Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: पाणी द्या, नाहीतर पालिकेला टाळे ठोकू! समाधीचा माळ, गडकर आळीतील महिलांचा पालिकेत संतापाचा स्फोट

साताऱ्यात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. गेल्या १५ दिवसांपासून नळ कोरडे असल्याने समाधीचा माळ आणि गडकर आळीतील महिलांनी सातारा नगरपालिकेवर हंडा मोर्चा काढत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 17, 2026 | 09:08 PM
Satara News: पाणी द्या, नाहीतर पालिकेला टाळे ठोकू! समाधीचा माळ, गडकर आळीतील महिलांचा पालिकेत संतापाचा स्फोट
Follow Us
Follow Us:
  • साताऱ्यात पाण्यासाठी महिलांचा नगरपालिकेवर ‘हंडा मोर्चा’
  • ३ जूनपासून नळ कोरडे
  • ‘गायब’ नगरसेवकांचा शोध घेण्याच्या घोषणा!
सातारा : गेल्या पंधरा दिवसांहून अधिक काळ पाण्याच्या तीव्र टंचाईने होरपळलेल्या समाधीचा माळ आणि गडकर आळी परिसरातील महिलांचा संताप बुधवारी अखेर पालिका भवनात उसळला. डोक्यावर हंडे, हातात निवेदने आणि ओठांवर तीव्र घोषणा घेऊन महिलांनी नगरपालिकेवर धडक मोर्चा काढत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.

पालिका कार्यालयात पोहोचताच महिलांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत प्रश्नांचा भडिमार केला. “तीन जूनपासून नळ कोरडे आहेत, आमच्या घरात पाणी कधी येणार?”, “आमचे नगरसेवक कुठे लपले आहेत?”, “मत मागायला घरोघरी येणारे आता दिसत का नाहीत?” अशा संतप्त प्रश्नांनी वातावरण तापले.

पाणीपुरवठा अभियंता शहाजी वाठारे यांच्यासमोर महिलांनी थेट आपली कैफियत मांडली. मागील आंदोलनावेळी नागरिकांना कार्यालयातून बाहेर काढण्यात आल्याची आठवण करून देत, “त्या वेळी दमदाटी करणारे लोकप्रतिनिधी आज कुठे आहेत?” असा रोखठोक सवाल महिलांनी उपस्थित केला.

Satara News : बेकायदा वाहतुकीवर कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन! स्वराज क्रांती संघटनेचा इशारा

परिसरात आधीच अपुरा पाणीपुरवठा होत असताना गेल्या अनेक दिवसांपासून नळांना थेंबही नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी महिलांना मैलोनमैल भटकावे लागत असून खासगी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. मात्र जीवन प्राधिकरण आणि नगरपालिका यांच्यातील समन्वयाच्या अभावाचा फटका सर्वसामान्यांना बसत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

“पाणी नाही तर कर कशासाठी?”, “जनतेला पाणी द्या, अन्यथा खुर्च्या खाली करा!”, “गायब नगरसेवकांचा शोध घ्या!” अशा घोषणांनी पालिका परिसर दणाणून गेला. महिलांच्या आक्रमक भूमिकेमुळे काही काळ प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.

आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, तातडीने नियमित पाणीपुरवठा सुरू न झाल्यास पुढील आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात करण्यात येईल. गरज पडल्यास पालिका कार्यालयाला टाळे ठोकण्याचाही इशारा यावेळी देण्यात आला. साताऱ्यातील पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना, नागरिकांचा संयम आता संपत चालल्याचे चित्र या आंदोलनातून ठळकपणे समोर आले आहे.

Satara News: पर्यटनस्थळ की मौजमजेचा अड्डा? मंडपघळ परिसरातील अस्वच्छतेवर नागरिक संतप्त

Web Title: Satara water crisis women launch handa morcha against municipal council

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 09:08 PM

Topics:  

  • Satara
  • Satara News
  • Water Crisis

संबंधित बातम्या

Navi Mumbai News: मोरबे धरणातील पाणीसाठा ७३.९० टक्क्यांवर; नवी मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन
1

Navi Mumbai News: मोरबे धरणातील पाणीसाठा ७३.९० टक्क्यांवर; नवी मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Veer Dam Water Release: इंदापूर तालुक्यातील १० गावांना मोठा दिलासा! वीर धरणातून शेटफळ तलावात पाणी सोडण्याचे आदेश
2

Veer Dam Water Release: इंदापूर तालुक्यातील १० गावांना मोठा दिलासा! वीर धरणातून शेटफळ तलावात पाणी सोडण्याचे आदेश

पाणीकपातीमुळे शहरातील बांधकामांवर निर्बंध ! ४३ तालुके दुसऱ्या टप्यात दुष्काळी…
3

पाणीकपातीमुळे शहरातील बांधकामांवर निर्बंध ! ४३ तालुके दुसऱ्या टप्यात दुष्काळी…

Maharashtra Drought 2026: पाटणसह पाच तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करा; शंभूराज देसाईंचा सरकारकडे पाठपुरावा
4

Maharashtra Drought 2026: पाटणसह पाच तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करा; शंभूराज देसाईंचा सरकारकडे पाठपुरावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.