Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Winter Session: सुरक्षेचे नियम धाब्यावर, मंत्री-आमदारांनाच शिस्तीची गरज; पोलिसांच्या गोपनीय अहवालात नेमकं काय?

विधानपरिषेदेतील परिणय फुके आणि योगेश टिळेकर यांनी पास नसलेल्या व्यक्तीना विधीमंडळ परिसरात प्रवेश दिला, असा आरोप सुरक्षा पोलिसांकडून करण्यात आला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 10, 2025 | 12:04 PM
Maharashtra Politics, Vidhan bhawan,

Maharashtra Politics, Vidhan bhawan,

Follow Us
Close
Follow Us:
  • विधीमंडळात नियमांचे वारंवार उल्लंघन
  • अध्यक्षांकडे सुरक्षा पोलिसांचा गोपनीय अहवाल
  • सभापतींची नाराजी आणि कारवाईची मागणी
राज्याच्या राजकरारणातील मंत्री आणि आमदार सातत्याने एकमेकांवर कुरघोड्या करताना दिसतात. अनेकदा त्यांच्यातील वादामुळे त्यांच्या कार्यकर्त्यामध्येच मारहाण झालेली ऐकायला मिळते त्यामुळे आता मंत्री आणि आमदारांनाच शिस्त लावण्याची गरज निर्माण झाली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचे कारण म्हणजे पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप (BJP) आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात समर्थकांमध्ये थेट विधीमंडळाच्या आवारातच जोरदार हाणामारी झाली होती. या प्रकारावरून विधीमंडळातील सुरक्षा यंत्रणेलाही गालबोट लागले होते. त्यानंतर आमदार आणि मंत्र्यांसोबत येणाऱ्या व्यक्तींना विनापास न सोडण्याचा निर्णय अध्यक्षांकडून घेण्यात आला.

या सर्व प्रकरणानंतरही नागपूच्या हिवाली अधिवेशनात अध्यक्षांनी लागू केलेले नियम मंत्री आणि आमदारांकडूनच पायदळी तुडवल्याचे समोर आले. राज्याच्या आमदार आणि मंत्र्यांनीच नियमांचे उल्लंघन केल्याचा गोपनीय अहवाल विधीमंडळ सुरक्षा पोलिसांनी अध्यक्षांकडे सादर केला आहे.

नियमांचे उल्लंघन, सदस्यांचा गोपनिय अहवाल अध्यक्षांकडे सुपूर्द

राज्याच्या उपराजधानीत नागपूरमध्ये हिवाळी  अधिवेशनाची ( Maharashtra Winter Session) सुरूवात झली. पहिल्याच दिवशी विधीमंडळातील १५ सदस्यांनी त्यांच्यासोबत आलेल्या व्यक्तीला विनापास प्रवेश दिला. विनापास प्रवेश करणाऱ्यांमध्ये विधान परिषेदेतील ३ आमदारच होते. तर इतर १२ सदस्य हे विधानसभेचे आमदार होते. त्यात एक कॅबिनेट मंत्रीदेखील होते.

विधानपरिषेदेतील परिणय फुके आणि योगेश टिळेकर यांनी पास नसलेल्या व्यक्तीना विधीमंडळ परिसरात प्रवेश दिला, असा आरोप सुरक्षा पोलिसांकडून करण्यात आला आहे. हा अहवाल हाती आल्यानंतर सभापती राम शिंदे यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी स्पष्ट नाराजी व्यक्त केली. सुरक्षेचे नियम खुद्द सदस्यांकडूनच मोडण्यात आल्याने आता याप्रकरणी कारवाई होण्याची मागणी केली जात आहे.

विधीमंडळात सुरक्षेचे नियम धाब्यावर; दोन दिवसांत 23 सदस्यांकडून विनापास प्रवेश

हिवाळी अधिवेशनात विधीमंडळातील सुरक्षेचे नियम वारंवार मोडले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पहिल्याच दिवशी 15 सदस्यांनी तर दुसऱ्या दिवशी आणखी 8 सदस्यांनी विनापास व्यक्तींना सोबत घेऊन विधीमंडळात प्रवेश दिल्याचा अहवाल सुरक्षा पोलिसांनी अध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे.

दुसऱ्या दिवशी उल्लंघन करणाऱ्यांमध्ये आमदार राजू कोरमोरे (1 व्यक्ती), प्रकाश सुर्वे (2 व्यक्ती), महेश शिंदे (1 व्यक्ती), प्रवीण तायडे (1 व्यक्ती), किशोर जोरगेवार (1 व्यक्ती), सिद्धार्थ खरात (1 व्यक्ती) आणि मंत्री अशोक उईके (1 व्यक्ती) यांचा समावेश आहे, असे सुरक्षा अहवालात नमूद आहे. सदस्य आणि विशेषतः मंत्र्यांकडूनच सुरक्षा नियमांचे खुलेआम उल्लंघन होत असल्याने, विधीमंडळात शिस्त लावण्याची गरज अधिक ठळकपणे समोर येत आहे.

 

 

Web Title: Security rules are in disarray only ministers and mlas need discipline what exactly is in the confidential police report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2025 | 12:04 PM

Topics:  

  • Maharashtra Winter Session
  • Marathi News
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Raigad ZP Election :  जिल्हा परिषद निवडणूकीसाठी आमदार महेंद्र थोरवेंच्या हस्ते फुटला प्रचाराचा नारळ
1

Raigad ZP Election : जिल्हा परिषद निवडणूकीसाठी आमदार महेंद्र थोरवेंच्या हस्ते फुटला प्रचाराचा नारळ

Kolhapur News: वन्यप्राण्यांची दहशत आणि तरुणांचे स्थलांतर; शाहुवाडीच्या जखमांवर कोण घालणार फुंकर?
2

Kolhapur News: वन्यप्राण्यांची दहशत आणि तरुणांचे स्थलांतर; शाहुवाडीच्या जखमांवर कोण घालणार फुंकर?

ZP Election 2026 : करमाळ्यात माघारीनंतरच स्पष्ट होणार सत्तेचे गणित; जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक बहुपक्षीय 308 उमेदवार रिंगण
3

ZP Election 2026 : करमाळ्यात माघारीनंतरच स्पष्ट होणार सत्तेचे गणित; जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक बहुपक्षीय 308 उमेदवार रिंगण

Ahilyangar News: संगमनेरमध्ये कामगार रुग्णालयांना मंजुरी! आमदार अमोल खताळ यांचा पाठपुरावा
4

Ahilyangar News: संगमनेरमध्ये कामगार रुग्णालयांना मंजुरी! आमदार अमोल खताळ यांचा पाठपुरावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.