Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 23 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: हा केवळ भ्रष्टाचार नाही, तर संस्थात्मक खून! सुरूर-पोलादपूर रस्ता कामावरून संदीप शिंदेंचा खळबळजनक आरोप

या उपसंबू उप ठेकेदाराच्या संपत्तीचे लाच लुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करून त्यांनी स्थापन केलेल्या १३ कंपन्यांच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करावी .अशी त्यांनी मागणी केलेली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 23, 2026 | 05:57 PM
Surur Poladpur Road, Satara News, Sandeep Shinde, RayatRaj Sanghatana, Ambenali Ghat,

Surur Poladpur Road, Satara News, Sandeep Shinde, RayatRaj Sanghatana, Ambenali Ghat,

Follow Us
Follow Us:

 

 Satara News:  सुरूवाई पाचगणी महाबळेश्वर पोलादपूर असा ३२६ कोटी रुपयांचा रस्ता असला तरी या रस्त्याच्या उप ठेकेदाराने ३४ कोटीची दलाली लाटली असून हा केवळ आर्थिक गैरव्यवहार नसून तो अधिकृत प्रशासकीय पाठबळावर केलेला संस्थात्मक खून आहे. अशा शब्दात रयत राज संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संदीप लक्ष्मण शिंदे यांनी सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आरोप केला आहे.

सुरुर -पाचगणी- महाबळेश्वर- आणि पोलादपूरला जोडणाऱ्या सुरूर-पोलादपूर रस्त्याचे काम गेल्या काही वर्षांपासून संथ आणि निकृष्ट गतीने सुरू आहे. यामुळे सध्या हा घाट रस्ता काही ठिकाणी उखडला आहे. आणि अनेक ठिकाणी खड्डे व अपूर्ण कामे आहेत. एक महिन्यापूर्वी झालेल्या अपघातात सातारा जिल्ह्यातील आठ तरुणांना प्राण गमवावे लागले. दिल्ली पासिंगची एक कार या घाटात कोसळली होती . या दिल्ली पासिंगच्या अपघाताची माहिती समोर आलेली आहे. दुर्दैवाने याबाबतची माहिती सातारा रायगड पोलीस प्रशासनाला नाही. याचा अर्थ आंबेनळी घाटातील निकृष्ट दर्जाच्या कामावर होणाऱ्या अपघाताबाबत शासन गंभीर नाही. असे त्यांनी स्पष्ट केले.

‘2029 ला तिकीट नाही मिळालं तर अपक्ष लढेन’; ओमराजे निंबाळकरांचा सूचक इशारा, शिंदेंची वाढणार डोकेदुखी?

हैदराबाद येथील एका कंपनीने स्थानिक उप ठेकेदार नेमला असून या ठेकेदाराला कुठल्याही प्रकारची दया नसून निधी लाटण्याचा त्याला आनंद वाटत आहे. मृत्यूच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार भयानक आहे. या महत्वकांक्षी रस्त्याच्या कामाचा दर्जा सुधारण्यासाठी ज्या बांधकाम विभागाच्या प्रामाणिक अधिकाऱ्यांनी शिफारसी केलेल्या आहेत. त्या अधिकाऱ्यांची बदली करण्यामध्ये या भोसले नावाच्या उप ठेकेदाराला कोण पाठीशी घालत आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

पावणे दोन वर्षांपूर्वी या कामाची वर्क ऑर्डर ३२६ कोटीची होती. त्यामध्ये ३४ कोटीची दलाली लाटून कोरेगाव तालुक्यातील विविध ५० बँकेमध्ये हे पैसे वळवले आहेत. हैदराबादची कंपनी ने कोणत्याही कामाचा अनुभव नसणारी उप ठेकेदारांची कंपनी म्हणजे बड्या अक्काच्या इशारावर चालणारी खंडणी बहादूरांची एक खिडकी योजना आहे. असे त्यांनी सांगितले.

