
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी युवासेनेचा मदतीचा हात; श्रीकांत शिंदे फाउंडेशनला १० लाखांचा धनादेश सुपूर्द
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने युवासेना कल्याण लोकसभेच्या वतीने १० लाख रुपयांचा धनादेश डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनला सुपूर्द करण्यात आला आहे. युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेशजी सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवासेना कल्याण लोकसभा जिल्हाध्यक्ष जितेन पाटील यांच्या पुढाकाराने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला आहे.
राज्यात भीषण दुष्काळजन्य परिस्थितीचे चित्र निर्माण होत आहे. याच परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जनतेला आवाहन केले होते की, आपल्या अन्नदात्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी नवरात्रोत्सव आणि इतर धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम साधेपणाने साजरे करावेत. या उत्सवांमधून झालेली बचत निधी स्वरुपात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून द्यावी.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या आवाहनाला आता सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी युवासेनेने पुढाकार घेतला आहे. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनला १० लाखांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे. युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष जितेन पाटील यांच्या पुढाकाराने सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे.
Mohan Bhagwat: ‘बांगलादेशप्रमाणे भारतातही प्रयत्न…’, रिजीम चेंजबाबत मोहन भागवतांचे परखड मत
दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी युवासेनेने पुढाकार घेत सामाजिक बांधिलकी जपली आहे. या आर्थिक मदतीच्या माध्यमातून संकटग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या उपक्रमात निखील वालेकर, कामेश जाधव, युवराज पाटील,तेजस सांगळे,अभिषेक धोंढे,शेखर साकपळ,दत्ता गोसावी भाऊ,भूषण यशवंतराव, रोशन पांडे, सतीश मुंबरकर, प्रथमेश पाटील, सूरज मराठे, ऋषिकेश पाटील, ओंकारी आदव, समीर चालके, एजाज खान, ओंकार चव्हाण, विवेक पाटील, तेजस देवकाते, विनायक पाटील, सुशील पवार, सुरजीत पंजाबी, अजय गायकवाड, अमित देशमुख, ओंकार तांबे आणि महेश म्हात्रे यांच्यासह युवासेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग होता.
Ans: युवासेना कल्याण लोकसभेच्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १० लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
Ans: हा धनादेश डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनला सुपूर्द करण्यात आला.
Ans: युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवासेना कल्याण लोकसभा जिल्हाध्यक्ष जितेन पाटील यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.