Satara Crime News जावलीत गुंडगिरी अन् दहशत सहन करणार नाही; अंकुशबाबा कदमांचा सत्ताधाऱ्यांना थेट इशारा
पंचायत समिती सदस्य अतिष कदम यांच्यावरील पोलीस ठाण्यात झालेल्या हल्यातील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. तसेच उषा उंबरकर यांच्यावरील झालेल्या अन्याया विरोधात आज मेढा येथे सर्व पक्षीय मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चा दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये बोलताना नगरसेवक अंकुशबाबा कदम पुढे म्हणाले की, अतिष कदमांच्या घरासमोर गुलाल उधळने आणि फटाके फोडणे, अरे त्यांच्या घरात दोन महिण्याचे बाळ असताना घरात फटाके जाईपर्यंत फटाके फोडताय एवढा कसला उन्माद, सत्तेचा माज आणि सत्तेची मस्ती पाहीजे असा सवाल करत ते म्हणाले, एका महिलेला उषा कुठ गेलीस, कोणत्या बिळात गेलीस असे म्हणणे म्हणजे हा सत्तेचा उन्माद झाला अशी टिका कदम यांनी केली.
रस्त्यांची कामे ओरबडून घ्यायची, ठेकेदार बनायचे, ठेके घ्यायचे त्यातून पैसा मिळवायचा आणि माज करायचा पण हा माज आम्ही उतवल्याशिवाय राहणार नाही असा दम यावेळी अंकुशबाबा कदम यांनी दिला. छत्रपतींना आम्ही माननारे आहोत पण तालुक्यात दहशत गुंडगिरी आता आम्ही सहन करणार नाही. जनता सुज्ञ आहे. परळी भागात एक वाल्मिक कराड तयार केलाय आणि जावलीत एक वाल्मिक कराड तयार केला पण जावलीतील जनता हे कदापी सहन करणार नाही. दुंद गावाला पाणी देणाऱ्यांना मंत्र्यांनी दम द्यायचा एवढी वाईट अवस्था आहे पण हा माज आम्ही उतविण्याचे काम करू असे ठणकावून कदम यांनी सांगितले.
Raigad News: अनेक महिन्यांची प्रतीक्षा संपणार! उरणमधील खोपटा पुलाचे काम अंतिम टप्प्यात, दिवाळीत सु
दुपारी वेण्णा चौका पासून निषेध मोर्चाला सुरुवात होऊन मेढा पोलीस ठाण्यावर नेण्यात आला. मेढा येथील मुख्य चौकात एकनाथ ओंबळेंसह प्रमुख मंडळींची भाषणे झाली. या मोर्चामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे आदी पक्षाचे नेते कार्यकर्ते सहभागी झाले होते. या मोर्चामध्ये एकनाथ ओंबळे, सुनिता ओंबळे, सुनिता दुंदळे, शिल्पा शिंद, मोहनराव शिंदे, सुरेश पार्टे, समीर गोळे, सचिन करंजेकर, सोनाली पवार, रणधीर गोरे, सचिन जवळ, नारायण शिंगटे, राम कदम आदी तालुक्यातील महिला पुरुष वर्ग या निषेध मोर्चामध्ये सहभागी झाले होते.
मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी निवेदन स्विकारताना दोन जणांना अटक केली असल्याचे सांगुन तिसरा आरोपी आज रात्रीपर्यंत अटक करणार असल्याचे आश्वासन दिले.
दरम्यान यावेळी नेते एकनाथ ओंबळे म्हणाले जावळीकर शांत सयंमी आहेत.मात्र काहींना जावळीचा बिहार बनवायचा आहे.हे जावळीकर कदापि सहन करणार नाहीत.जिल्हा परिषद निवडणुकीत आपली जागा येथील जनतेने दाखवली आहे.






