आता... इंटरनेट विना करा युपीआय पेमेंट; व्यवहाराच्या मर्यादेतही वाढ, ग्राहकांना मोठा दिलासा!
केंद्र सरकारच्या अर्थमंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या रिझर्व्ह बँकेने विना इंटरनेट UPI123 ची अगोदरच सुविधा सुरु केली आहे. पण सुरुवातीला याची व्यवहार मर्यादा कमी होती. आता ती वाढवण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील व्यवहाराला आता चालना मिळणार आहे. विना इंटरनेट सुद्धा मोठी रक्कम एका मिनिटात पाठवता येणार आहे. त्यामुळे आता सामान्यांना विना इंटरनेट झटपट व्यवहार होण्यास मदत होणार आहे.
युपीआयचा वापर सर्वाधिक
सध्या युनिफाईड पेमेंट इंटरफेस पेमेंटचा (युपीआय) वापर सर्वाधिक होत आहे. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत छोट्या-मोठ्या व्यवहारांसाठी नागरिक सहज युपीआय पेमेंट करतात. हे पेमेंट सुटसुटीत आणि सोप्या पद्धतीने होते. ही व्यवहाराची प्रक्रिया सुरक्षित आहे. ग्राहक अवघ्या काही सेकंदात त्याची रक्कम दुसऱ्याच्या खात्यात जमा करतो. त्याला सोबत रोख रक्कम ठेवण्याची गरज पडत नाही. त्यातून वेळेची बचत होते. तर सहज सुलभ व्यवहार होत असल्याने युपीआयचा वापर झपाट्याने वाढला आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.
हे देखील वाचा – 35 पैशांच्या या शेअरने गुंतवणूकदारांना केले करोडपती; 1 लाखाचे झाले 70 लाख रुपये!
विना इंटरनेट करा पेमेंट
युपीआयचा वापर स्मार्टफोन धारकांनाच करता येतो, असा एक समज आहे. पण सरकारने अगोदरच बेसिक फोनचा वापर करणाऱ्यांसाठी सुद्धा युपीआय सुरु केले आहे. म्हणजे विना इंटरनेट सुद्धा युपीआयाच वापर करता येईल. भारतीय रिझर्व्ह बँकेने त्यासाठी UPI 123Pay ही सुविधा सुरु केली आहे. त्याआधारे साध्या मोबाईलवरून सुद्धा पेमेंट करता येईल. आता विना इंटरनेट UPI 123Pay च्या माध्यमातून 10,000 रुपयांपर्यंत व्यवहार करता येईल.
असा करा विना इंटरनेट व्यवहार
ज्या युझर्सकडे स्मार्टफोन नाही, ते आयव्हीआर (इंटरएक्टिव्ह व्हॉइस प्रतिसाद) च्या माध्यमातून व्हॉईस पेमेंट करू शकतात. त्यासाठी एका आयव्हीआर क्रमांकावर कॉल करावा लागेल. त्यानंतर कीपॅडवरून योग्य पर्याय निवडून पेमेंट करावे लागेल. प्रॉक्सिमिटी साऊंड-बेस्ड पेमेंट करता येईल. एका खास टोनद्वारे हे पेमेंट करता येईल. त्यासाठी फोनमधील POD चा वापर करता येईल. त्यानंतर कीपॅडवरून योग्य पर्याय निवडून पेमेंट करावे लागेल.
युझर मिस्ड कॉल देऊन पेमेंट करू शकतात. त्यासाठी तुम्हाला एका नंबरवर कॉल करावा लागेल. कॉल आल्यावर तुमचा युपीआय पिन टाकून व्यवहार पूर्ण करता येईल. या पद्धतीत किचकट वाटत असल्या तरी त्या सोप्या आणि सुटसुटीत आहेत. एकदा तुम्ही त्याचा वापर सुरु केला तर तुम्हाला सहज त्याचा वापर करता येईल आणि व्यवहार करता येईल.