Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shahapur News : शहापूरच्या जंगलात आगीचा तांडव; वणव्यामुळे हजारो हेक्टर हिरवाई जळून खाक

शहापूर तालुक्यातील जंगलांमध्ये लागलेल्या वणव्यामुळे मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट होत असून, याचा परिणाम वन्यजीव आणि पर्यावरणावर गंभीरपणे होत आहे. वाढत्या आगीच्या घटनांमुळे हिरवाई धोक्यात आली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 18, 2026 | 11:41 AM
Shahapur News : शहापूरच्या जंगलात आगीचा तांडव; वणव्यामुळे हजारो हेक्टर हिरवाई जळून खाक

Shahapur News : शहापूरच्या जंगलात आगीचा तांडव; वणव्यामुळे हजारो हेक्टर हिरवाई जळून खाक

Follow Us
Follow Us:
  • वणव्यामुळे हजारो हेक्टर जंगल आणि झाडे जळून खाक झाली.
  • वन्यजीव, पक्षी आणि औषधी वनस्पतींचे मोठे नुकसान झाले.
  • मानवी निष्काळजीपणा आणि जाणीवपूर्वक लावल्या जाणाऱ्या आगींमुळे समस्या वाढत आहे.
शहापूर तालुक्यातील चांदा गावाजवळ शुक्रवारी दुपारी वणवा लागल्याने हजारो झाडे-झुडपे जळून खाक झाली. यावेळी जवळच असलेल्या खर्डी पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी गेलेल्या उपसरपंच प्रशांत खर्डीकर, ग्रामविकास अधिकारी दीपक साळवे आणि कर्मचाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्वतः वणवा विझवण्यासाठी प्रयत्न केला. शहापूर तालुका डोंगर आणि जंगल परीसराने वेढलेला असून येथे मोठ्या प्रमाणात झाडे-वनराई आहे. परतु जंगलात विकासाच्या नावाखाली लावण्यात येणाऱ्या आगीला ‘वणव्या’च्या नावाखाली जंगले जळली जात असल्याने जंगलासह वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

कोकणातील हापूस आंब्याची आवक वाढली! पण माल मोठ्या प्रमाणात आल्याने दरात घसरण

वणवा रोखण्यासाठी वनविभागातर्फे प्रभावीपणे जनजागृतीवर भर रात्रीच्या वेळी वणवा लागल्याने शेकडो हेक्टर च्यावर जागेतील झाडे जळून खाक झाली. जंगलातील आगी रोखण्यासाठी वनविभागाने प्रभावीपणे जनजागृती करुन उपाययोजना हाती घेतल्याचे दिसते पण स्थानिक रहिवाश्यांनीही वणवे लागू नये यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे, असे वनविभागाचे म्हणणे आहे.

शहापूर प्रादेशिक वनविभागाचे उपवनसंरक्षक अभिजित पिंगळे म्हणाले की, “वणव्या संदर्भात राहणाऱ्या गावात जनजागृती करण्याचे काम सुरु असून, वनजामिनिवर वणवा पसरु नये यासाठी उपाययोजना सुरू आहेत तर वणवा लागल्याची माहिती मिळताच आमची टीम अत्याधुनिक यंत्रसामुग्री जागेवर पोहचून वणवा विझवण्याचे काम करीत आहे. परंतु काही समाजकंटक आग लावून वणवा लागल्याचे दर्शवित असून त्याना पकडण्यासाठी उपाय योजना सुरु आहे”.

गवत कापणीनंतर डोंगर पेटवून देण्याचे प्रकार वाढताहेत

तालुक्यातील जंगलक्षेत्र पूर्वीपासुन समृद्ध असून, विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, औषधी वनस्पतीचे प्रमाणही जास्त आहे. घनदाट असलेल्या तानसा अभयारण्यात वणवा लागल्याने वनसंपदा कमी होत आहे व जंगल परिसरात मालकी क्षेत्रही मोठ्या प्रमाणात असल्याने गवत कापणीनंतर डोंगर पेटवून देण्याचे प्रकार वाढत आहेत. गवत जाळल्यानंतर पुढील वर्षी चांगले गवत येते राखेचा भरभराटीसाठी चांगला उपयोग होतो, अशी येथील आदिवासीची समजूत आहे.

वनराई जळाल्याने परिसर झाला भकास

भातसा, अधई-तानसा अभयारण्य, अजनुप, दापुर, मुंबई-आग्रा महामार्गावरील डोंगर वणव्यामुळे बोडके झाले असून बेलवड, जरंडी, तळवडा, पेंढरी साखरोली व दहीगाव येथील परिसरातील वनराई जळुन गेल्याने परिसर भकास झाला आहे विकासाच्या नावाखाली उद्योगासाठी जगल जाळले जात असल्याने परिसरातील जंगल क्षेत्र घटत आहे. वणव्यामुळे येथील वनवैभव धोक्यात आले आहे.

तब्बल 7 वर्षांनंतर पाटण पंचायत समिती मासिक सभा; आरोग्य व शिक्षण विभागाच्या कारभारावर ताशेरे

तीन महिन्यांत १५/१६ हेक्टरवर लागला वणवा

गेल्या ३ महिन्यात १५/१६ हेक्टर जमिनीवर वणवा लागला आहे. शहापूर वनविभागाच्या अतर्गत शहापूर, खडर्डी, धसई, विहिगाव, वाशाळा व डोळखांब हे रेंज येत असून गेल्या दोन महिन्यात मुंबई-आग्रा महामार्ग, भातसा, बिरवाडी, डोळखांब याठिकाणी वारंवार वणवे लागत असल्याच्या घटना घडत आहेत.

 

Web Title: Shahapur forest fire wildlife loss thousands hectares jungle burnt

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 11:41 AM

Topics:  

  • Fire
  • maharashtra
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Raigad News: दहीहंडीचा असा थरार कधी पाहिलाय? २५ ते ४० फूट उंचीवरून विहिरीत उडी घेत गोविंदा फोडतात हंडी; कुर्डुसची अनोखी परंपरा
1

Raigad News: दहीहंडीचा असा थरार कधी पाहिलाय? २५ ते ४० फूट उंचीवरून विहिरीत उडी घेत गोविंदा फोडतात हंडी; कुर्डुसची अनोखी परंपरा

मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा थरार! जय महाराष्ट्र, जय मल्हारने रचला आठ थरांचा विक्रम
2

मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा थरार! जय महाराष्ट्र, जय मल्हारने रचला आठ थरांचा विक्रम

Hinjawadi IT Park Pune Protest : हिंजवडी आयटी पार्कमध्ये मूलभूत सुविधांसाठी अभियंते रस्त्यावर!
3

Hinjawadi IT Park Pune Protest : हिंजवडी आयटी पार्कमध्ये मूलभूत सुविधांसाठी अभियंते रस्त्यावर!

Solapur News: गोकुळला तहसीलदारांचा दणका! अडीच कोटी थकीत; एफआरपी तत्काळ देण्याचे निर्देश
4

Solapur News: गोकुळला तहसीलदारांचा दणका! अडीच कोटी थकीत; एफआरपी तत्काळ देण्याचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.