Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! शेतकरी कर्जमाफीची 30 जूनची डेडलाईन हुकणार; 5 जुलैनंतर खात्यात जमा होणार रक्कम

शेतकरी कर्जमाफीबाबत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठी माहिती दिली आहे. 30 जूनची मुदत हुकणार असून आवश्यक मंजुरीनंतर 5 जुलैनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे. दरम्यान, या विलंबावरून राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

  • By विवेक
Updated On: Jun 29, 2026 | 09:32 PM
मोठी बातमी! शेतकरी कर्जमाफीची 30 जूनची डेडलाईन हुकणार; 5 जुलैनंतर खात्यात जमा होणार रक्कम

मोठी बातमी! शेतकरी कर्जमाफीची 30 जूनची डेडलाईन हुकणार; 5 जुलैनंतर खात्यात जमा होणार रक्कम

Follow Us
Follow Us:

राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. विधानसभेत बोलताना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सरकारने दिलेली 30 जूनची मुदत पाळता येणार नसल्याचे स्पष्ट केले. कर्जमाफी योजनेला आवश्यक मंजुरी आणि राज्यपालांची स्वाक्षरी झाल्यानंतर 5 जुलैनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल, असे त्यांनी सांगितले.

अटी-निकषांमध्ये बदल; 56 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना फायदा

दत्तात्रय भरणे म्हणाले की, कर्जमाफीसाठी ठरवण्यात आलेल्या अटी आणि निकषांवर सरकारमध्ये तसेच विरोधी पक्षांसोबत सविस्तर चर्चा झाली आहे. विरोधी पक्षांनी सुचवलेल्या काही सकारात्मक मुद्द्यांचाही विचार करण्यात आला असून त्यानुसार निकषांमध्ये बदल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

त्यांच्या माहितीनुसार, प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील 56 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

मंजुरीनंतर राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर होणार अंमलबजावणी

भरणे यांनी सांगितले की, सध्या पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू असून त्यामध्ये कर्जमाफीसाठी आवश्यक निधीचा समावेश आहे. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला जाईल. राज्यपालांची मंजुरी मिळाल्यानंतर 5 जुलैनंतर शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल.

‘आधीच तरुण आपल्यावर ओरडतोय…’; TET पेपरफुटीवरून सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा आहेर; भर अधिवेशनात फटकारलं

“सरकारला शेतकऱ्यांची काळजी आहे” – दत्तात्रय भरणे

कृषीमंत्री म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना शेतकऱ्यांची चिंता आहे. “आम्हीही शेतकऱ्यांची लेकरं आहोत. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत करणे हे सरकारचे कर्तव्य आहे आणि त्यासाठी सरकार सकारात्मक निर्णय घेत आहे,” असे त्यांनी सांगितले.

“तारीख पे तारीख सुरू” – राजू शेट्टींचा सरकारवर हल्लाबोल

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका करत कर्जमाफीच्या घोषणांमध्ये केवळ वेळकाढूपणा सुरू असल्याचा आरोप केला.

‘शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा केलाच पाहिजे’; भाजप सरकारवर हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघात, कर्जमाफीसाठी एल्गार तीव्र

“30 जूननंतर शेतकरी थकबाकीदार ठरणार”

राजू शेट्टी म्हणाले, “सरकार सतत नवीन तारीख जाहीर करत आहे. अर्थसंकल्पात कर्जमाफीसाठी निधीची तरतूद असल्याचे सांगण्यात आले होते. मग आता राज्यपालांकडे प्रस्ताव पाठवण्याचे कारण काय?” ते पुढे म्हणाले की, 30 जूननंतर अनेक शेतकरी थकबाकीदार ठरणार असून त्यांना मिळणारे 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदानही धोक्यात येऊ शकते. सरकारने कोणतेही निकष न लावता सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

Web Title: Shetkari karj mafi 2026 deadline missed farmers benefit after 5 july dattatray bharane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 09:32 PM

Topics:  

  • Dattatray Bharane
  • Farmer Loan Waiver
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!
1

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!

Maharashtra Cabinet Decision : माजी अग्निवीरांना सरकारी नोकरीत 10 % आरक्षण तर दुष्काळाबाबत नवे धोरण लागु
2

Maharashtra Cabinet Decision : माजी अग्निवीरांना सरकारी नोकरीत 10 % आरक्षण तर दुष्काळाबाबत नवे धोरण लागु

Maharashtra Drought Update: पिकांचे पंचनामे आणि अहवालानंतरच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत; बावनकुळेंची माहिती
3

Maharashtra Drought Update: पिकांचे पंचनामे आणि अहवालानंतरच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत; बावनकुळेंची माहिती

Washim: दुष्काळग्रस्त यादीत वाशिमचे सहाही तालुके समाविष्ट, पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या पाठपुराव्याला यश
4

Washim: दुष्काळग्रस्त यादीत वाशिमचे सहाही तालुके समाविष्ट, पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या पाठपुराव्याला यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.