Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sharad Pawar News: महागाईने सर्वसामान्य त्रस्त, अन् सरकार ठरवून इश्यू पुढे आणतंय!; शरद पवारांचा सनसनाटी आरोप

Sharad Pawar News: साखरेच्या वाढत्या दराचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळायला हवा. उत्पादन खर्च वाढत असताना वाढलेल्या दरातील योग्य हिस्सा शेतकऱ्याच्या हातात गेला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. साखर आयात करण्याचा निर्णय योग्य नसल्याचेही पवार म्हणाले.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 03, 2026 | 07:08 PM
Sharad Pawar, Baramati Politics, Inflation,

Sharad Pawar, Baramati Politics, Inflation,

Follow Us
Follow Us:
  • सर्वसामान्यांचे लक्ष दैनंदिन महागाई आणि ढासळत्या अर्थव्यवस्थेवरून लक्ष हटवण्यासाठी सरकारकडून नवनवीन वादग्रस्त विषय पुढे केले जात आहेत
  • सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देत शरद पवार यांनी लोकशाहीत आंदोलनांचा अधिकार असल्याचे स्पष्ट करत विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त ठरवल्या
  • शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबत सुरू असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाची वाट पाहणार
 

Baramati Politics: राज्यासह देशाची अर्थव्यवस्था अडचणीत जात असताना महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. मात्र, या मूळ प्रश्नाकडून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी वेगवेगळे इश्यू पुढे केले जात असून, हे सरकारच्या सहमतीने ठरवून केले जात असल्याचे दिसत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

गोविंदबाग, बारामती येथे आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. ते म्हणाले, “आज कुटुंबप्रमुखांना दैनंदिन गरजा भागविणेही अवघड झाले आहे. महागाई वाढत असताना त्यावर गांभीर्याने चर्चा होण्याऐवजी शिक्षणासह अन्य विषय पुढे आणले जात आहेत. लोकांनी त्या विषयांवर चर्चा करत बसावे आणि मूळ दुखण्याकडे दुर्लक्ष व्हावे, असे चित्र निर्माण केले जात आहे.”

Indian Army regiments war cry and motto : भारतीय लष्करात कोणकोणत्या रेजिमेंट्स आहेत? जाणून घ्या

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत बोलताना पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेचा दाखला देत सरकारने स्वीकारलेले धोरण चुकीचे असल्याचे न्यायव्यवस्थेने स्पष्ट केले आहे, असे सांगितले. लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याची मुभा विद्यार्थ्यांना मिळाली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेना चिन्ह वाटपाच्या सुनावणीबाबत भाष्य करण्यास नकार देत, “अजून सुनावणी सुरू आहे. अंतिम निकाल येईपर्यंत थांबूया. आठ-दहा दिवसांनी यावर चर्चा करू,” असे पवार म्हणाले.

देशाच्या तिमाही जीडीपीवर भाष्य करताना त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. अर्थव्यवस्थेचे सुंदर चित्र दाखवण्याचा प्रयत्न होत असला तरी सामान्य जनतेच्या अडचणींकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचे ते म्हणाले. आगामी काळात रुपयाचे अवमूल्यन झाल्यास त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या खिशावर होऊन महागाईच्या झळा अधिक तीव्र होऊ शकतात, असा इशाराही त्यांनी दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामती दौऱ्याबाबत पवार म्हणाले की, १६ ऑक्टोबरची तारीख देण्यात आली असून त्यात बदल होण्याची शक्यता आहे. बारामतीत उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) संस्थेची ते पाहणी करणार असून, त्यांना सविस्तर प्रेझेंटेशन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कॉकरोच जनता पार्टीत मोठी फूट; विरोधात उभी राहणार ‘CJP डेमोक्रॅटिक’, केजरीवालांवर केले गंभीर आरोप

साखरेच्या वाढत्या दराचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळायला हवा. उत्पादन खर्च वाढत असताना वाढलेल्या दरातील योग्य हिस्सा शेतकऱ्याच्या हातात गेला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. साखर आयात करण्याचा निर्णय योग्य नसल्याचेही पवार म्हणाले.

पावसाअभावी राज्यातील परिस्थिती गंभीर होत असून, मराठवाड्यात दुष्काळाचे संकट गडद होत असल्याचे त्यांनी सांगितले. “संकटातील माणसाला बाहेर काढण्यासाठी सर्वांनी मिळून हातभार लावला पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.

दूध भेसळीविरोधातील तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचे समर्थन करताना पवार यांनी भेसळ थांबल्यामुळे ग्राहकांना शुद्ध दुधासाठी अधिक पैसे देण्याची तयारी असल्याचे नमूद केले. मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर सरकार काय निर्णय घेते, हे पाहावे लागेल, असेही ते म्हणाले.

दरम्यान, विखे-पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना पवार यांनी, “१९९४ पासून आजपर्यंत तुम्ही काय करताय? आजपर्यंत तुम्ही सत्तेतच आहात की,” असा सवाल केला.

 

Web Title: Sharad pawar press conference baramati accuses govt of diverting attention from inflation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 07:08 PM

Topics:  

  • Baramati Politics
  • Inflation
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

Sharad Pawar on Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या कारवाईवर शरद पवारांची प्रतिक्रिया; FDA च्या कारवाईमुळे दूधाच्या दरावर परिणाम?
1

Sharad Pawar on Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या कारवाईवर शरद पवारांची प्रतिक्रिया; FDA च्या कारवाईमुळे दूधाच्या दरावर परिणाम?

Sharad Pawar: ‘महागाईच्या झळा आणखी तीव्र होणार’; अर्थव्यवस्था, दुष्काळ अन् साखरेच्या दरांवरून शरद पवारांनी सरकारला घेरलं
2

Sharad Pawar: ‘महागाईच्या झळा आणखी तीव्र होणार’; अर्थव्यवस्था, दुष्काळ अन् साखरेच्या दरांवरून शरद पवारांनी सरकारला घेरलं

Eknath Khadse: ‘नाथाभाऊंनी पक्ष उभा केला’ शरद पवारांकडून एकनाथ खडसेंचं कौतुक; भाजपला दाखवला आरसा
3

Eknath Khadse: ‘नाथाभाऊंनी पक्ष उभा केला’ शरद पवारांकडून एकनाथ खडसेंचं कौतुक; भाजपला दाखवला आरसा

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 10 प्रवक्त्यांची नवी टीम जाहीर; जितेंद्र आव्हाडांसह ‘या’ नेत्यांवर मोठी जबाबदारी
4

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 10 प्रवक्त्यांची नवी टीम जाहीर; जितेंद्र आव्हाडांसह ‘या’ नेत्यांवर मोठी जबाबदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.