Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Water Crisis: विहिरीत उतरले मळीमिश्रित पाणी; जावळीतील नेवेकरवाडीत पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न

नेवेकरवाडी साठी दोन वर्षापूर्वीच जलजीवन मिशन मधून नवीन विहिर बांधून पूर्ण आहे मात्र त्यासाठी ट्रान्सफार्मर अजून उपलब्ध न झाल्याने ती कार्यान्वित नाही.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 13, 2026 | 01:32 PM
Satara, Javali, Shiv Sena, Water Crisis, Maharashtra News

Satara, Javali, Shiv Sena, Water Crisis, Maharashtra News

Follow Us
Follow Us:
  • ओढ्यातील मळीमिश्रित पाण्याचा पाझर सुटल्याने सार्वजनिक विहिरीतील पाणी पूर्णपणे काळे
  • दोन महिने समस्या असूनही स्थानिक प्रशासन व जलजीवन यंत्रणा अनभिज्ञ
  • दोन दिवसांत समस्येचे निवारण न झाल्यास अधिकाऱ्यांना दूषित पाणी पाजण्याचा सेनेचा इशारा
Satara News: नेवेकरवाडी (ता. जावळी) येथील सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरीत लगतच्या ओढ्यातून दूषित पाण्याचा पाझर होत असल्याने ग्रामस्थासह महिलांना ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकत फिरावे लागत आहे. मळीमिश्रित पाणी संबंधित ओढ्यात सोडले जात असल्यानेच विहिरीतील पाणी दूषित झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून दोन दिवसात हा प्रश्न न सोडवल्यास शिवसेनेकडून अधिकार्यांना दूषित पाणी पाजण्याचा इशारा देण्यात आला आहे.

करंदोशी व नेवेकरवाडी ही ग्रुप ग्रामपंचायत असून त्यापैकी नेवेकरवाडी साठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. ही विहीर ज्या ओढ्यालगत आहे. या विहिरीला पाणी वाढण्यासाठी आडवे बोअर मारले आहेत हे बोअर ओढ्याच्या दिशेने आहेत व याच पाईपमधून ओढ्यातील दूषित पाणी विहिरीत येते. त्यामुळे विहिरीतील पाणी पूर्णपणे काळे पडले असून त्याला मळीचा वास देखील येत आहे.

MSRTC Smart Card : 1 सप्टेंबरपासून एसटी प्रवासासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य;

विशेषत पावसाळ्यात पाणी दूषित होण्याचा प्रकार जास्त असून हे पाणी गुरेढोरे सुद्धा पित नाहीत असा ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हे पाणी पिण्यायोग्य नाही त्यामुळे ग्रामस्थ व महिलावर्गाला पाण्यासाठी वणवण भटकत फिरावे लागत आहे. विशेष म्हणजे दोन महिन्यापासून हा प्रकार असून देखील प्रशासन मात्र त्याबाबत अनभिज्ञ आहे.

नेवेकरवाडी साठी दोन वर्षापूर्वीच जलजीवन मिशन मधून नवीन विहिर बांधून पूर्ण आहे मात्र त्यासाठी ट्रान्सफार्मर अजून उपलब्ध न झाल्याने ती कार्यान्वित नाही.

रायगडमध्ये पावसाची स्थिती गंभीर; 2470.6 मिमी पाऊस, पनवेलमध्ये 5 जणांचा मृत्यू

गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याचा प्रश्न गावाला भेडसावत असून त्यासाठी ग्रामस्थांनी ग्रामविकास अधिकार्यांना याची कल्पना देऊनही संबंधितांनी आजपर्यंत त्यावर कोणतीच हालचाल केली नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.

गावात सध्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्यामुळे तसेच संबंधित विहिरीचे पाणी आरोग्यास धोकादायक असल्याने पाण्याचे जार विकत घ्यावे लागत आहेत.

 

Web Title: Javali nevekarwadi well water polluted villagers face water crisis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 12:59 PM

Topics:  

  • Satara

संबंधित बातम्या

म्हसवड येथे संत नामदेव महाराजांचा ६७६ वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात संपन्न
1

म्हसवड येथे संत नामदेव महाराजांचा ६७६ वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात संपन्न

Satara News: अर्जांच्या पाठपुराव्याला पालकमंत्री कार्यालयाचा वेग; वर्षभरात १,२३६ प्रकरणे मार्गी
2

Satara News: अर्जांच्या पाठपुराव्याला पालकमंत्री कार्यालयाचा वेग; वर्षभरात १,२३६ प्रकरणे मार्गी

Umbraj News: उंब्रज जिल्हा परिषद शाळेत निकृष्ट कामामुळे ग्रॅनाईट कोसळले; ३ विद्यार्थी जखमी; शिक्षण सभापती तेजस्विनी कदम आक्रमक!
3

Umbraj News: उंब्रज जिल्हा परिषद शाळेत निकृष्ट कामामुळे ग्रॅनाईट कोसळले; ३ विद्यार्थी जखमी; शिक्षण सभापती तेजस्विनी कदम आक्रमक!

Wai News: वाई शहरात पोलिसांचा धाक उरलाय की नाही? बेकायदेशीर गुटखा विक्री, ट्रिपल सीट अन् बुलेटच्या फटाक्यांनी वाईकर हैराण
4

Wai News: वाई शहरात पोलिसांचा धाक उरलाय की नाही? बेकायदेशीर गुटखा विक्री, ट्रिपल सीट अन् बुलेटच्या फटाक्यांनी वाईकर हैराण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.