Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“कोल्हापूर-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील भुयारी मार्गांची कामे वेगाने पूर्ण करा…”, शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे निर्देश

कोल्हापूर सातारा राष्ट्रीय महामार्गाच्या कामांचा आढावा व कराड येथील वाहतूक कोंडीसंदर्भात आज सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आढावा बैठक घेतली, यावेळी त्यांनी या सूचना केल्या.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 29, 2025 | 07:25 PM
"कोल्हापूर-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील भुयारी मार्गांची कामे वेगाने पूर्ण करा, अन्यथा...", शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे निर्देश

"कोल्हापूर-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील भुयारी मार्गांची कामे वेगाने पूर्ण करा, अन्यथा...", शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे निर्देश

Follow Us
Close
Follow Us:
  • कोल्हापूर सातारा राष्ट्रीय महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी
  • भुयारी मार्गांची व सेवा रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा
  • रस्त्यांच्या कामांमुळे या मार्गावर वाहतूक कोंडी
मुंबई : कोल्हापूर व सातारा भागात लवकरच ऊस गाळप हंगाम सुरू होणार आहे. कारखान्यांना ऊस नेण्यासाठी कोल्हापूर सातारा राष्ट्रीय महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी या महामार्गावरील भुयारी मार्गांची व सेवा रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.

रायगडच्या विकासाला निधीअभावी खीळ; MMRDA च्या रखडलेल्या कामांवरून माजी आमदार पंडित पाटील आक्रमक

कोल्हापूर सातारा राष्ट्रीय महामार्गाच्या कामांचा आढावा व कराड येथील वाहतूक कोंडीसंदर्भात आज सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी या सूचना केल्या.तसेच कोल्हापूर व सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक हे दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, कोल्हापूर सातारा राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. भुयारी मार्ग व सेवा रस्त्यांच्या कामांमुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होते. ही कोंडी टाळण्यासाठी कामांना वेग देण्याच्या सूचना कंत्राटदारांना द्याव्यात. तसेच ऊस गाळप हंगामात या महामार्गावरच ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडी, ट्रॅक्टरची वाहतूक मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळेही वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावरील स्लिप रस्ते, कामे सुरू असलेल्या रस्त्यांवरील वळण मार्गावरील कामे पूर्ण करून तो रस्ता वाहतुकीस योग्य करावा. तसेच भुयारी मार्गाजवळील पर्यायी रस्ते सुस्थितीत करण्यात यावीत. जेणेकरून या ठिकाणी वाहतूक कोंडी होणार नाही.

वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलीस व जिल्हा प्रशासनाने नियोजन करावे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणी क्रेनची व्यवस्था ठेवण्यात यावी. तसेच या ठिकाणी ट्रॅफिक वॉर्डन नेमण्यात येऊन त्यांची सेवा कोल्हापूर व सातारा पोलिसांच्या अखत्यारित देण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. भुयारी मार्गाची कामे जलदगतीने पूर्ण करण्यास कंत्राटदारांना सांगण्यात आले आहेत. तसेच ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते तेथे ट्रॅफिक वॉर्डन पुरविण्यात येतील. तसेच वळण रस्त्यांच्या ठिकाणचा रस्ता सुव्यवस्थित करण्यात येईल. कराडमधील रस्त्याचे काम दीड महिन्यात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता श्रीवास्तव यांनी सांगितले.

Sanjay Raut News: देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांना सामोरे जाण्यासाठी घाबरत आहेत; संजय राऊतांची टीका

 

Web Title: Shivendrasinh raje bhosale instructions complete the work on the underpasses on kolhapur satara national highway quickly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 07:24 PM

Topics:  

  • kolhapur
  • maharashtra
  • Satara

संबंधित बातम्या

माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांचं निधन; 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
1

माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांचं निधन; 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

US-Israel Iran War: उरणचे दाम्पत्य अ‍ॅनिव्हर्सरीला गेले अन् दुबईत अडकले, युद्धजन्य परिस्थितीमुळे विमानसेवा बंद
2

US-Israel Iran War: उरणचे दाम्पत्य अ‍ॅनिव्हर्सरीला गेले अन् दुबईत अडकले, युद्धजन्य परिस्थितीमुळे विमानसेवा बंद

एकनाथ शिंदेंमुळेच मी पुन्हा राजकारणात सक्रीय, त्यांनी मला…; निलेश राणेंनी स्पष्टच सांगितलं
3

एकनाथ शिंदेंमुळेच मी पुन्हा राजकारणात सक्रीय, त्यांनी मला…; निलेश राणेंनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र कृषी विभाग ॲक्शन मोडवर; बेकायदेशीर ‘कम्फर्ट’ मच्छर अगरबत्तीची विक्री करणाऱ्या दुकानांवर टाकले छापे
4

महाराष्ट्र कृषी विभाग ॲक्शन मोडवर; बेकायदेशीर ‘कम्फर्ट’ मच्छर अगरबत्तीची विक्री करणाऱ्या दुकानांवर टाकले छापे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.