shinde group leader gulabrao patil target uddhav thackeray over politics
जळगाव : राज्यामध्ये विधानसभा निवडणूकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. महायुतीने एकतर्फी विजय मिळवल्यानंतर महाविकास आघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यामध्ये अनेकदा वाकयुद्ध झालेले दिसून आले आहे. उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख ‘एसंशी’ असा करत होते. तर एकनाथ शिंदे यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर देत उत्तर देत. शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना ‘युज एन्ड थ्रो’ म्हणून उल्लेख केला. दोन्ही नेते आणि त्यांचे कार्यकर्ते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. याबाबत आता एकनाथ शिंदे गटाचे नेते व जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावचा दौरा केला. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी गुलाबराव पाटील यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. गुलाबराव पाटील म्हणाले की,”उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणी त्रास देऊ नये. एकनाथ शिंदे यांना कामाव्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टी आवडत नाही. मात्र तुम्ही काहीही बोलत असाल तर आम्हालाही बोलावं लागेल,” अशा शब्दांत गुलाबराव पाटलांनी ठाकरे गटाला इशारा दिला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
याचबरोबर गुलाबराव पाटील यांनी तहुव्वर राणा याला भारतात आणण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच पाकिस्तानने त्यांचा काही संबंध नसल्याचे देखील सांगितले आहे. यावर गुलाबराव पाटील म्हणाले की, “तहव्वुर राणा हा 26 /11 चा आरोपी असून त्याला आता अटक झालेली आहे. तहव्वुर राणावर लवकरात लवकर कडक शासन व्हावं, अशी जनतेची भावना आहे. पाकिस्तानची भूमिका पहिल्या पासून अशीच राहिलेली आहे. दाऊद इब्राहिम जरी पाकिस्तानमध्ये असला तरी ते कबूल करायला तयार नसतात. पाकिस्तानचा हे आजचं नसून कायम भारताविरुद्ध कारवाया करणे आणि नंतर ना म्हणणे हा पाकिस्तानचा धंदा आहे,” असा घणाघात शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
बांगलादेशी घुसखोरी हे भारतामध्ये राहत आहेत. याबाबत गुलाबराव पाटील म्हणाले की, “बांगलादेशी जर भारतात राहत असतील तर ए.टी.एस किंवा एन.आय.ए कडून चौकशी केली गेली पाहिजे. गिरीश महाजन व किरीट सोमय्या यांनी चौकशीची जी मागणी केली आहे ती बरोबर आहे. या देशात बांगलादेशी राहू नये कारण ते सर्वांसाठी घातक आहेत इथे राहून बांगलादेशी कारवाया करतात. त्यामुळे कोणीही बांगलादेशी असो त्यांना भारतातून हाकलून दिला पाहिजे हीच भूमिका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची होती. बनावट दाखल्या प्रकरणी बांगलादेशी संशय असल्याने गिरीश महाजन व किरीट सोमय्या यांनी जी एटीएस व एनआयए चौकशीची मागणी केली आहे त्याला आमचाही पाठिंबा आहे,” अशी भूमिका गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे.