• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Senior Congress Leader Criticizes Deputy Chief Minister Ajit Pawar

अजित पवार यांना लाज वाटली पाहिजे, अदानीच्या फाईलवर सही…; काँग्रेसचा बडा नेता संतापला

उपमुख्यमंत्री अजित पवार नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले असता पैशाचे सोंग करता येत नाही असे एका शेतकऱ्याला म्हणाले होते. यावरुन आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संतापजनक प्रतिक्रीया दिली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 26, 2025 | 04:47 PM
अजित पवार यांना लाज वाटली पाहिजे, अदानीच्या फाईलवर सही...; काँग्रेसचा बडा नेता संतापला

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बुलढाणा : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागांना पावसाने अक्षरश: झोडपून काढलं असून अतिवृष्टीमुळे नागरिक संकटात सापडले आहेत. मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागांत पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून बरेच भाग पाण्याखाली गेले आहेत, पुरामुळे अगदी दैना उडाली आहे. शेती, माती, पिकं, गुरंढोरं सगळं वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचेही मोठं नुकसान झालं असून बळीराजा चिंतेत आहे. त्रस्त शेतकऱ्याना आता सरकारकडूनच मदतीची अपेक्षा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले असता पैशाचे सोंग करता येत नाही असे एका शेतकऱ्याला म्हणाले होते. यावरुन आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संतापजनक प्रतिक्रीया दिली आहे.

काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना नेहमीच मदत दिली मग आताच्या सरकारलाच काय अडचण आहे? असा प्रश्न विचारून पैशाचे सोंग आणता येत नाही. अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानाचा समाचार घेत, अजित पवार यांना लाज वाटली पाहिजे, अदानीच्या फाईलवर सही करताना, ८८ हजार कोटी रुपयांच्या शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी देताना त्यांना हे सुचत नाही का? असा सवाल सपकाळ यांनी केला.

सपकाळ म्हणाले, महाराष्ट्रातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेला आहे. मे महिन्यापासून सातत्याने पडत असलेल्या पावसाने खरीप हंगाम पूर्ण वाया गेला आहे आणि सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीने शेतकऱ्यांना पूर्णपणे उद्ध्वस्थ केले आहे. शेतकरी संकटात असताना भाजपा युतीचे सरकार मात्र फक्त घोषणाबाजी करत आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फोटो काढून परतले पण मदतीची घोषणा केली नाही. आता मुख्यमंत्री दिल्लीत गेले पण तिथे त्यांनी पूरग्रस्तांना मदत करण्याऐवजी सुरजागड लोखंड खाणीसंदर्भात चर्चा केली हे अत्यंत संतापजनक असून त्यांनी शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून भरीव पॅकेज घेऊनच परत यावे, अन्यथा तेथेच थांबावे, असा इशारा हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

पुढे बोलताना सपकाळ म्हणाले की, अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपये तसेच जमीन खरवडून गेली त्यासाठी एकरी २ लाख रुपये द्यावेत, रब्बी हंगामासाठी बियाणे व खते मोफत द्यावेत यासह शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, या मागण्या काँग्रेस पक्षाने केल्या आहेत. पण सरकारने जी मदत जाहीर केली आहे, ती अत्यंत तुटपुंजी असून हेक्टरी ३ हजार रुपयेही पदरात पडणार नाहीत. काँग्रेस पक्षाने याआधी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे. आता पुन्हा ३ ऑक्टोबर रोजी राज्यभर तीव्र आंदोलन करणार असल्याचे सपकाळ यांनी सांगितले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील कामखेड, गुळभेली, राहेरा दाभोळ तांडा नळकुंड, व बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट, पाडळी या गावांमध्ये अतिवृष्ठी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली, यावेळी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे, आमदार धीरज लिंगाडे होते.

Web Title: Senior congress leader criticizes deputy chief minister ajit pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2025 | 04:47 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • CM Devedra Fadnavis
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

पुण्यात काँग्रेसला पुन्हा धक्का; रोहन सुरवसे पाटलांसह अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
1

पुण्यात काँग्रेसला पुन्हा धक्का; रोहन सुरवसे पाटलांसह अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ नेत्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
2

सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ नेत्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

माधुरी हत्तीण नांदणी मठात परतणार; ‘या’ तारखेपर्यंत संयुक्त आराखडा सादर करण्याचे आदेश
3

माधुरी हत्तीण नांदणी मठात परतणार; ‘या’ तारखेपर्यंत संयुक्त आराखडा सादर करण्याचे आदेश

अजित पवारांच्या जवळच्या आमदाराच्या हत्येचा कट, संशय कोणावर? तपासासाठी SIT ची नियुक्ती
4

अजित पवारांच्या जवळच्या आमदाराच्या हत्येचा कट, संशय कोणावर? तपासासाठी SIT ची नियुक्ती

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Pandharpur : नुकसानग्रस्तांसाठी मनसेचा मदतीचा हात

Pandharpur : नुकसानग्रस्तांसाठी मनसेचा मदतीचा हात

भयंकर! मध्यरात्री नग्न होऊन महिलांचा मृतदेह कबरीतून बाहेर काढयचा, नंतर मृतदेहासोबत…; नेमकं प्रकरण काय?

