Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati News: डोमा आश्रमशाळा पडली ओस! भीती, अफवांमुळे ६०० विद्यार्थ्यांचे गावाकडे पलायन; मेळघाटात अंधश्रद्धेचा कहर

डोमा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील सुमारे ६०० विद्यार्थी-विद्यार्थिनी घरी परतले. चार विद्यार्थिनींच्या असामान्य वर्तनानंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले. पालकांनी मुलांना घरी नेल्यानंतर इतर विद्यार्थ्यांनीही शाळा सोडली. निवासी आश्रमशाळा काही काळासाठी ओस पडल्याचे चित्र निर्माण झाले.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 18, 2026 | 04:00 PM
डोमा आश्रमशाळा पडली ओस! भीती, अफवांमुळे ६०० विद्यार्थ्यांचे गावाकडे पलायन; मेळघाटात अंधश्रद्धेचा कहर

डोमा आश्रमशाळा पडली ओस! भीती, अफवांमुळे ६०० विद्यार्थ्यांचे गावाकडे पलायन; मेळघाटात अंधश्रद्धेचा कहर

Follow Us
Follow Us:

मेळघाटातील डोमा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत पसरलेल्या कथित ‘भुताटकी’च्या अफवेने एकच खळबळ उडाली असून, भीतीच्या वातावरणामुळे तब्बल सुमारे ६०० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शाळा सोडून घरी परतण्याचा निर्णय घेतला आहे. या घटनेमुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.(फोटो सौजन्य – AI)

Amravati News: ज्वारी-बाजरीला उतरती कळा! अमरावतीत सोयाबीन-कापसाचे क्षेत्र; मक्याची १५१ टक्के पेरणी

२२ जुलै रोजी आश्रमशाळेतील चार विद्यार्थिनी अचानक रडणे, हसणे आणि असामान्य वर्तन करू लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. शाळा प्रशासनाने तातडीने त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेले. डॉक्टरांनी कोणताही शारीरिक आजार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, या घटनेची माहिती मिळताच पालकांनी मुलींना घरी नेले आणि त्यानंतर इतर विद्यार्थ्यांमध्येही भीतीचे वातावरण पसरले. परिणामी, निवासी आश्रमशाळा अक्षरशः ओस पडली. घटनेनंतर विविध अफवांनी जोर धरला. शाळेच्या ‘आत्मे’ संतप्त झाल्याची चर्चा रंगली. तर शाळेतील सांडपाणी जवळील मंदिरात गेल्याने देवता रुष्ट झाल्याचेही सांगितले जाऊ लागले. याशिवाय, परिसरातील एका मृत आदिवासी तरुणाचा आत्मा विद्यार्थ्यांना त्रास देत असल्याच्या कथाही पसरल्या. मात्र, आरोग्य तज्ज्ञ आणि आदिवासी विकास विभागाच्या चौकशीत या सर्व दाव्यांना कोणताही आधार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

तज्ज्ञांच्या मते हा प्रकार ‘मास हिस्टेरिया’ असण्याची शक्यता अधिक आहे. काही विद्यार्थिनींच्या असामान्य वर्तनामुळे निर्माण झालेली भीती आणि अफवांचे जाळे यामुळे हा परिणाम घडल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तज्ज्ञांनी भुताटकीचा कोणताही पुरावा आढळला नसल्याचे स्पष्ट केले. हा प्रकार ‘मास हिस्टेरिया’ अर्थात सामूहिक मानसिक तणावाशी संबंधित असू शकतो. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी आश्रमशाळेत मुक्काम करून अफवांचे खंडन केले. समुपदेशनानंतर अनेक विद्यार्थिनी पुन्हा शाळेत परतण्यास तयार झाल्या आहेत. दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) आणि प्रशासनाने संयुक्तपणे समुपदेशन मोहीम हाती घेतली आहे. अंनिसच्या कार्यकत्यांनी स्वतः आश्रमशाळेत मुक्काम करून कोणतीही भुताटकी नसल्याचे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होऊ नये यासाठी पालकांनी अफवांवर विश्वास न ठेवता मुलांना पुन्हा शाळेत पाठवावे, असे आवाहन केले आहे.

Amravati News: अप्पर वर्धा धरणात ५०.४१ टक्के जलसाठा! पावसाची प्रतीक्षाच; चंद्रभागा पूर्णा धरणांचे दरवाजे उघडून विसर्ग सुरू

शाळेच्या परिसरातील मोहाचे झाड तोडल्यामुळे ‘आत्मे’ संतप्त झाल्याची चर्चा रंगली. तर शाळेतील सांडपाणी जवळील मंदिरात गेल्याने देवता रुष्ट झाल्याचेही सांगितले जाऊ लागले. याशिवाय, परिसरातील एका मृत आदिवासी तरुणाचा आत्मा विद्यार्थ्यांना त्रास देत असल्याच्या कथाही पसरल्या. मात्र, आरोग्य तज्ज्ञ आणि आदिवासी विकास विभागाच्या चौकशीत या सर्व दाव्यांना कोणताही आधार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Doma ashram school deserted 600 students flee to their villages amidst fear and rumors superstition runs rampant in melghat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • Amaravati
  • maharashtra
  • Tribal Community

संबंधित बातम्या

‘सर्व समाजातील विद्यार्थ्यांसाठी एकत्रित…’; चंद्रशेखर बावनकुळे यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
1

‘सर्व समाजातील विद्यार्थ्यांसाठी एकत्रित…’; चंद्रशेखर बावनकुळे यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान
2

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान

Organ Donation : मृत्यूनंतरही इतरांना जीवनदान! ठाण्यात ४३ वर्षीय ब्रेन-स्टेम डेड व्यक्तीचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान
3

Organ Donation : मृत्यूनंतरही इतरांना जीवनदान! ठाण्यात ४३ वर्षीय ब्रेन-स्टेम डेड व्यक्तीचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान

108 Ambulance Service: ठाण्यात १०८ ॲम्ब्युलन्स ठरली जीवनदायिनी! रस्त्यातच गर्भवतीची सुरक्षित प्रसूती; वैद्यकीय पथकाचे कौतुक
4

108 Ambulance Service: ठाण्यात १०८ ॲम्ब्युलन्स ठरली जीवनदायिनी! रस्त्यातच गर्भवतीची सुरक्षित प्रसूती; वैद्यकीय पथकाचे कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.