गोंदिया : स्वातंत्र्य दिवसाच्या पूर्व संध्येला बंदुक (Gun) घेवून फिरणाऱ्या व्यक्तीला गोंदिया शहर पोलिसांनी (Gondia City Police) अटक केली. त्याच्याकडून बंदुकीसह पाच जिवंत काडतूस जप्त (Five live cartridges with Gun) करण्यात आले. ही कारवाई चुटियाकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील आनंद अॅग्रो मील मुर्री जवळ (Agro Meal Murree) करण्यात आली. आरोपीचे नाव कांतीलाल उर्फ बाबा सुरजलाल ढोमणे (वय ४५) असे आहे.
पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी स्वातंत्र्य दिवसाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अनुचित घटना घडू नये, याकरिता तपास पथक आणि ठाणेदार यांना योग्य त्या मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. त्यानुषंगाने शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार चंद्रकांत सूर्यवंशी यांनी गोपनीय यंत्रणा कार्यान्वित करून शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तपास कार्य सुरू केले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील, पोलीस हवालदार सुदेश टेंभरे, पोलीस हवालदार जागेश्वर उईके, पोलीस नायक सुबोधकुमार बिसेन, प्रमोद चव्हाण, सतीश शेंडे, अरविंद चौधरी, दीपक रहांगडाले, शिपाई दिनेश बिसेन, कुणाल बारेवार, पुरुषोत्तम देशमुख, विकास वेदक, पोलीस मुकेश रावते १४ ऑगस्ट रोजी गस्तीवर होते.
दरम्यान चुटिया मार्गावर असलेल्या आनंद ॲग्रो राईल मीलसमोर एक व्यक्ती सकाळी ११ वाजताच्या सुमारास संशयास्पद स्थितीत आढळून आला. त्याला विचारपूस केली असता आणि अंगझडती घेतली असता त्याच्याकडून पाच मॅगझिनसह एक पिस्टल आढळून आले. त्याला ताब्यात घेवून शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यांतर्गत (Indian Arms Laws) गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्व पानसरे आणि उपविभागीय पोलीस अधीकारी सुनील ताजने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.