Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut Slams Sharad Pawar: शरद पवारांनी एकनाथ शिंदेंच्या दालनात बैठक का घेतली? संजय राऊतांच्या प्रश्नांनी राजकारण तापणार

Sanjay Raut :शरद पवार यांनी त्यांच्या पक्षात काय करावे हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र, एकनाथ शिंदेंच्या दालनात जाऊन पक्षाची बैठक घेणे ही कृती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना दुखावणारी आहे. शरद पवार हे भाजप किंवा एनडीए (NDA) सोबत जाणार नाहीत, हे मी खात्रीने सांगू शकतो.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 09, 2026 | 01:34 PM
Sharad Pawar Eknath Shinde, Sanjay Raut ,

Sharad Pawar Eknath Shinde, Sanjay Raut ,

Follow Us
Follow Us:
  • हे आमच्यासारख्या निष्ठावंतांचे मत आहे. आमचे मन एवढे मोठे नाही आणि आम्ही इतकेही सहिष्णू नाही की हे सहज पचवू. – संजय राऊत
  • आम्ही कधीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात जाऊन अशी बैठक घेतली नसती – संजय राऊत
  • एकनाथ शिंदेंच्या दालनात जाऊन पक्षाची बैठक घेणे ही कृती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना दुखावणारी- संजय राऊत
Sanjay Raut and Sharad Pawar: ‘ज्या गद्दाराने आपले सरकार पाडले, त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन अशाप्रकारच्या बैठका घेतल्या तर यामुळे मोठ्या नेत्याची विश्वासार्हता कमी होते,’ अशा खरमरीत शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. याचे कारण म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि ज्येष्ठ नेते शरद पवार बुधवारी (८ जुलै) एका बैठकीनिमित्त विधानभवनात गेले होते. त्यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात त्यांच्या पक्षाची बैठक घेतली. लक्षणीय बाब म्हणजे, एकनाथ शिंदे यांनीदेखील मंत्रिमंडळाची बैठक सोडून दालनात येऊन शरद पवार यांचे स्वागत केले. पण यावरून संजय राऊत यांनी मात्र शरद पवारांवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. (Maharashtra Politics News)

Anjali Damania News: अहंकार…फक्त आणि फक्त अहंकार! ‘मिसिंग लिंक’च्या भगदाडावरून अंजली दमानियांचे फडणवीसांना सडेतोड उत्तर

‘शरद पवार हे मोठे नेते आहेत. पण ज्या एकनाथ शिंदेंनी या महाराष्ट्राला भ्रष्टाचाराची कीड आणि गद्दारीची वाळवी लावली. त्यांच्याच दालनात बैठक घेणे योग्य नाही. आख्ख विधानभवन ओस पडलं होतं का, असा खडा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. ” विधानभवन परिसरात राष्ट्रवादी भवन आहे. शिवसेना भवन आहे. ते कमी पडलं म्हणून विधीमंडळात भेटी घेतल्या जात आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षाची विश्वासार्हता कमी होते. आम्ही अजित पवार यांच्या दालनात जाऊन बैठक घेतली असती तर आम्ही महाविकास आघाडीच्या विरोधात गेलो, असा अर्थ होतो. त्यामुळे महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनी नियम पाळलेच पाहिजेत,” असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत म्हणाले, हे आमच्यासारख्या निष्ठावंताचं मत आहे, पण आम्ही इतकेही सहिष्णु नाही. आमचं मन एवढ मोठ नाही. पण यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची विश्वासार्हता कमी होते. शरद पवार यांच्या शिंदेंच्या दालनात जाण्यामुळे सगळेच दुखावले गेले असतील. आम्ही त्यांच्या अजित दादांच्या दालनात जाऊन कधीही बैठक घेतली नसती. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने मुख्यमंत्र्यांना भेटणे यात काहीही गैर नाही. काल विधानभवनातील बैठकीला शरद पवार आले होते. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी ही बैठक होती. त्या बैठकीत काय घडलं, हे काहीही समोर आलेले नाही. या बैठकीला मुख्यमंत्र्यांनी किती प्रमुख नेत्यांना बोलावलं होतं. हे मला सांगा नाही, शिवसेना या चळवळीतील महत्त्वाचा पक्ष आहे. मग आपले वकील सीमाप्रश्नाच्या खटल्याच्या वेळी सर्वोच्च न्यायालयात उपस्थित का राहत नाहीत, मराठी माणूस गेल्या इतक्या वर्षांपासून हाल भोगतोय, कित्येक वर्षांपासून हा खटला प्रलंबित आहे. याची मुख्यमंत्र्यांना जाणीव आहे का, असा सवालही संजय राऊतांनी केला.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी मोठा निर्णय! फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची बैठक

“शरद पवार यांनी त्यांच्या पक्षात काय करावे हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र, एकनाथ शिंदेंच्या दालनात जाऊन पक्षाची बैठक घेणे ही कृती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना दुखावणारी आहे. शरद पवार हे भाजप किंवा एनडीए (NDA) सोबत जाणार नाहीत, हे मी खात्रीने सांगू शकतो. त्यांच्या विचारधारेवर शंका घेण्याचे काहीच कारण नाही. पण काल त्यांनी जे केले, त्याची महाराष्ट्राच्या राजकारणात अजिबात गरज नव्हती. यातून तुम्ही जनतेला काय संदेश देत आहात?” जर तुम्ही गद्दारांना अशा प्रकारे प्रतिष्ठा देणार असाल, तर मग आपल्या पक्षात झालेल्या बंडखोरीवर किंवा गद्दारीवर बोलण्याचा नैतिक हक्क आपल्याला उरत नाही. मग त्यांच्याविरोधात कोर्टात जाण्याची किंवा लढण्याची काय गरज आहे? “एकनाथ शिंदे हे काय यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक किंवा विलासराव देशमुख आहेत का, की ज्यांच्या दालनात जाऊन एवढ्या ज्येष्ठ नेत्याने बैठक घ्यावी?” असा जळजळीत सवाल राऊत यांनी केला.

 

 

Web Title: Maharashtra politics sanjay raut slams sharad pawar over meeting in cm eknath shinde chamber

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 01:34 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics
  • NCP Politics
  • sanjay raut
  • Sharad Pawar
  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Gen Z वर राजकीय पक्षांचा फोकस वाढला; राहुल गांधी, फडणवीसांनंतर आता श्रीकांत शिंदे साधणार तरुणांशी संवाद
1

Gen Z वर राजकीय पक्षांचा फोकस वाढला; राहुल गांधी, फडणवीसांनंतर आता श्रीकांत शिंदे साधणार तरुणांशी संवाद

दोम्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पार पडणार हाय वोल्टेज मिटिंग!
2

दोम्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पार पडणार हाय वोल्टेज मिटिंग!

Nitin Gadkari: नितीन गडकरींचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत? ‘सत्ता काही कामाची नाही…’; नव्या पिढीबाबत मोठं वक्तव्य
3

Nitin Gadkari: नितीन गडकरींचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत? ‘सत्ता काही कामाची नाही…’; नव्या पिढीबाबत मोठं वक्तव्य

Eknath Shinde News: महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेत मोठे बदल!; एकनाथ शिंदेंचे मोठे आवाहन
4

Eknath Shinde News: महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेत मोठे बदल!; एकनाथ शिंदेंचे मोठे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.