Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara : सामाजिक कार्यकर्त्यांचे आत्मक्लेश आंदोलन, सोनम वांगचूक यांना पाठिंबा देत पोलिसांच्या कारवाईबद्दल व्यक्त केली नाराजी

साताऱ्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आत्मक्लेश आंदोलन केले. पेपरफुटीप्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत दिल्ली पोलिसांच्या कारवाईवरही नाराजी व्यक्त करण्यात आली.

  • By विवेक
Updated On: Jul 18, 2026 | 07:02 PM
साताऱ्यात सामाजिक कार्यकर्त्यांनी सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आत्मक्लेश आंदोलन

साताऱ्यात सामाजिक कार्यकर्त्यांनी सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आत्मक्लेश आंदोलन

Follow Us
Follow Us:

सातारा / प्रतिनिधी : देशातील महत्वाच्या परीक्षांच्या पेपरफुट प्रकरणी लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा म्हणून सोनम वांगचुक यांचे दिल्ली येथील आंदोलन व त्यांच्या भूमिकेला पाठींबा देण्यासाठी सातारा येथील भूविकास चौकामध्ये सातारा जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने शनिवारी आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. यावेळी सोनम वांगूचक यांना पाठिंबा देत दिल्ली पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केले या पोलिसांच्या कारवाईबद्दल नाराजीसुध्दा यावेळी व्यक्त केली.

देशातील शिक्षण व्यवस्थेमधील वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांनी लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू आहे. मेहनत करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत करणाऱ्या या प्रकारांमुळे संपूर्ण परीक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सोनम वांगचुक प्रकरणावर सुषमा अंधारे आक्रमक; ‘सरकार पुरस्कृत गुंड’ म्हणत भाजप आणि पोलिसांवर निशाणा

या प्रकरणी सर्वाच्च जबाबदारी असलेले केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा किंवा केंद्र शासनाने त्यांना या पदावरुन हटवावे या रास्त मागणीसाठी सोनम वांगचुक यांनी जंतर-मंतर येथे मागील २० दिवसापासून बेमदुत उपोषण सुरु केले आहे. सोनम वांगचुक यांच्या या धाडसी व प्रमाणिक आवाजाला बळ देणेसाठी सातारा जिल्हयातील सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांच्यातर्फे शनिवारी भू विकास चौकातील हुतात्मा स्मारकासमोर आत्मक्लेश आंदोलन केले. यावेळी प्रशासनाला निवेदनही देण्यात आले.

सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक, ‘हे भ्याड सरकार आहे,’ म्हणत केला हल्लाबोल

या निवेदनात देशात युवक आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड करणारी कोणतीही व्यवस्था स्वीकारली जावू नये शिक्षण क्षेत्रातील परिक्षांमध्ये पारदर्शक, विश्वासार्ह आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षण व्यवस्था उभारण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावेत. ही आग्रही मागणी करण्यात आली.

या आंदोलनामध्ये शिवाजी जाधव, महारुद्र तिकुंडे, मोहन शिंदे, सुशांत मोरे, हणमंत शिंदे, कैलास कुंभार, महेंद्र बाचल, भारत जगताप, ॲड.मंगेश महामुलकर, एकनाथ सकपाळ, गुलाब बनसोडे, सादिकअली बागवान, गणेश अहिवळे, प्रशांत जाधव, प्रज्वल तिकुंडे, भारत रावळ, संदिप जाधव, विनोद कदम, दत्तात्रय जाधव, धनंजय कदम, सागर भोगावकर हे सहभागी झाले होते.

Web Title: Satara sonam wangchuk support protest paper leak dharmendra pradhan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 07:02 PM

Topics:  

  • NEET exam scam
  • Satara News
  • Sonam Wangchuk

संबंधित बातम्या

Wai News : दिव्यांग शेतकऱ्याच्या उपोषणाकडे प्रशासनाची डोळेझाक; तामखडा शिवारात 1500 ग्रामस्थांचा ठिय्या
1

Wai News : दिव्यांग शेतकऱ्याच्या उपोषणाकडे प्रशासनाची डोळेझाक; तामखडा शिवारात 1500 ग्रामस्थांचा ठिय्या

Maratha Reservation : कराड-चिपळूण मार्गावर ‘रास्ता रोको’, वारुंजी फाट्यावर भगवे वादळ!
2

Maratha Reservation : कराड-चिपळूण मार्गावर ‘रास्ता रोको’, वारुंजी फाट्यावर भगवे वादळ!

Satara News: सातारा जिल्ह्यात आरोग्य आणि शिक्षणाचा विकास; स्मार्ट आरोग्य केंद्रे व आदर्श शाळांसाठी कोट्यवधींचा निधी
3

Satara News: सातारा जिल्ह्यात आरोग्य आणि शिक्षणाचा विकास; स्मार्ट आरोग्य केंद्रे व आदर्श शाळांसाठी कोट्यवधींचा निधी

Satara News : बावधन परिसरात खाणपट्ट्याविरोधात आमरण उपोषण सुरू
4

Satara News : बावधन परिसरात खाणपट्ट्याविरोधात आमरण उपोषण सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.