Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अपुऱ्या पावसाचे सणासुदीच्या बाजारपेठेवर सावट! व्यापाऱ्यांना ग्राहकांची प्रतीक्षा; व्यापारवृद्धीच्या आशा पावसावरच

यंदाच्या वर्षी अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेची गती मंदावली आहे. याचे पडसाद सणासुदीच्या बाजारपेठांवर सुद्धा दिसून येत आहेत. ग्राहकांच्या खरेदीने फुलणारे बाजार यंदा मात्र सुस्त दिसत असून व्यापाऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 20, 2026 | 02:28 PM
अपुऱ्या पावसाचे सणासुदीच्या बाजारपेठेवर सावट! व्यापाऱ्यांना ग्राहकांची प्रतीक्षा; व्यापारवृद्धीच्या आशा पावसावरच

अपुऱ्या पावसाचे सणासुदीच्या बाजारपेठेवर सावट! व्यापाऱ्यांना ग्राहकांची प्रतीक्षा; व्यापारवृद्धीच्या आशा पावसावरच

Follow Us
Follow Us:

यंदा मान्सूनने अपेक्षित साथ न दिल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेची गती मंदावली असून त्याचे पडसाद आता सणासुदीच्या बाजारपेठेत उमटू लागले आहेत. ईद-ए-मिलाद, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी, पोळा आणि गणेशोत्सवासारखे मोठे सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असतानाही शहरातील बाजारपेठांमध्ये अपेक्षित गर्दी दिसून येत नाही. दरवर्षी याच काळात ग्राहकांच्या खरेदीने फुलणारे बाजार यंदा मात्र सुस्त दिसत असून व्यापाऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.(फोटो सौजन्य – AI)

Amravati News: तीन दूध डेअरींमधील नमुने प्रयोगशाळेत! एनालॉग पनीरविरोधात एफडीएची मोहीम; पुरवठादारही रडारवर

अमरावती जिल्ह्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर आधारित आहे. शेतात चांगले पीक आल्यास शेतकऱ्यांच्या हातात पैसा खेळतो आणि त्याचा थेट फायदा बाजारपेठेला होतो. कपडे, किराणा, मिठाई, पूजासाहित्य, सजावटीच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स, पादत्राणे यांसह विविध वस्तूंच्या विक्रीत सणांच्या काळात मोठी वाढ होते. मात्र यंदा अपुऱ्या पावसामुळे पिकांच्या उत्पादनाबाबत अनिश्चितता निर्माण झाल बने शेतकरी आर्थिक नियोजन करताना सावध भूमिका घेत आहेत. परिणामी, अनेक कुटुंबे सध्या केवळ गरजेपुरतीच खरेदी करीत असल्याचे चित्र आहे. व्यापाऱ्यांच्या मते, सणांचा हंगाम हा वर्षातील सर्वाधिक उलाढालीचा कालावधी असतो. या काळातील विक्रीवर अनेक लहान-मोठ्या व्यवसायांचे वार्षिक गणित अवलंबून असते. मात्र यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच ग्राहकांचा प्रतिसाद अपेक्षेपेक्षा कमी मिळत असल्याने व्यापारी वर्ग अस्वस्थ आहे. सणांसाठी मोठ्या प्रमाणावर मालसाठा करून ठेवलेल्या व्यावसायिकांनाही विक्रीची चिंता सतावत आहे. तथापि, अद्यापही व्यापाऱ्यांच्या आशा कायम आहेत. आगामी दिवसात चांगला पाऊस झाल्यास आणि पिकांची स्थिती सुधारल्यास शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल. त्याचा सकारात्मक परिणाम बाजारपेठेवर होऊन सणासुदीची खरेदी वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

चांगल्या पिकांमुळेच बाजारपेठेला येते भरभराट शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती आणि स्थानिक बाजारपेठेतील व्यवहार यांचा थेट संबंध असल्याचे मानले जाते. शेतात चांगले पीक आल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते आणि सणासुदीच्या काळात घरगुती वस्तूंसह विविध वस्तूंच्या खरेदीला चालना मिळते. याचा फायदा लहान दुकानदारांपासून मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांनाच होतो. त्यामुळे व्यापारी वर्गाचे लक्ष आता आगामी पावसावर आणि पिकांच्या स्थितीकडे लागले आहे.

