Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Seven Eleven School अडचणीत! पर्युषण काळातील आहार संदेशाची दखल; प्रशासनाकडून कारणे दाखवा नोटीस

Seven Eleven School: पर्युषण काळातील आहारासंदर्भात देण्यात आलेल्या संदेशावरून सेव्हन इलेव्हन शाळेला प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. संबंधित प्रकरणाबाबत दोन दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, शाळेने दिलेला खुलासा असमाधानकारक आढळल्यास नियमानुसार प्रशासकीय कारवाई करण्यात येईल...

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 11, 2026 | 05:53 PM
Seven Eleven School अडचणीत! पर्युषण काळातील आहार संदेशाची दखल; प्रशासनाकडून कारणे दाखवा नोटीस

Seven Eleven School अडचणीत! पर्युषण काळातील आहार संदेशाची दखल; प्रशासनाकडून कारणे दाखवा नोटीस

Follow Us
Follow Us:
  • पर्युषण काळातील आहार संदेशावरून सेव्हन इलेव्हन शाळेला कारणे दाखवा नोटीस
  • दोन दिवसांत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश
  • खुलासा असमाधानकारक ठरल्यास प्रशासकीय कारवाईचा इशारा
विजय काते, मिरा-भाईंदर : मिरा रोड येथील सेव्हन इलेव्हन शाळेच्या ( Seven Eleven School) पर्युषण काळातील आहारासंदर्भातील संदेशावरून सुरू झालेल्या वादाला आता प्रशासकीय वळण मिळाले आहे. विद्यार्थ्यांनी पर्युषण काळात कांदा, लसूण, मुळा, बीटरूट यांसारखे जमिनीखाली येणारे पदार्थ सेवन करू नयेत, अशा आशयाचा संदेश शाळेच्या अधिकृत पोर्टलवरून देण्यात आल्याची तक्रार शिक्षण विभागाकडे करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने संबंधित शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावली असून, दोन दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणामुळे मिरा रोड परिसरातील शैक्षणिक आणि राजकीय वातावरण गेल्या काही दिवसांपासून चांगलेच तापले आहे. विद्यार्थ्यांच्या आहाराच्या निवडीवर विशिष्ट धार्मिक आचारपद्धतीचा प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आक्षेप तक्रारदारांकडून घेण्यात आला आहे. विशेषतः शाळेत विविध धर्म, जाती आणि सामाजिक पार्श्वभूमीचे विद्यार्थी शिक्षण घेत असताना अशा प्रकारचा संदेश देण्यात आला असल्यास त्याची शैक्षणिक आणि कायदेशीर पातळीवर तपासणी आवश्यक असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.

Educational News: शाळांमध्ये शारीरिक शिक्षण, कला अन् कार्यशिक्षणाची पुस्तके अनिवार्य; ३ री, ४ थी आणि ६ वी च्या विद्यार्थ्यांसाठी

तक्रारीनंतर शिक्षण विभागाची कारवाई

या प्रकरणी मराठी एकीकरण लोकचळवळीचे सिद्धेश पाटील तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रॉबर्ट डिसोझा यांनी शिक्षण विभागाकडे स्वतंत्र तक्रारी केल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडूनही संबंधित अधिकाऱ्यांकडे कार्यवाहीसाठी पत्रव्यवहार करण्यात आला.

तक्रारीतील मुद्द्यांची गंभीर दखल घेत ठाणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांनी सेव्हन इलेव्हन शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्याचबरोबर मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडूनही या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

‘विशिष्ट आहारपद्धतीचा आग्रह का?’ असा सवाल

नोटीसमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांच्या वैविध्यपूर्ण सामाजिक आणि धार्मिक पार्श्वभूमीचा संदर्भ देण्यात आला आहे. विविध धर्म आणि जातींचे विद्यार्थी एकाच शाळेत शिक्षण घेत असताना एखाद्या विशिष्ट धार्मिक आहारपद्धतीचे पालन करण्याबाबत विद्यार्थ्यांना संदेश देण्यात आला असल्यास, ही बाब गंभीर असल्याचे शिक्षण विभागाने नमूद केल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आहाराच्या निवडीबाबत शाळेकडून कोणते निर्बंध लादण्यात आले होते, त्यामागील उद्देश काय होता आणि संबंधित संदेश कोणत्या परिस्थितीत देण्यात आला, याबाबत शाळेकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.

