Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shikhar Shingnapur Yatra: ‘हर हर महादेव’च्या गर्जनेने मुंगीघाट दुमदुमला! लाखो भाविकांच्या उपस्थितीत शिखर शिंगणापूर यात्रेची सांगता

शिंगणापूर येथील शंभू महादेव यात्रेत शनिवारी मुंगीघाटातील कावडसोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. मानाच्या कावडी चढविताना 'हरहर महादेव' गर्जनेत मुंगीघाटाचा डोंगर अक्षरशः दुमदुमून गेला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 30, 2026 | 07:28 PM
Shikhar Shingnapur Yatra: ‘हर हर महादेव’च्या गर्जनेने मुंगीघाट दुमदुमला! लाखो भाविकांच्या उपस्थितीत शिखर शिंगणापूर यात्रेची सांगता
Follow Us
Follow Us:

 

  • ‘हर हर महादेव’च्या गर्जनेने मुंगीघाट दुमदुमला!
  • लाखो भाविकांच्या उपस्थितीत शिखर शिंगणापूर यात्रेची सांगता
दहिवडी, नवराष्ट्र, न्युज नेटवर्क: शिंगणापूर येथील शंभू महादेव यात्रेत शनिवारी मुंगीघाटातील कावडसोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. मानाच्या कावडी चढविताना ‘हरहर महादेव’ गर्जनेत मुंगीघाटाचा डोंगर अक्षरशः दुमदुमून गेला. भक्तीशक्तीचा हा विराट सोहळा पाहण्यासाठी मुंगीघाट परिसरात लाखो भाविकांची उपस्थिती होती. रात्री उशिरा सासवड येथील भुतोजीबुवा तेली यांच्या मानाच्या कावडीने शंभू महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक केल्यानंतर शिखर शिंगणापूर यात्रेची सांगता झाली लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूर येथील शभू महादेवाच्या यात्रेस चैत्र शुद्ध पंचमीच्या दिवशी शिवपार्वती हळदी सोहळ्याने प्रारंभ झाला, त्यानंतर अष्टमीच्या दिवशी शिवपार्वती विवाहसोहळा संपन्न झाला. तसेच याचदिवशी शंभू महादेव मंदिर ते बळीच्या मंदिरास मानाचे पागोटे (धज) बांधण्याचा सोहळा मंगलमय वातावरणात पार पडला. नवमीच्या दिवशी उस्मानाबाद जिल्ह्यातील भातांगळी येथील देवाची करवली असलेल्या मानाच्या काठीने शंभू महादेवाचे दर्शन घेतले. तर एकादशीच्या दिवशी लाखो शिवभक्तांनी एकादशीचा उपवास धरून महादेवाचे दर्शन घेतले तर सायंकाळी इंदोर राजघराण्यातील काळगावडे राजे यांनी घोड्यावरून येऊन दर्शन घेतले.

शिंगणापूर यात्रेत कावड सोहळ्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे शिंगणापूर यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात कावड यात्रा म्हणून ओळखली जाते. शनिवारी द्वादशीच्या दिवशी सकाळपासूनच पुष्कर तलावातील जलतीर्थ घेऊन वाजतगाजत पायरी मार्गाने आलेल्या जवळपास एक हजारहून अधिक कावडीनी करून जलाभिषेक करून शंभू महादेवाचे दर्शन घेतले. याशिवाय सकाळपासूनच शिंगणापूर यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या मुंगीघाटातील कावडीसोहळ्याचा थरार रंगला होता. सकाळी 11 वाजलेपासून फलटण, बारामती, इंदापूर, माळशिरस तालुक्यातील लहानमोठ्या कावडी मुंगीघाटातून चढण्यास सुरुवात झाली. त्यानंतर 2 वाजल्यापासून सासवड पंचक्रोशीतील सासवड, खळद, शिवरी, बेलसर, एखतपूर, कुंभारवळण आदी ठिकाणच्या मानाच्या कावडी चढविण्यास प्रारंभ झाला.

