत असल्याचे दिसून येत आहे. “पर्यटनाच्या नावाखाली पैसा कमावण्याचा उद्योग सुरू आहे; मात्र या प्राचीन स्थळाच्या जतनाची कोणालाही पर्वा नाही. निसर्ग आणि इतिहासाचा वारसा जपण्याऐवजी त्याची अक्षरशः विटंबना केली जात आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली.

विशेष म्हणजे, मंडपघळसारख्या संवेदनशील पर्यटनस्थळी कोणतेही नियंत्रण नसल्याने दारू पार्ट्या आणि असामाजिक प्रकारांना खतपाणी मिळत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कुटुंबासह येणाऱ्या पर्यटकांनाही त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगितले जाते. स्थानिक ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासन, वन विभाग आणि पर्यटन विभागाने तातडीने हस्तक्षेप करून मंडपघळ परिसरातील अतिक्रमण, अस्वच्छता आणि बेकायदेशीर प्रकारांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा साताऱ्याच्या या ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारसा स्थळाचे अस्तित्वच धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. “पर्यटन विकासाच्या नावाखाली वारशाचा विनाश थांबवा; मंडपघळ वाचवा,” अशी आर्त हाक आता स्थानिक नागरिकांकडून दिली जात आहे.

पाटण शहरातील अतिक्रमणांवर कारवाई न केल्यास आंदोलन करू, सामाजिक कार्यकर्ते नितीन पिसाळ यांचा इशारा

Web Title: Satara mandapghal tourist place poor condition garbage liquor concern

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 05:12 PM

Topics:  

  • maharashtra
  • Satara
  • Tourism news

संबंधित बातम्या

सातारा वनविभागाला वन्यजीव बचावासाठी आधुनिक बळ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रुग्णवाहिका आणि रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण
1

सातारा वनविभागाला वन्यजीव बचावासाठी आधुनिक बळ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रुग्णवाहिका आणि रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल
2

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान
3

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
4

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.