Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sugar Factory Election! छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणूक; शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तटस्थ भूमिका

छत्रपती कारखान्याच्या निवडणूक प्रचारामध्ये कोणाच्याही बाजूने अथवा विरोधात भूमिका घेणार नसल्याचे शरदचंद्र पवार पक्षाने सांगितले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 02, 2025 | 06:13 PM
छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणूक; शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तटस्थ भूमिका

छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणूक; शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तटस्थ भूमिका

Follow Us
Follow Us:

बारामती : भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये कारखान्याच्या हितासाठी आम्ही पृथ्वीराज जाचक यांना पाठिंबा दिला होता, मात्र त्यांनी जाहीर केलेल्या पॅनल मध्ये आमच्या पक्षातील कोणत्याही उमेदवाराला संधी दिली नाही, किंवा यादी तयार करताना आम्हाला विश्वासात घेतले नाही, या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत शरदचंद्र पवार पक्षाने तटस्थ भूमिका घेऊन छत्रपती कारखान्याच्या निवडणूक प्रचारामध्ये कोणाच्याही बाजूने अथवा विरोधात भूमिका घेणार नसल्याचे शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर तालुकाध्यक्ष ॲड तेजसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय श्री जय भवानीमाता पॅनेलच्या उमेदवारांची यादी शुक्रवारी (दि २) जाहीर केली. या पार्श्वभूमीवर ॲड तेजसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामती शहर कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करून पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

यावेळी ॲड तेजसिंह पाटील म्हणाले, छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या हितासाठी हा कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे व श्रीनिवास पवार यांनी पृथ्वीराज जाचक यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला होता. कारखान्याच्या हितासाठी राजकारण बाजूला ठेवून त्यांनी जाचक यांना पाठिंबा दिला होता. सर्वपक्षीय असलेल्या श्री जय भवानी माता पॅनेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एकालाही उमेदवारी दिलेली नाही. सदर उमेदवारांची यादी निश्चित करताना आमच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला विश्वासात न घेता सदर यादी निश्चित करण्यात आली. त्यामुळे आमचे अनेक कार्यकर्ते नाराज झाले आहेत.

मात्र या निवडणुकीसाठी इच्छूक असलेल्या कार्यकर्त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. होणाऱ्या छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आमचे कोणतेही पदाधिकारी अथवा कार्यकर्ते सहभागी होणार नाहीत. आम्ही कोणाच्या बाजूने अथवा विरोधात प्रचार देखील करणार नाही. या निवडणुकीत तटस्थ भूमिका आमच्या पक्षाची राहणार आहे. मात्र मतदानामध्ये सदसद विवेक बुद्धीला स्मरून योग्य उमेदवारांना आम्ही मतदान करू, असे ॲड तेजसिंह पाटील यांनी सांगितले.

Web Title: Sharad pawars ncp has presented a position for the chhatrapati karkhana elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2025 | 03:52 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • Baramati NCP
  • Sharad Pawar
  • Shri Chhatrapati Sahakari Sakhar Karkhana

संबंधित बातम्या

Sunil Shelke News : आमदार सुनील शेळके यांच्यावर मारहाणीचा आरोप, RTI कार्यकर्ते सुनील गुजरांना मारहाण केल्याचा आरोप
1

Sunil Shelke News : आमदार सुनील शेळके यांच्यावर मारहाणीचा आरोप, RTI कार्यकर्ते सुनील गुजरांना मारहाण केल्याचा आरोप

Pune MLC Election : शरद पवारांचा नवा डाव? पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार भाजपच्या व्यासपीठावर अन सोलापुरात राजकीय चर्चांना उधाण
2

Pune MLC Election : शरद पवारांचा नवा डाव? पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार भाजपच्या व्यासपीठावर अन सोलापुरात राजकीय चर्चांना उधाण

Rohit Pawar : ‘अजितदादांचा पक्ष सक्षम नाही, अर्थखातं फडणवीसांनी चोरलं,’ रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
3

Rohit Pawar : ‘अजितदादांचा पक्ष सक्षम नाही, अर्थखातं फडणवीसांनी चोरलं,’ रोहित पवारांच्या विधानाने खळबळ

‘छत्रपती’चा गळीत हंगाम सुरू, ११ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट; सभासदांसह गेटकेन ऊसालाही समान दर देण्याची ग्वाही
4

‘छत्रपती’चा गळीत हंगाम सुरू, ११ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट; सभासदांसह गेटकेन ऊसालाही समान दर देण्याची ग्वाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.