भयंकर! मध्यरात्री नग्न होऊन महिलांचा मृतदेह कबरीतून बाहेर काढयचा, नंतर मृतदेहासोबत…; नेमकं प्रकरण काय?

Kalyan : खड्डे बुजवा अन्यथा… मनसेचा नगरपालिकेला इशारा

Kalyan : खड्डे बुजवा अन्यथा… मनसेचा नगरपालिकेला इशारा

IND vs PAK: ठोठवलाना तगडा दंड! अंतिम सामन्यापूर्वी पाकिस्तानी खेळाडूवर ICC ची कारवाई, भारताविरुद्ध केले संतापजनक कृत्य

IND vs PAK: ठोठवलाना तगडा दंड! अंतिम सामन्यापूर्वी पाकिस्तानी खेळाडूवर ICC ची कारवाई, भारताविरुद्ध केले संतापजनक कृत्य

शालेय अभ्यासक्रमात कृषी शिक्षणाचा समावेश! आधुनिक तंत्रज्ञानासह पारंपरिक ज्ञान येणार शिकता

शालेय अभ्यासक्रमात कृषी शिक्षणाचा समावेश! आधुनिक तंत्रज्ञानासह पारंपरिक ज्ञान येणार शिकता

वेळीच सावध व्हा! ‘चॅटबॉट स्कॅम्स’ हा गुन्हेगार बँका, डिलिव्हरी सर्व्हिसेस, सरकारी एजन्सीची हुबेहूब नक्कल करून करतात फसवणूक

वेळीच सावध व्हा! ‘चॅटबॉट स्कॅम्स’ हा गुन्हेगार बँका, डिलिव्हरी सर्व्हिसेस, सरकारी एजन्सीची हुबेहूब नक्कल करून करतात फसवणूक

पद्मविभूषण इलैयाराजा यांच्या संगीताने सजलेला ‘गोंधळ’! दर्जेदार टेक्निकल टीमसह भव्य चित्रपट

पद्मविभूषण इलैयाराजा यांच्या संगीताने सजलेला ‘गोंधळ’! दर्जेदार टेक्निकल टीमसह भव्य चित्रपट

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg News : जर्मनी नोकरी आणि गावातील तरुणांच्या फसवणूक प्रकरणी दीपक केसरकरांचे स्पष्टीकरण

Sindhudurg News : जर्मनी नोकरी आणि गावातील तरुणांच्या फसवणूक प्रकरणी दीपक केसरकरांचे स्पष्टीकरण

Solapur : पुरात वाहून गेला संसार, मदतीची वाट पाहत रस्त्यावरचे जीवन, सोलापूरच्या नागरिकांचे हाल

Solapur : पुरात वाहून गेला संसार, मदतीची वाट पाहत रस्त्यावरचे जीवन, सोलापूरच्या नागरिकांचे हाल

Nandurbar News : 110-120 आरोपींना अटक, शहरात कायदा कायम ठेवण्यासाठी पोलीस सज्ज

Nandurbar News : 110-120 आरोपींना अटक, शहरात कायदा कायम ठेवण्यासाठी पोलीस सज्ज

Marathwada Heavy Rainfall : मराठवाड्यातील अतिवृष्टीचे संभाव्य परिणाम

Marathwada Heavy Rainfall : मराठवाड्यातील अतिवृष्टीचे संभाव्य परिणाम

Parbhani : मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केली नुकसानीची पाहणी

Parbhani : मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केली नुकसानीची पाहणी

Mumbai BMC Election 2025 : मुंबई महापालिकांचे गड कोण जिंकणार? हे आहे सध्याचे चित्र

Mumbai BMC Election 2025 : मुंबई महापालिकांचे गड कोण जिंकणार? हे आहे सध्याचे चित्र

Kalyan :कल्याण महालक्ष्मी हॉटेल प्रकरणात राजू पाटील यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली

Kalyan :कल्याण महालक्ष्मी हॉटेल प्रकरणात राजू पाटील यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.