Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : पाच हजारांच्या पहिल्या हप्त्यासाठी स्वाभिमानीने महामार्ग रोखला! नागठाण्यात शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

Satara News : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाच हजार रुपये प्रतिटन पहिल्या हप्त्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. साताऱ्यातील नागठाणे येथे महामार्गावर ठिय्या आंदोलन करत ऊस वाहतूक रोखण्यात आली.

  • By विवेक
Updated On: Nov 03, 2026 | 10:24 PM
satara sugarcane protest

satara sugarcane protest

Follow Us
Follow Us:
  • स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
  • राजू शेट्टींच्या आदेशानुसार नागठाण्यात आंदोलन
  • राजू शेळके आणि अर्जुन पवार यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या
 

सातारा, प्रतिनिधी : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चालू गळीत हंगामात उसाचा प्रतिटन किमान पाच हजार रुपये पहिला हप्ता मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेत सातारा जिल्ह्यात महामार्ग रोखला. नागठाणे व परिसरात संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी सकाळपासूनच रस्त्यावर ठिय्या देत ऊस वाहतूक रोखली. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतुकीचा बोजवारा उडाला. दिवाळीच्या तोंडावर सुरू झालेल्या या आंदोलनाने साखर कारखानदारांचे धाबे दणाणले आहेत. (Satara News)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या निर्देशानुसार जिल्हाध्यक्ष राजू शेळके आणि अर्जुन पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. नागठाणे येथे आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या मांडत ऊस दराच्या प्रश्नावर शासन आणि साखर कारखानदारांविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला. उसाला पाच हजार रुपये प्रतिटन दर जाहीर केल्याशिवाय कारखान्यांकडे ऊस पाठवू नये, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे.

आंदोलनामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर, ट्रक आणि ट्रॅक्टर-ट्रॉलींची वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली. महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याने परिस्थिती संवेदनशील बनली होती. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला. आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली असली तरी रुग्णवाहिका आणि एसटी बस यांना आंदोलनातून सूट देण्यात आली. त्यामुळे अत्यावश्यक सेवा आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

DCC Bank Election Result : तीन जिल्हा बँकांचे निकाल जाहीर! सातारा, सांगली, अहिल्यानगरमध्ये कोणाची सत्ता?

ऊस उत्पादनासाठी लागणारा वाढता उत्पादन खर्च, मजुरी, खते आणि वाहतूक खर्च लक्षात घेता सध्याचा ऊस दर परवडणारा नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे पाच हजार रुपये प्रतिटन पहिला हप्ता मिळाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.

राज्य शासनाने ऊस दराबाबत ठोस भूमिका जाहीर करावी आणि शेतकऱ्यांच्या मागणीला न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दराचा प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम आणि ऊस वाहतूक यावर या आंदोलनाचे सावट राहण्याची शक्यता आहे.

Satara Dictrict Bank Election : जावळीत शिवेंद्रराजेंच्या निष्ठावंताचा डंका! ज्ञानदेव रांजणे यांचा जिल्हा बँक निवडणुकीत दणदणीत विजय

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन का केलं?

    Ans: चालू गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन किमान ५ हजार रुपये पहिला हप्ता मिळावा, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं.

  • Que: साताऱ्यात नेमकं कुठे आंदोलन करण्यात आलं?

    Ans: सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी महामार्गावर ठिय्या आंदोलन केलं.

  • Que: आंदोलनाचं नेतृत्व कोणी केलं?

    Ans: राजू शेट्टी यांच्या निर्देशानुसार जिल्हाध्यक्ष राजू शेळके आणि अर्जुन पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं.

Web Title: Satara news swabhimani shetkari sanghatana satara sugarcane farmers protest vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 10:24 PM

Topics:  

  • Raju Shetti
  • Satara News
  • Swabhimani Shetkari Sanghatana

संबंधित बातम्या

DCC Bank Election Result : तीन जिल्हा बँकांचे निकाल जाहीर! सातारा, सांगली, अहिल्यानगरमध्ये कोणाची सत्ता?
1

DCC Bank Election Result : तीन जिल्हा बँकांचे निकाल जाहीर! सातारा, सांगली, अहिल्यानगरमध्ये कोणाची सत्ता?

Satara Dictrict Bank Election : जावळीत शिवेंद्रराजेंच्या निष्ठावंताचा डंका! ज्ञानदेव रांजणे यांचा जिल्हा बँक निवडणुकीत दणदणीत विजय
2

Satara Dictrict Bank Election : जावळीत शिवेंद्रराजेंच्या निष्ठावंताचा डंका! ज्ञानदेव रांजणे यांचा जिल्हा बँक निवडणुकीत दणदणीत विजय

Raju Shetti: राजू शेट्टींच्या आंदोलनाआधीच पोलिसांची नोटीस; किणी टोल नाक्यावर चक्काजाम केल्यास कारवाईचा इशारा
3

Raju Shetti: राजू शेट्टींच्या आंदोलनाआधीच पोलिसांची नोटीस; किणी टोल नाक्यावर चक्काजाम केल्यास कारवाईचा इशारा

Satara Water Management : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी नियोजनाचे मोठे निर्णय! मंत्री शंभूराज देसाईंचे महत्त्वाचे निर्देश
4

Satara Water Management : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी नियोजनाचे मोठे निर्णय! मंत्री शंभूराज देसाईंचे महत्त्वाचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.