Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“आयुष्यभर पुजारी साहेब लक्षात राहील…” शेवगाव दंगलीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षांना कसं गोवलं? खाकीचा भयानक चेहरा उघड

शेवगाव दंगल प्रकरणात वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षांना कथितरीत्या गोवण्यात आल्याच्या आरोपामुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. “आयुष्यभर पुजारी साहेब लक्षात राहील,” या वक्तव्यासह पोलिसांच्या कारवाईवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 27, 2026 | 03:22 PM
"आयुष्यभर पुजारी साहेब लक्षात राहील..." शेवगाव दंगलीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षांना कसं गोवलं? खाकीचा भयानक चेहरा उघड!

"आयुष्यभर पुजारी साहेब लक्षात राहील..." शेवगाव दंगलीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षांना कसं गोवलं? खाकीचा भयानक चेहरा उघड!

Follow Us
Follow Us:

पोपट पिटेकर, अहिल्यानगर: शेवगाव येथे १४ मे २०२३ रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या दंगल प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य तथा प्रदेश उपाध्यक्ष किसन चव्हाण यांना मुख्य आरोपी करण्यात आले. मात्र, पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी एका पत्रकाराशी बोलताना प्रा. चव्हाण यांना या गुन्ह्यात कसे अडकवले, याची थेट जाहीर कबुली दिली आहे. पत्रकाराने केलेल्या या स्टिंग ऑपरेशनचे ऑडिओ रेकॉर्डिंग आता तपास अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले आहे.

नेमके प्रकरण काय?

दंगलीच्या दिवशी प्रा. किसन चव्हाण हे पूर्वानियोजित कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगर येथे होते आणि दंगल शांत झाल्यानंतर रात्री उशिरा शेवगावला पोहोचले होते. तरीही तत्कालीन पोलीस निरीक्षक विलास पुजारी, डीवायएसपी संदीप मिटके, डीवायएसपी अजित पाटील आणि पोलीस निरीक्षक संतोष मुटुकुळे यांनी संगनमत करून प्रा. चव्हाण यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला होता असा आरोप चव्हाण यांनी केला.

Satara Municipal Council: २५ कोटींच्या नुकसानभरपाईचे सात कोटींचे गणित कसे? सातारा पालिकेच्या सभेत प्रशासनाची पोलखोल

या विरोधात प्रा. चव्हाण यांनी अहमदनगर न्यायालयात आणि त्यानंतर उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अहमदनगर पोलीस अधीक्षक यांनी श्रीरामपूर विभागाचे डीवायएसपी जयदत्त भवर यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून, ते पुढील आठवड्यात न्यायालयात अहवाल सादर करणार आहेत अशी माहिती चव्हाण यांनी दिली.

स्टिंग ऑपरेशन आणि विलास पुजारी यांचे वक्तव्य

पाथर्डी येथे पोलीस ठाण्यात एका आदिवासी महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनानंतर २९ मे २०२४ रोजी पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी पत्रकाराशी बोलताना प्रा. चव्हाण यांना शेवगाव दंगलीत कसे अडकवले, याचे गुपित फोडले.

विलास पुजारी यांचे ऑडिओतील संभाषण

मी शेवगावला असताना, हे काल-परवा तीन दिवस माझ्याविरोधात आंदोलन करणाऱ्याला (प्रा. किसन चव्हाण यांना) दंगलीच्या गुन्ह्यात कसे अडकवले? टप्प्यात आल्यावर मी सोडत नसतो… शेवगावच्या दंगलीच्या गुन्ह्यात फिरवलं… सोडलं… आणि ते इतकं भिडलं की आयुष्यभर पुजारी साहेब लक्षात राहील. टप्प्यात आल्यावर मी सोडत नसतो, शेवगावच्या दंगलीच्या गुन्ह्यात याला मुख्य आरोपी केलं, ओला साहेब, कटके साहेब… वरिष्ठ पातळीवरून झालं सगळं…”

हे संपूर्ण संभाषण पत्रकाराने रेकॉर्ड केले असून, हे स्टिंग ऑपरेशन डीवायएसपी जयदत्त भवर यांच्याकडे अधिकृत पुरावा म्हणून सोपवण्यात आले आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत किसान चव्हाण यांनी दिली.

वंचित बहुजन आघाडीची कारवाईची मागणी

प्रा. किसन चव्हाण यांना खोट्या गुन्ह्यात गोवल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांची आणि तत्कालीन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन सविस्तर माहिती दिली होती. आता स्वतः पोलीस अधिकाऱ्याची कबुली समोर आल्यामुळे पोलीस यंत्रणेतील कटकारस्थान उघड झाले असून संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे.

Ganpati Special Train: कोकणातील चाकरमान्यांसाठी खुशखबर! दादरहून सुटणार ‘मोदी एक्सप्रेस’; जाणून घ्या वेळ, थांबे अन् बुकिंग

Web Title: Shevgaon riots vanchit bahujan aghadi state vice president pujari allegations police action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 03:22 PM

Topics:  

  • maharashtra
  • Shevgaon
  • Vanchit Bahujan Aghadi

संबंधित बातम्या

Real Estate: अलिबागच्या रिअल इस्टेटला नवी झळाळी; 40 एकरच्या प्रकल्पातून 5 वर्षांत 4,500 कोटींच्या महसुलाचे लक्ष्य
1

Real Estate: अलिबागच्या रिअल इस्टेटला नवी झळाळी; 40 एकरच्या प्रकल्पातून 5 वर्षांत 4,500 कोटींच्या महसुलाचे लक्ष्य

Gondiya News: तंबाखू नियंत्रण कायद्यांतर्गत कारंजात धाडसत्र ! २३ पानटपऱ्यांवर दंडात्मक कारवाई; ५ हजाराचा दंड वसूल
2

Gondiya News: तंबाखू नियंत्रण कायद्यांतर्गत कारंजात धाडसत्र ! २३ पानटपऱ्यांवर दंडात्मक कारवाई; ५ हजाराचा दंड वसूल

Cyber Crime: सायबर फसवणुकीला बळी पडू नका! ‘डिजिटल अरेस्ट’बाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा
3

Cyber Crime: सायबर फसवणुकीला बळी पडू नका! ‘डिजिटल अरेस्ट’बाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Shrikant Shinde: Gen Z साठी शिवसेनेचा नवा प्लॅन! स्पर्धा परीक्षा केंद्रांसह लोकप्रतिनिधींकडे फेलोशिपची संधी
4

Shrikant Shinde: Gen Z साठी शिवसेनेचा नवा प्लॅन! स्पर्धा परीक्षा केंद्रांसह लोकप्रतिनिधींकडे फेलोशिपची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.