सदर रस्ता जेवढा जाणीवपूर्वक रखडवला तेवढ्या प्रमाणात निधी वाढ होण्याची अपेक्षा ठेवूनच हे काम संत गतीने होत आहे. मूळ कामाची निविदाही २८९ कोटीची असून त्यामध्ये १७.११ टक्के वाढ केलेली आहे. या कामाबाबत कोणत्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा नसल्यामुळे आठवड्याला दोन अपघात होत आहेत. मूळ काम घेणारी कंपनी फ्री इन्फ्रा हे केवळ जीएसटी नंबर चा वापर करून उप ठेकेदार याच्यावर चांगलीच दया केलेले आहे. असं प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

New Sena Bhavan: ठाकरे-शिंदे वाद नव्या वळणावर! दादरच्या ‘सेनाभवना’ला टक्कर देण्यासाठी एकनाथ शिंदेंचा

वास्तविक पाहता एवढ्या मोठ्या प्रमाणात काम करण्यासाठी तेवढ्यात दर्जेदार कंपनीचीच आवश्यकता असते. परंतु या ठिकाणी फक्त पैसा कमवा… पैसा जिरवा.. अशीच योजना झाली आहे का? असाही त्यांनी पत्रकारांनाच सवाल केले आहे. काही मंत्र्यांशी सलगी करून उप ठेकेदार बदलीचे रॅकेट चालवत आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, आय आर बी अशा नामांकित संस्थेमध्ये या उप ठेकेदाराचा शिरकाव असतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांना पंचतारांकित हॉटेलमध्ये घेऊन जाऊन त्या ठिकाणी चित्रीकरण केले जाते. त्या आधारे ब्लॅकमेलिंग केल्याचाही त्यांनी गंभीर आरोप केला आहे.

या उपसंबू उप ठेकेदाराच्या संपत्तीचे लाच लुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करून त्यांनी स्थापन केलेल्या १३ कंपन्यांच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करावी .अशी त्यांनी मागणी केलेली आहे. सुरुर ते पोलादपूर रस्त्यावर आधुनिक पेवर मशीन ऐवजी हाताने निकृष्ट दर्जाचे काँक्रिटीकरण व निकृष्ट दर्जाचे बार वापरले आहेत. बॅरिगेटिक न करता मजुरांच्या जीवित अशी खेळत आहे.

Devendra Fadnavis : ड्रग्जविरोधात सरकारचा मोठा निर्णय; प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात उभारणार विशेष

एक महिन्यापूर्वी म्हणजे २४ मे २०२६ रोजी सातारा जिल्ह्यातील आठ निष्पक तरुणांचा दुर्दैवी अंत झाला. त्याला एक महिना पूर्ण होऊन सुद्धा संबंधित उपटेकेदाराच्या विरोधात मनुष्य वधाचा गुन्हा दाखल झालेला नाही. त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा. त्यांना भ्रष्टाचाराच्या गुन्ह्याखाली अटक करावी. एसआयटी पथकाच्या मार्फत त्याची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे. या रस्त्याचे कोर टेस्टिंग आणि क्यूब टेस्टिंग करून उप ठेकेदाराचे कंत्राट रद्द करावे आणि त्याला काळ्या यादीत टाकावे. अशी मागणी केलेली आहे.

परंतु उपटेकेदाराला तुरुंगवास होत नाही तोपर्यंत रयत राज संघटना लढा थांबवणार नाही असाही इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप लक्ष्मण शिंदे यांनी दिलेला आहे या पत्रकार परिषदेला त्यांच्यासोबत संदीप देशमुख, शिवाजी चोरट, शिव शिंदे संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान सुरूर ते पोलादपूर रस्त्याच्या कुठे दर्जाच्या कामामुळे महाबळेश्वर बंद करण्यात आले होते. याची यावेळी आठवण करून देण्यात आली.

 

Web Title: Satara surur poladpur road scam sandeep shinde alleges 34 crore corruption

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 05:57 PM

Topics:  

  • Mahabaleshwar News
  • Satara News

संबंधित बातम्या

साताऱ्यात पावसाची चाहूल, कोयना परिसरात वाढली पर्जन्यवृष्टी, हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा
1

साताऱ्यात पावसाची चाहूल, कोयना परिसरात वाढली पर्जन्यवृष्टी, हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा

Satara News: लिंब ग्रामपंचायतीमधील आर्थिक अनियमिततेप्रकरणी ग्रामस्थ आक्रमक
2

Satara News: लिंब ग्रामपंचायतीमधील आर्थिक अनियमिततेप्रकरणी ग्रामस्थ आक्रमक

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन
3

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

पुणे-बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू तर 5 जण जखमी
4

पुणे-बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू तर 5 जण जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.