Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साताऱ्याच्या मेडिकल कॉलेजला एक रुपयाही मिळाला नाही : आमदार महेश शिंदे 

सातारा जिल्ह्याचे विकासाचे प्रश्न प्रचंड प्रलंबित आहेत. महाविकास आघाडी शासनाच्या काळात खोटी भुमीपुजन आणि आश्वासने देऊन लोकांना भुलविण्यात आले. सातारच्या मेडिकल कॉलेजला एक रुपया सुद्धा मिळालेला नाही, असा खळबळजनक आरोप कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 20, 2022 | 08:11 PM
साताऱ्याच्या मेडिकल कॉलेजला एक रुपयाही मिळाला नाही : आमदार महेश शिंदे 
Follow Us
Follow Us:

सातारा : सातारा जिल्ह्याचे विकासाचे प्रश्न प्रचंड प्रलंबित आहेत. महाविकास आघाडी शासनाच्या काळात खोटी भुमीपुजन आणि आश्वासने देऊन लोकांना भुलविण्यात आले. सातारच्या मेडिकल कॉलेजला एक रुपया सुद्धा मिळालेला नाही, असा खळबळजनक आरोप कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रणित शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीच्या नेमणूक प्रमाणपत्र समारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमातनंतर शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा संपर्क संपर्क प्रमुख शरद कणसे, एकनाथ ओंबळे, जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव, शहर प्रमुख नीलेश मोरे, जिल्हा संघटक चंद्रकांत जाधव, आदी यावेळी उपस्थित होते.

महेश शिंदे म्हणाले, सातारा जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २५ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांमध्ये सातारा जिल्ह्याला भरघोस निधी दिला आहे. एकट्या कोरेगाव तालुक्यात रस्ते कामांसाठी तब्बल ५० कोटी रुपयांचा निधी त्यांनी मंजूर केला आहे. गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी शासनाने सातारा जिल्ह्यासाठी काही केले नाही. त्यांचा खोटा कळवळा आणि त्यांची खोटी भूमिपूजन यातच बराचसा वेळ गेला. सातारा जिल्ह्यातील महत्त्वाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी त्यांनी एकही रुपया दिलेला नाही, यापुढे पायाभूत सुविधाकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

५० खोके, एकदम ओके या वादग्रस्त घोषणा विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी दिल्या. या विषयी बोलताना शिंदे म्हणाले, गेल्या अडीच वर्षात या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारला फक्त खोक्याची भाषा कळत होती. त्यांचे कॉन्ट्रॅक्टर बडे भांडवलदार यांच्याशी संबंध होते. त्यामुळे ज्याला जसं दिसतं सूचत, तशा घोषणा दिल्या जातात. मी विधानसभेच्या बाहेर पडताना मला बघूनच या घोषणा दिल्या गेल्या, पण मला ५० कोटी रुपये विकास कामांसाठी मिळाले. यातचं मी समाधान मानतो. असं ते म्हणाले.

रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भात बोलताना महेश शिंदे म्हणाले, ही संस्था पवार लिमिटेड कंपनी झाली आहे. संस्थेच्या घटनेप्रमाणे या संस्थेचे अध्यक्ष मुख्यमंत्री हवे आहेत. शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे खरे पाईक असून ते आमच्या मागणीचा विचार करून कधी तरी राजीनामा देतील आणि मुख्यमंत्री कधीतरी या संस्थेचे अध्यक्ष होतील. मात्र तत्पूर्वी या संस्थेमध्ये बरेचसे चालणारे गैरप्रकार आमच्याकडे पुराव्यानिशी आले आहेत. पवारांनी गुंड मवाली या संस्थेच्या कार्यकारणी घुसवण्यात ते पाप केले आहे. त्यामुळे त्यांचा हिशोब लवकरच चुकता केला जाईल. जरंडेश्वर कारखाना १०० दिवसात ताब्यात घेऊ. या संदर्भात केलेल्या घोषणे बद्दल शिंदे यांना छेडले असता ते म्हणाले जरंडेश्वर कारखाना प्रकरण ईडीच्या माध्यमातून न्यायप्रविष्ट आहे. मात्र दरम्यान शेतकऱ्यांसाठी कारखाना सुरू व्हावा आणि तो शेतकऱ्यांचा राहावा याकरिता आमचे कायदेशीर दाद मागण्याचे प्रयत्न सुरूच आहेत पण शेतकऱ्याच्या हातातून कारखान्यात जाऊ देणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही त्यांनी दिली.

[read_also content=”ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध : चंद्रकांत पाटील https://www.navarashtra.com/maharashtra/government-is-committed-for-the-development-of-brahmin-community-chandrakant-patil-nrdm-318183.html”]

राष्ट्रवादीच्या पाच बड्या नेत्यांची चौकशी होणार, याविषयी सुद्धा बोलताना शिंदे म्हणाले, मी अत्यंत साधा आमदार आहे. हे विषय वरिष्ठ स्तरावरचे आहेत त्यामुळे या विषयावर अधिक भाष्य करणार नाही. आमदार शशिकांत शिंदे यांनी मला भाजपने १०० कोटीची ऑफर दिली होती असा आरोप केला होता. या आरोपाची खिल्ली उडवत बोलताना महेश शिंदे म्हणाले, शिंदे साहेब शंभर कोटी असो शंभर रुपये असते तुम्ही तत्काळ भाजपमध्ये या नाहीतर तर काही खर नाही. जर भाजपमध्ये आलात तर तुमचे मनापासून स्वागत आहे. पुढे त्यांचे राजकीय पुनर्वसन कसे करायचे, हे वेळ आल्यानंतर बघू सध्या तरी ते राष्ट्रीय स्तरावरचे नेते आहेत. त्यांच्याविषयी मी जास्त बोलू नये कारण मी एक सामान्य आमदार आहे.

Web Title: Sataras medical college has not received a single rupee mla mahesh shinde nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2022 | 08:11 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • MLA Mahesh Shinde
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update

संबंधित बातम्या

तासगावच्या पाण्याचा ‘शब्द’ आता कृतीत; 11 महिन्यांत पाणी आणण्याचे महेश शिंदेंचे आश्वासन
1

तासगावच्या पाण्याचा ‘शब्द’ आता कृतीत; 11 महिन्यांत पाणी आणण्याचे महेश शिंदेंचे आश्वासन

मुंबईतील 99 हजार फेरीवाल्यांना मिळणार QR कोड ओळखपत्र; पालिकेच्या निर्णयावर विरोधकांचा सवाल
2

मुंबईतील 99 हजार फेरीवाल्यांना मिळणार QR कोड ओळखपत्र; पालिकेच्या निर्णयावर विरोधकांचा सवाल

Raigad News: श्रीवर्धन नगरपरिषदेत अनधिकृत बांधकामांवर नगरसेवक आक्रमक; सरसकट कारवाईचा ठराव
3

Raigad News: श्रीवर्धन नगरपरिषदेत अनधिकृत बांधकामांवर नगरसेवक आक्रमक; सरसकट कारवाईचा ठराव

Chandrapur News: चंद्रपूरच्या आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर? दरवर्षी 99 कोटींचा खर्च, तरी विद्यार्थ्यांना पलंग
4

Chandrapur News: चंद्रपूरच्या आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर? दरवर्षी 99 कोटींचा खर्च, तरी विद्यार्थ्यांना पलंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.