Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: ‘साडेचार हजारांशिवाय माघार नाही’… ऊस उत्पादकांचा एल्गार कायम; महामार्गावरील आंदोलन पेटले

Satara Sugarcane Price Protest: साताऱ्यात ४५०० रुपये ऊसदराच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्गावर आंदोलन सुरूच आहे. ठोस निर्णय आणि लेखी हमी मिळेपर्यंत माघार घेणार नसल्याचा शेतकऱ्यांचा निर्धार आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 05, 2026 | 08:28 PM
Satara Sugarcane Price Protest

Satara Sugarcane Price Protest

Follow Us
Follow Us:
  • ऊस उत्पादकांचा सरकारला थेट इशारा
  • आधी ४५०० चा दर, मगच आंदोलन मागे
  • प्रशासनाच्या चर्चेनेही तोडगा नाही
सातारा : ऊसदराच्या प्रश्नावर शेतकरी रस्त्यावर उतरले, महामार्ग रोखला, वाहतुकीचा खोळंबा झाला आणि अखेर प्रशासनाला चर्चेसाठी धाव घ्यावी लागली. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत आश्वासनांचेच गुऱ्हाळ सुरू राहिल्याने शेतकऱ्यांच्या पदरी ठोस निर्णय पडलेला नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला असून, ऊसदराचा ठोस तोडगा निघेपर्यंत महामार्गावरील लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. प्रशासनाची मनधरणी आणि मंत्र्यांची आवाहने यांना बळी न पडता आंदोलकांनी आपली भूमिका कायम ठेवल्याने ऊसदराचा पेच अधिकच चिघळण्याची चिन्हे आहेत.

तरुणांसाठी मोठी बातमी! १०० कौशल्य प्रशिक्षण केंद्रे सुरू होणार; Mangal Prabhat Lodha यांच्या हस्ते शुभारंभ

महामार्गावर रास्ता रोको आंदोलन

प्रतिटन साडेचार हजार रुपये ऊसदर आणि इथेनॉलला प्रतिलिटर ७० रुपये दर मिळावा, या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून पुणे-बंगळूर महामार्गावर रास्ता रोको सुरू आहे. कर्नाटक आणि गुजरातमध्ये ऊसाला अधिक दर मिळत असताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवरच अन्याय का, असा संतप्त सवाल आंदोलकांनी उपस्थित केला आहे. निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहण्याची भाषा करणारे लोकप्रतिनिधी आता दराच्या प्रश्नावर ठोस निर्णय का घेत नाहीत, असा सवालही करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शेतकरी संघटनांची भूमिका योग्य असल्याचे मान्य केले. साखरेचा किमान विक्री दर पाच हजार रुपयांपर्यंत वाढविण्याचा अधिकार केंद्र सरकारकडे असल्याचे सांगत त्यांनी केंद्राच्या निर्णयाकडे बोट दाखविले. कारखानदारांनी एफआरपीपेक्षा अधिक किती दर देणार, हे शुक्रवारी नोटीस बोर्डवर जाहीर करावे, असे निर्देशही त्यांनी दिले. दिवाळीचा सण लक्षात घेऊन आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन त्यांनी केले. मात्र, केवळ आवाहनाने प्रश्न सुटणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली.

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कारखान्यांची आर्थिक परिस्थिती, साखरेचे बाजारभाव, बँकांची कर्जवसुली आणि उत्पादन खर्च यांचे गणित मांडले. खासदार नितीन पाटील यांनीही साखरेचा किमान विक्री दर वाढविण्याची गरज व्यक्त केली. कारखानदारांच्या प्रतिनिधींनी आर्थिक अडचणींचा पाढा वाचला. मात्र, शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाचे आणि कर्जाच्या ओझ्याचे काय, याचे उत्तर बैठकीतून मिळाले नाही.

आश्वासन नको, दराची लेखी हमी द्या

बैठकीत कारखानदारांनी दराबाबत ठोस आकडा जाहीर करण्याऐवजी आर्थिक परिस्थितीचा आधार घेतल्याने शेतकरी संघटनांचा संताप कायम आहे. एफआरपीपेक्षा अधिक दराची लेखी घोषणा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चर्चेच्या फेऱ्या सुरू असल्या, तरी महामार्गावरील आंदोलन संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. बैठकीतून निर्णयाऐवजी आश्वासनांचे गुऱ्हाळ बाहेर पडल्याने आता प्रशासन आणि कारखानदार ठोस पाऊल कधी उचलणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

बैठकीला पालकमंत्री शंभूराज देसाई, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार नितीन पाटील, आमदार धैर्यशील कदम, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, कारखानदारांचे प्रतिनिधी आणि विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Narendra Modi : 2014 मध्ये 5 शहरांमध्ये मेट्रो; आता 26 शहरांपर्यंत विस्तार, पंतप्रधान मोदींची माहिती

💡

Frequently Asked Questions

  • Que: साताऱ्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन का सुरू आहे?

    Ans: ऊसाला प्रतिटन ४५०० रुपये दर आणि इथेनॉलला प्रतिलिटर ७० रुपये दर मिळावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.

  • Que: ऊसदर आंदोलनाचे नेतृत्व कोणती संघटना करत आहे?

    Ans: स्वाभिमानी शेतकरी संघटना या आंदोलनाचे नेतृत्व करत आहे.

  • Que: ऊसदराच्या प्रश्नावर प्रशासनाने काय भूमिका घेतली?

    Ans: याबाबतीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. कारखानदारांनी एफआरपीपेक्षा अधिक किती दर देणार, हे जाहीर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

Web Title: Satara sugarcane farmers protest 4500 rate demand swabhimani shetkari sanghatana pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 08:26 PM

Topics:  

  • Sugar Market
  • Sugarcane Bill
  • Sugarcane Farmers
  • Swabhimani Shetkari Sanghatana

संबंधित बातम्या

Raju Shetti : ऊसाला ४,२०० रुपये पहिली उचल द्या! राजू शेट्टींचा कारखानदारांना इशारा; महामार्गावर तिसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांचा ठिय्या
1

Raju Shetti : ऊसाला ४,२०० रुपये पहिली उचल द्या! राजू शेट्टींचा कारखानदारांना इशारा; महामार्गावर तिसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांचा ठिय्या

Kolhapur News: महामार्ग रोकोन सुद्धा प्रश्न सुटेनात! शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सौरभ शेट्टीनी मांडली आक्रमक भूमिका
2

Kolhapur News: महामार्ग रोकोन सुद्धा प्रश्न सुटेनात! शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सौरभ शेट्टीनी मांडली आक्रमक भूमिका

Sugarcane Agitation: कर्तव्य प्रथम! नागठाण्यात ३१ तासांपासून रास्ता रोको; SP Nikhil Pingle स्वतः रस्त्यावर
3

Sugarcane Agitation: कर्तव्य प्रथम! नागठाण्यात ३१ तासांपासून रास्ता रोको; SP Nikhil Pingle स्वतः रस्त्यावर

Satara News : पाच हजारांच्या पहिल्या हप्त्यासाठी स्वाभिमानीने महामार्ग रोखला! नागठाण्यात शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन
4

Satara News : पाच हजारांच्या पहिल्या हप्त्यासाठी स्वाभिमानीने महामार्ग रोखला! नागठाण्यात शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.