RTE Act आणि संविधानातील तरतुदींचा संदर्भ

शिक्षण विभागाच्या नोटीसमध्ये RTE Act 2009 मधील कलम १३ आणि १७, तसेच शालेय संहितेचा संदर्भ देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय विद्यार्थ्यांशी समानतेने वागण्याच्या घटनात्मक तत्त्वांचा संदर्भ देताना संविधानातील कलम १४, स्वातंत्र्याशी संबंधित कलम १९ आणि जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अधिकाराशी संबंधित कलम २१ यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. शाळेने विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक बाबींमध्ये हस्तक्षेप करताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव किंवा अनावश्यक निर्बंध निर्माण होणार नाहीत, याची काळजी घेणे अपेक्षित असल्याचा मुद्दाही नोटीसमध्ये अधोरेखित करण्यात आला आहे.

दोन दिवसांत खुलासा; अन्यथा कारवाईचा इशारा

शिक्षण विभागाने संबंधित शाळेला नोटीस प्राप्त झाल्यापासून दोन दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. शाळेने वेळेत खुलासा सादर न केल्यास किंवा सादर केलेला खुलासा समाधानकारक नसल्यास पुढील प्रशासकीय कारवाई केली जाऊ शकते, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. माध्यमिक शाळा संहिता, RTE Act 2009 आणि स्वयंअर्थसहायित शाळा अधिनियम २०१२ अंतर्गत उपलब्ध तरतुदींनुसार पुढील कार्यवाही केली जाऊ शकते, असे शिक्षण विभागाने नोटीसमध्ये स्पष्ट केल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, शाळेकडून हा संदेश नेमक्या कोणत्या उद्देशाने देण्यात आला होता, तो विद्यार्थ्यांवर बंधनकारक होता का, तसेच पर्युषण काळातील धार्मिक आचार आणि विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आहाराच्या निवडी यामध्ये शाळेने कोणती भूमिका घेतली, याबाबत आता शाळेच्या खुलाशाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शाळेचा लेखी खुलासा प्राप्त झाल्यानंतर शिक्षण विभाग त्याची छाननी करून पुढील निर्णय घेणार आहे. त्यामुळे या प्रकरणात केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोप न होता, शिक्षण विभागाच्या चौकशीतून नेमके तथ्य काय समोर येते आणि शाळेवर पुढील कोणती प्रशासकीय कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Thailand : धक्कादायक ! आठवीच्या विद्यार्थ्याचा रक्तरंजित हल्ला; आजी-आजोबांनंतर शाळेत शिक्षक व मित्रांवर वार

Web Title: Seven eleven school show cause notice over paryushan diet message administrative action warning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 05:53 PM

Topics:  

  • maharashtra
  • School

संबंधित बातम्या

Udayanraje Bhosale : राजकीय महत्त्वाकांक्षा असण्यात गैर काय? पण संघर्ष नको; उदयनराजेंचा नेत्यांना सल्ला
1

Udayanraje Bhosale : राजकीय महत्त्वाकांक्षा असण्यात गैर काय? पण संघर्ष नको; उदयनराजेंचा नेत्यांना सल्ला

कागदपत्र पडताळणीसाठी नागरिकांची पायपीट, 228 नवमतदारांना 70 किलोमीटर दूरची नोटीस; ग्रामस्थांचा संताप
2

कागदपत्र पडताळणीसाठी नागरिकांची पायपीट, 228 नवमतदारांना 70 किलोमीटर दूरची नोटीस; ग्रामस्थांचा संताप

कर्करुग्णांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणारी संस्था; ‘कैनसपोर्ट’कडून मोफत उपचार, घरपोच सेवा अन्…
3

कर्करुग्णांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणारी संस्था; ‘कैनसपोर्ट’कडून मोफत उपचार, घरपोच सेवा अन्…

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांचा दणका! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोटीस, दोन दिवसांत खुलासा देण्याचे आदेश
4

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांचा दणका! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोटीस, दोन दिवसांत खुलासा देण्याचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.