विधानसभेसाठी साताऱ्यात भाजपचा सेफ गेम (फोटो- ट्विटर)
सातारा: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या पहिल्या ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून उमेदावारी जाहीर झाली आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. तर सातारा जिल्ह्यात देखील भाजपने सेफ गेम खेळला असल्याचे म्हटले जात आहे.
भारतीय जनता पार्टीच्या राज्य कार्यकारिणीने ९९ उमेदवारांची पहिली यादी रविवारी जाहीर केली . यामध्ये सातारा जिल्ह्यातून पहिल्या यादीत सातारा विधानसभा मतदारसंघासाठी शिवेंद्रसिंहराजे भोसले मान विधानसभा मतदारसंघातून आमदार जयकुमार गोरे तर कराड दक्षिण मधून अतुल भोसले यांच्या नावाची निश्चिती झाली आहे. या मतदारसंघांमध्ये भाजपला अनुकूल वातावरण असल्याचा सर्वेक्षणाचा कौल असल्याने भाजपने दगा फटका टाळण्यासाठी सेफ गेम खेळला असल्याची चर्चा आहे.