Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pratap Sarnaik : आता बसच्या पासाची चिंता मिटली; शाळकरी मुलांसाठी प्रताप सरनाईकांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना

नेक विद्यार्थी हे शाळेत बसने शाळेत येतात. या मुलांना बसच्या पासासाठी आता वेगळा संघर्ष करावा लागणार नसल्याचं राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jun 15, 2025 | 01:01 PM
Pratap Sarnaik :  आता बसच्या पासाची चिंता मिटली; शाळकरी मुलांसाठी प्रताप सरनाईकांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : जून महिना म्हटलं की विद्यार्थ्यांची शाळेच्या तयारीला वेग असतो. अनेक विद्यार्थी हे शाळेत बसने शाळेत येतात. या मुलांना बसच्या पासासाठी आता वेगळा संघर्ष करावा लागणार नसल्याचं राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या वतीने सांगण्यात आलं आहे. सोमवार पासून आता राज्यातील शाळांना सुरुवात होणार आहे. याचपार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांना बसच्या पासासाठी वेगळा संघर्ष करावा लागू नये म्हणून काही महत्वाची पाऊलं उचलण्यात आली आहे.

काय आहेत परिवहन मंत्र्यांचे आदेश ?

शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना आता एसटीचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत. तशा सूचना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या आहेत.

सरकारने लाडक्या बहिणींसाठी दिलेले ‘ते’ आश्वासन अद्याप अपूर्णच; महिलांच्या पदरी निराशा

काय म्हणाले प्रताप सरनाईक ?

मंत्री सरनाईक म्हणाले की, नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा 16 जुन पासून सुरू होत आहेत. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून 66 टक्के इतकी सवलत दिली आहे, म्हणजे केवळ 33 टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो. त्याचप्रमाणे शासनाच्या ” पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ” योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते. यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभा राहून पास घ्यावे लागत होते. किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापन कडून पास घेतले जात असत. आता विद्यार्थ्यांना पास साठी रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही. त्यांच्या शाळा -महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्या कडून त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत. जेणेकरून त्यांचा शैक्षणिक वेळ वाया जाणार नाही.

Malegaon Sugar Factory Elections: ‘मी चांगलं काम करेल का ८५ वर्षांचा माणूस?’ अजित पवारांचा निशाणा कुणावर?

या संदर्भात 16 जून पासुन एसटी प्रशासनातर्फे “एसटी पास थेट तुमच्या शाळेत” हि विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तत्पूर्वी सर्व शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितले आहे. या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना होणार आहे.असा परिवहनमंत्री प्रताप सरनाई यांनी दिला आहे.

Web Title: School students will be given bus passes in the school itself pratap sarnaiks instructions to the st administration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2025 | 01:00 PM

Topics:  

  • Maharashtra Schools
  • pratap sarnaik
  • st bus news

संबंधित बातम्या

Pratap Sarnaik : पावसाचे कारण सांगून गैरहजर राहणाऱ्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई, प्रताप सरनाईक यांचे निर्देश
1

Pratap Sarnaik : पावसाचे कारण सांगून गैरहजर राहणाऱ्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई, प्रताप सरनाईक यांचे निर्देश

आता ॲप-आधारित वाहनाद्वारे प्रवाशांची होणारी लूट थांबणार, प्रताप सरनाईक यांनी दिला कारवाईचा इशारा
2

आता ॲप-आधारित वाहनाद्वारे प्रवाशांची होणारी लूट थांबणार, प्रताप सरनाईक यांनी दिला कारवाईचा इशारा

Mumbai: दहिसर-भाईंदर कोस्टल रोडचा मार्ग मोकळा; तीन वर्षांत प्रवास अर्ध्या तासावर; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
3

Mumbai: दहिसर-भाईंदर कोस्टल रोडचा मार्ग मोकळा; तीन वर्षांत प्रवास अर्ध्या तासावर; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

विचारे नावाच्या दगडाला शिंदेंनी सिंदूर लावला म्हणून ते खासदार झाले-प्रताप सरनाईक
4

विचारे नावाच्या दगडाला शिंदेंनी सिंदूर लावला म्हणून ते खासदार झाले-प्रताप सरनाईक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.