Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shivsena : “भांडुपचा भोंगा पाकिस्तानची भाषा बोलतोय…”, संजय निरुपम यांचा राऊतांवर निशाणा

Sanjay Nirupam on Sanjay raut : विधानसभा निवडणुकीनंतर भाजपसोबत युती करण्यासाठी उबाठाकडून सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 05, 2025 | 05:58 PM
"भांडुपचा भोंगा पाकिस्तानची भाषा बोलतोय...", संजय निरुपम यांचा राऊतांवर निशाणा (फोटो सौजन्य-X)

"भांडुपचा भोंगा पाकिस्तानची भाषा बोलतोय...", संजय निरुपम यांचा राऊतांवर निशाणा (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Follow Us:

Sanjay Nirupam on Sanjay raut In Marathi: पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा जशास तसा बदला घेण्यासाठी केंद्र सरकार आणि लष्कराचे प्रयत्न सुरु असतानाच काँग्रेस आणि भांडुपचा भोंगा पाकिस्तानची भाषा बोलत आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी उबाठा खासदार संजय राऊतवर केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्र आणि भारतविरोधी बोलणाऱ्या राऊतचा निषेध करावा, असे आवाहन निरुपम यांनी जनतेला केले.

“सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात हवा…”, वाहतूक कोंडीमुळे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संतापले

यावेळ निरुपम पुढे म्हणाले की, पाकिस्तानाला पहलगाम हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी लागेल. पाकिस्तानला घेरण्याची रणनिती सरकारकडून केली जात आहे. पाकिस्तानशी आयात बंदी लागू केली आहे. पाणी बंद केले आहे. समुद्री व्यापार बंद केला आहे. वायू सेनेकडून युद्धाभ्यास सुरु आहे, असे निरुपम म्हणाले. सिंधू जल करार स्थगित केला असून आता चिनाब आणि झेलम नदीवर धरणे बंद करुन पाकिस्तानची कोंडी केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे भारतीय लष्कराकडून उद्ध्वस्त करतील, असे निरुपम म्हणाले.

भांडुपचा भोंगा बोगस माणूस संजय राऊत म्हणाले की ते हुकुमशाही विरोधात लढतो. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर भाजपसोबत युती करण्यासाठी उबाठाकडून सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असल्याचा गौप्यस्फोट निरुपम यांनी केला. उबाठा खासदार भाजपकडे जाण्याच्या तयारीत असताना सर्व खासदारांना उद्धव ठाकरेंनी त्यांना रोखले होते. भाजपसोबत बोलणी सुरु असून आपण सर्वच भाजपबरोबर जाऊ, अशी गळ उबाठाने खासदारांना घातली होती, मात्र भाजपकडून उबाठासाठी दरवाजे बंद आहेत, असे निरुपम म्हणाले.

भांडुप भोंग्याने कालच लाडकी बहिण योजना बंद झाली अशी धडधडीत खोटी माहिती जनतेला दिली. राऊत यांना खोटं बोलण्याची, खोटा प्रचार करण्याची सवय झालीय, अशी टीका निरुपम यांनी केली. लाडकी बहिण योजना सुरु असून त्यांना दरमहा पैसे देण्यास सरकार कटिबद्ध आहे, असे निरुपम म्हणाले. लाडकी बहिण योजना कोणीही बंद करु शकत नाही. तसेच आता १५०० रुपये देत आहेत भविष्यात त्यांना २१०० रुपये देण्याचा शब्द शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पूर्ण करतील, असा विश्वास निरुपम यांनी व्यक्त केला.

मुलींनीच मारली बाजी; जाणून घ्या पुणे जिल्ह्याचा बारावीचा निकाल

Web Title: Shivsena sanjay nirupam on sanjay raut news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2025 | 05:58 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Sanjay Nirupam
  • sanjay raut

संबंधित बातम्या

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’
1

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’

मुनावळे जलपर्यटन प्रकल्पासाठी ९२ कोटींचा निधी; किल्ले प्रतापगडावर वीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारणार!
2

मुनावळे जलपर्यटन प्रकल्पासाठी ९२ कोटींचा निधी; किल्ले प्रतापगडावर वीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारणार!

‘राऊतांना उद्धव ठाकरेंनी इतकं झापलं की, फक्त मारायचं बाकी होतं’; बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा
3

‘राऊतांना उद्धव ठाकरेंनी इतकं झापलं की, फक्त मारायचं बाकी होतं’; बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा

Sanjay Raut vs BJP: ‘ED आणि CBI आमच्या ताब्यात द्या, १० मिनिटांत भाजपचे १० तुकडे करू” संजय राऊतांचे थेट आव्हान
4

Sanjay Raut vs BJP: ‘ED आणि CBI आमच्या ताब्यात द्या, १० मिनिटांत भाजपचे १० तुकडे करू” संजय राऊतांचे थेट आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.