Mahu Dam Jawali News: महू धरणाचे 700 कोटी पाण्यात? शेतीऐवजी ‘वाकळा’ धुण्यासाठी पाण्याचा वापर होत असल्याचा संताप

मुंगीघाट डोंगरावरून मानवी हातांची साखळी करून कावडी घेऊन चढविताना भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. ‘हरहर महादेव’, ‘म्हाद्या धाव’ अशी शिवगर्जना करीत कावडीधारक भाविकांनी साहस, श्रद्धा आणि भक्तीशक्तीचे विराट दर्शन घडवून अवजड कावडी घेऊन चार टप्प्यात मुंगीघाट सर केला. रोमहर्षक व नेत्रदीपक असा कावड सोहळ्याचा थरार पाहण्यासाठी घाटमाथ्यावर उपस्थित असलेले लाखो शिवभक्त टाळ्यांचा गजर करत कावडी घेऊन येणाऱ्या भाविकांचा उत्साह वाढवित होते. सायंकाळी साडेसातच्या सुमारास सासवड येथील कैलास काशिनाथ कावडे यांची मानाची कावड मुंगीघाटातून वर चढविण्यात आली. यावेळी उपस्थित असलेल्या लाखो भाविकांनी एकच जल्लोष केला. डोंगर माथ्यावर कावड आल्यानंतर कावडीधारक भाविकांनी ढोलताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करत, हरहर महादेव शिवगर्जना करीत, फटाक्यांच्या आतषबाजीत, कावडी नाचवून आनंद व्यक्त केला.

यावेळी सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने माणचे प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, पोलीस उपअधीक्षक, सपोनि दत्तात्रय दराडे, तहसीलदार विकास अहिर, गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे, शिंगणापूर सरपंच, उपसरपंच, देवस्थानचे व्यवस्थापक मंदार पत्की यांनी मानाच्या कावडींचे स्वागत केले. सर्व कावडी मंदिराकडे वाजतगाजत गेल्यानंतर भुतोजीबुवा तेली यांच्या कावडीने शंभू महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक केल्यानंतर शिंगणापूर यात्रेची सांगता झाली. कावडी सोहळ्याचा थरार पाहण्यासाठी मराठवाडा, विदर्भ, खानदेशसह पश्चिम महाराष्ट्रातील लाखो भाविक शिंगणापूर नगरीत दाखल झाले होते. शिंगणापूर यात्रेसाठी प्रशासकीय यंत्रणा, पोलीस प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग, शिंगणापूर ग्रामपंचायत व देवस्थान समिती यांनी नेटकेपणाने नियोजन करून भाविकांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या.

Satara Petrol Shortage Rumors: साताऱ्यात पेट्रोल टंचाईची अफवा! पंपांवर वाहनधारकांच्या रांगा; पुरवठा विभागाकडून स्पष्टीकरण

Web Title: Shikhar shingnapur yatra 2026 kavad sohala sangta

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 07:28 PM

Topics:  

  • maharashtra
  • Satara

संबंधित बातम्या

लाडकी बहीण योजनेचा लाभ पुन्हा सुरू करा; महिला काँग्रेसचा साताऱ्यात मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला निवेदन
1

लाडकी बहीण योजनेचा लाभ पुन्हा सुरू करा; महिला काँग्रेसचा साताऱ्यात मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला निवेदन

MSRTC News: अवैध प्रवासी वाहतुकीला लगाम; २० दिवसांत ₹१.६५ कोटींचा दंड, ८,८३९ वाहनांवर कारवाई
2

MSRTC News: अवैध प्रवासी वाहतुकीला लगाम; २० दिवसांत ₹१.६५ कोटींचा दंड, ८,८३९ वाहनांवर कारवाई

विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हणणारे सदाभाऊ खोतच ‘गुंडाभाऊ’, विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागा; काँग्रेसची मागणी
3

विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हणणारे सदाभाऊ खोतच ‘गुंडाभाऊ’, विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागा; काँग्रेसची मागणी

Anganwadi scheme : अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव
4

Anganwadi scheme : अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.