Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: कराडतून मोठा एल्गार! शेतकरी-कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी संघर्ष आणखी तीव्र

Satara News: शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचा ७९ वा वर्धापन दिन कराड येथील सातारा जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 03, 2026 | 02:47 PM
Satara News: कराडातून मोठा एल्गार! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Satara News: कराडातून मोठा एल्गार! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • शेतकरी कामगार पक्षाचा ७९ वा वर्धापन दिन साजरा.
  • कराड येथे कार्यकर्त्यांचा उत्साही सहभाग.
  • संघटनात्मक बळकटीचा निर्धार व्यक्त
Satara Karad News: शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि वंचित घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्षाची परंपरा जपणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचा ७९ वा वर्धापन दिन सातारा जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, कराड येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पक्षाची वैचारिक भूमिका आणि संघर्षाची परंपरा पुढे नेत बदलत्या काळानुसार संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

शेतकरी कामगार पक्षाच्या ऐतिहासिक वाटचाल

कार्यक्रमात बोलताना पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. समीर देसाई यांनी, शेतकरी कामगार पक्षाच्या ऐतिहासिक वाटचालीचा आढावा घेतला. शेतकरी, कष्टकरी, कामगार, वंचित आणि बहुजन समाजाच्या प्रश्नांना सातत्याने आवाज देणारा पक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्षाची ओळख निर्माण झाली आहे. गेल्या ७९ वर्षांत पक्षाने शेतकरी-कष्टकऱ्यांच्या संघर्षाशी आपली नाळ कायम जोडून ठेवली असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वतंत्र राजकीय संघटनेची गरज

स्वातंत्र्यपूर्व काळातील राजकीय परिस्थिती आणि स्वातंत्र्यानंतरची सत्ता शेतकरी व कामगारांच्या श्रमावर आधारित समाजाच्या हितासाठी वापरली जावी, या विचारातून स्वतंत्र राजकीय संघटनेची गरज निर्माण झाली. त्यातून २ व ३ ऑगस्ट १९४७ रोजी आळंदी येथे शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेची प्रक्रिया झाली. केशवराव जेधे, क्रांतिसिंह नाना पाटील, भाऊसाहेब राऊत आणि शंकरराव मोरे यांसारख्या ज्येष्ठ विचारवंतांच्या सहभागातून पक्षाच्या विचारधारेला आकार मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. (Satara News:)

राज्यातील तरुणांनी स्वयंस्फूर्तीने पक्षाच्या कार्यात

शेतकरी व कामगारांच्या प्रश्नांशी समरस होऊन त्यांच्या हितासाठी विधायक आणि संघर्षात्मक कार्यक्रम राबविण्याची पक्षाची भूमिका राहिली आहे. हीच वैचारिक परंपरा पुढे नेत नव्या पिढीला पक्षाच्या कार्याशी जोडण्याची आवश्यकता आहे. बदलत्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा विचार करून पक्षात युवक-युवतींना अधिकाधिक संधी देण्यात येणार असून, राज्यातील तरुणांनी स्वयंस्फूर्तीने पक्षाच्या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन अॅड. देसाई यांनी केले.

Maharashtra Land Survey E-Post System: भूमी अभिलेख विभागाचा मोठा निर्णय; आता जमीन मोजणीच्या नोटिसा स्पीड पोस्टने थेट दारात

पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित

कार्यक्रमास भाई एम. आर. जाधव, भाई दिनकरराव गुरव आणि कराड पंचायत समिती सदस्य संग्राम पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच अॅड. हैबतराव पवार, अॅड. अमित लाड, भाई अरुण डुबल, विद्याधर गायकवाड, संभाजी जाधव, महेश जिरंगे, महेश जमाले, युवराज मस्के, संदीप तिकवडे, प्रल्हाद माने यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Bullet Train Project: एक ते दीड किमी रस्ता चिखलाने व्यापला; बुलेट ट्रेनच्या कामामुळे नागरिकांची जीवघेणी कसरत

Web Title: Shetkari kamgar paksha celebrates 79th foundation day in karad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • Karad
  • maharashtra
  • Satara

संबंधित बातम्या

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर
1

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
2

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज
3

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले
4

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.