फोटो - टीम नवराष्ट्र
मुंबई : सध्या आपल्या शेजारील बांगलादेशमध्ये असलेल्या अस्थिरतेचे पडसाद देशभरामध्ये उमटू लागले आहेत. सर्वांनी यावर प्रतिक्रिया दिली असून बांगलादेशमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे. तसेच सीमांवरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. यावरुन आता शिंदे गटाच्या नेत्यांनी कौतुक केले असून मोदी सरकारचे धन्यवाद मानले आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. तसेच विरोधकांवर निशाणा देखील साधला आहे.
मोदी कोण यांचा सर्वसामान्य विचार केला पाहिजे
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोदी सरकारचे कौतुक केले. केसरकर म्हणाले, “असे अनेक वेळा झाले आहे की जेव्हा जेव्हा भारतीय नागरिक अडचणीत आले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना सुखरूप परत आणलं आहे. तुम्ही बांगलादेश बद्दल काय बोलतात जेव्हा तुमची विजय मिरवणूक होती तेव्हा हिरवे झेंडे मिरवणूकीत दिसले, असे मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. तसेच राज्य सरकारकडून माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे. यावरुन राजकारण तापले असून विरोधकांनी सडकून टीका केली आहे. राज्याच्या तिजोरीतून पैसेवाटप चालू असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यावरुन देखील केसरकर यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, ज्या जनतेमुळे आपण सत्तेवर आहोत त्यावेळी जनतेसाठी कायतरी केलं पाहीजे. त्यामुळे हे सरकार चांगल काम करत आहे. टीका करता मोदींवर यांना करायची असते, आपण कोण आणि मोदी कोण यांचा सर्वसामान्य विचार केला पाहिजे,” असा टोला दीपक केसरकर यांनी विरोधकांना लगावला आहे.
रोज नवीन निर्णय घेऊ
पुढे केसरकर म्हणाले, “विरोधकांना स्वतः काही करायचा नाही आणि दुसऱ्यांनी काही केलं तर त्याला नाव ठेवायचे. आपण जेव्हा सत्तेत येतो तेव्हा जनतेसाठी काही करावा लागते. जेव्हा ही योजना जाहीर झाली तेव्हा माझ्या भावाचा काय असं सांगण्यात येत होतं. त्यानंतर भावांसाठी देखील योजना जाहीर करण्यात आली. कर्नाटक सरकार पगार सुद्धा देत नाही ते दिसत नाही का ? आम्ही सर्वसामान्यांसाठी रोज नवीन निर्णय घेतो आणि घेत राहू,” असे मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केले आहे.