अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार (Sharad Pawar),नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे आज अमरावती दौऱ्यावर येणार आहेत. दोन दिवसांपूर्वी शरद पवारांच्या घरावरील झालेल्या हल्ल्यानंतर हा पहिलाच दौरा आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने 350 पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. यामध्ये पोलीस उपायुक्त, पोलीस निरीक्षक, PSI यांच्यासह पोलीस हवालदार यांचा समावेश असणार आहे. यावेळी सांस्कृतिक भवन परिसराची पोलीस आयुक्त आरती सिंह (Commissioner of Police Aarti Singh) यांच्याकडून पाहणी करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी पोलीस घेताना दिसत आहे.
यावेळी मंत्री राजेंद्र शिंगणे, मंत्री सुनील केदार हेही सोबत असणार आहेत. शरद पवारांच्या हस्ते आज शिवाजी संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे व सभागृहाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. अमरावतीत दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमरावती विभागाच्या सवांद मेळाव्याला शरद पवार करणार मार्गदर्शन करतील. शहरात ठिकठिकाणी शरद पवार यांच्या स्वागताचे पोस्टर लागलेत. पोलिसांचाही तगडा बंदोबस्त आहे. राष्ट्रवादीच्या मेळाव्यात शरद पवार काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहील आहे.
[read_also content=”उन्हाळ्यात फळे खाताना घ्या ‘अशी’ काळजी; योग्य वेळी खाल्ली तर मिळतील असे फायदे https://www.navarashtra.com/lifestyle/eat-fruits-on-right-time-then-oly-you-will-get-benefits-says-experts-nrak-266836.html”]
[read_also content=”पृथ्वी शॉला कर्णधार बनवल्याने बंपर पॉइंट मिळू शकतात, कमिन्सची अष्टपैलू कामगिरी ठरू शकते गेम चेंजर https://www.navarashtra.com/sports/kkr-vs-dc-fantasy11-making-prithvi-shawla-captain-could-earn-you-bumper-points-cummins-all-round-performance-could-be-a-game-changer-266835.html”]