Amravati New: आदिवासी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न ऐरणीवर! वसतिगृहांची अवस्था बिकट; विविध मुलभूत सुविधांपासून वंचित

ग्रामीण भागातील आर्थिक चक्र आणि शहरातील बाजारपेठ यांचे नाते अतूट मानले जाते. शेतकऱ्यांच्या हातात पैसा आल्यास घरगुती वस्तूंपासून कपडे, दागिने, कृषी साहित्य आणि विविध उपभोग्य वस्तूंच्या खरेदीला चालना मिळते. त्यामुळेच व्यापारी वर्गाची नजर आता आकाशाकडे लागली असून, उर्वरित मान्सून आणि पिकांच्या स्थितीवरच यंदाच्या सणबाजाराचे भवितव्य अवलंबून असल्याचे चित्र आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपुऱ्या पावसाचा सणासुदीच्या बाजारपेठेवर कसा परिणाम होतो?

    Ans: पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास ग्रामीण भागातील शेती आणि उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो.

  • Que: व्यापाऱ्यांना ग्राहकांची प्रतीक्षा का करावी लागत आहे?

    Ans: पावसाची अनिश्चितता, शेतीशी संबंधित उत्पन्न आणि ग्राहकांच्या खर्चाच्या निर्णयांवर परिणाम झाल्यामुळे काही बाजारपेठांमध्ये खरेदीची गती कमी होऊ शकते.

  • Que: सणासुदीच्या बाजारपेठेत कोणत्या वस्तूंना मागणी असते?

    Ans: कपडे, दागिने, इलेक्ट्रॉनिक्स, घरगुती वस्तू, मिठाई, सजावटीच्या वस्तू आणि विविध भेटवस्तूंना सणासुदीच्या काळात सामान्यतः मागणी वाढते.

Web Title: Scanty rainfall casts a shadow over the festive market traders await customers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 02:28 PM

Topics:  

  • Amaravati
  • farmer
  • Maharashtra Monsoon Session

संबंधित बातम्या

Amravati News: मेळघाटात विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी! एमईसीएलच्या सीएसआर निधीतून आरोग्य, पोषण अभियान
1

Amravati News: मेळघाटात विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी! एमईसीएलच्या सीएसआर निधीतून आरोग्य, पोषण अभियान

Yavatmal News: धान कापणीला वेग; खरेदीला ब्रेक! व्यापाऱ्यांकडून कमी भावाची भीती; आधारभूत खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा
2

Yavatmal News: धान कापणीला वेग; खरेदीला ब्रेक! व्यापाऱ्यांकडून कमी भावाची भीती; आधारभूत खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा

Torrent Project : ‘अडाणी शेतकरी’ शब्दावरून वाद पेटला… Karjat मध्ये भूसंपादन सुनावणीत मोठा राडा! थेट जनसुनावणी बंद पाडली
3

Torrent Project : ‘अडाणी शेतकरी’ शब्दावरून वाद पेटला… Karjat मध्ये भूसंपादन सुनावणीत मोठा राडा! थेट जनसुनावणी बंद पाडली

Amravati News: पांढऱ्या सोन्याला संकटाची काळी छाया! गतवर्षी भावाने दिला दिलासा; यंदा विक्रमी पेरणी करूनही चिंता
4

Amravati News: पांढऱ्या सोन्याला संकटाची काळी छाया! गतवर्षी भावाने दिला दिलासा; यंदा विक्रमी पेरणी करूनही चिंता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.